कढी रेसिपी मराठी Kadhi Recipe in Marathi कढी ही रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाणे सर्वांनाच आवडते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसातच खाणे ती योग्य देखील आहे. ही रेसिपी महाराष्ट्रीयन असून ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो तेथे सर्वांचीच आवडती कडी ही रेसिपी आहे कडी ही भात कांदा भेंडी भजी यांच्यासोबत देखील आवडीने खाल्ली जाते. तर अतिशय चविष्ट अशा कढी रेसिपी विषयी आज आपण माहिती जाणून घेऊया ही रेसिपी करण्यासाठी अत्यंत सोपी व कमी वेळात होते. तसेच खायला देखील चविष्ट लागते.
कढी रेसिपी मराठी Kadhi Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
आजकाल बाजारामध्ये कढी रेसिपी चे अनेक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये कढी चावल, कढी भजी, कढी गोळे व कढी पुलके अशा रेसिपीज आपल्याकडे बघायला मिळतात. कढी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केली जाते जसे राजस्थानी कढी, महाराष्ट्रीयन कढी, पंजाबी कढी, दही बेसन कढी, गुजराती कढी इत्यादी कढी रेसिपीज खूप प्रसिद्ध आहेत. कढीची चव वेगवेगळ्या राज्यानुसार बदलते परंतु महाराष्ट्रीयन कढी सर्वात फेमस आहे. आपण जर रोजच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर चला मग जाणून घेऊया आज कडी ही रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता बनवणार आहोत?
ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरिता बनवणार आहोत.
रेसिपीच्या पूर्व तयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 5 मिनिटं एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
कढी ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
कढी रेसिपी पूर्ण करण्याकरिता आपल्याला एकूण 20 मिनिटे एवढाच वेळ लागतो.
कढी या रेसिपी करता लागणारे साहित्य :
1) दोन कप आंबट ताक / दही
2) तीन चमचे बेसन
3) एक चमचा साखर
4) एक चमचा जिरे
5) एक इंच आलं
6) एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट
7) कढीपत्ता
8) कोथिंबीर हिरवी चिरलेली
9) चिमूटभर हिंग
कढी रेसिपीची पाककृती :
- बटाटा रस्सा रेसिपी मराठी
- महाराष्ट्रीयन कढी रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जर दही असेल तर दह्याचे टाका मध्ये रूपांतर करून घ्यायचे आणि ताक असेल मग दह्याचे ताक करण्याची गरज नाही.
- ताक केल्यानंतर त्यामध्ये बेसन घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये एक कप पाणी घालून गुठळ्या न होऊ देता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.
- आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी, जिरे टाका आणि जिरे छान तडतडू द्या.
- नंतर त्यामध्ये हिंग, हिरवी मिरची पेस्ट, कढीपत्ता घालून छान परतून घ्या. हे सर्व मिश्रण 20 सेकंद पर्यंत परतून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये ताक आणि बेसनाचे मिश्रण घालून मंद आचेवर छान उकडी येईपर्यंत शिजवू द्या.
- नंतर घट्ट झाल्यावर त्यामध्ये मीठ व साखर घाला व मिक्स करत रहा. नंतर दोन मिनिटांनी गॅस बंद करा आणि हिरव्या कोथिंबीर वरून टाका.
- अशाप्रकारे गरमागरम बेसनाची कढी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही भात, चपाती, पोळी, भाकरी व भजी यांच्यासोबत खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा व आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
पोषक तत्व :
कढीमध्ये लोह, प्रथिने, टायट फोलेट, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी घटक असतात. हे सर्वच घटक खूप फायदेशीर असतात. आपल्या शरीरातील रक्त कमी झाले असेल तर कढी खाणे फायद्याचे ठरते.
फायदे :
कढी ही मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. कढी खाल्ल्यामुळे पोट साफ होते.
कढी खाल्ल्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहते. कढीचा आपण नियमित आहारामध्ये समावेश करायला पाहिजे.
कढीचे नियमित सेवन केल्याने त्वचारोग नाहीसे होतात.
प्रेग्नेंट महिलांनी जर कढीचे सेवन केले तर बाळाची वाढ छान होते. तसेच कढीमध्ये असलेले लोह व प्रोटीन शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करतात व स्किन प्रॉब्लेम निर्माण होत नाही.
तोटे :
कढी दही किंवा ताकापासून तयार केली जाते. त्यामुळे ती आंबट असते सर्दी खोकला असणाऱ्यांनी कढी खाणे टाळावे. अन्यथा खोकला वाढण्याची शक्यता असते.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.