कैरी लोणचे मराठी Kairi launche Recipe in Marathi

कैरी लोणचे मराठी Kairi launche Recipe in Marathi  कैरीचे नाव काढतात तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला कैरीचे लोणचे खावेसे वाटते. तर आम्ही तुमच्याकरता खास कच्च्या कैरीचे लोणचे ही रेसिपी घेऊन आलो आहोत. आम्ही सांगितलेल्या रितीप्रमाणे हे लोणचं केले तर खाण्यासाठी अतिशय चविष्ट व अप्रतिम बनते. कैरीचे लोणचं खाण्याची इच्छाही पूर्ण होते. आजकाल बाहेर दुकानावर कैरीचे लोणचे विकत मिळते. परंतु आपण आपल्या घरी स्वतःच्या हाताने कैरीची लोणची बनवली तर ती स्वस्तही आपल्याला पडेल व चांगल्या प्रकारे देखील आपण त्याची व्यवस्था करू शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

 Kairi launche

कैरी लोणचे मराठी Kairi launche Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

कैरीचे लोणचे ही रेसिपी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे परंतु ही लोणची बनवण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असते. तसेच लोणच्याच्या चवीमध्ये देखील आपल्याला भिन्नता दिसून येते. कैरीचे मसालेदार, तिखट, आंबट, गोड अश्या प्रकारचे लोणचे तर आज आपण कच्च्या कैरीचे मसालेदार लोणचे रेसिपी बघणार आहोत तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती तयार होणार आहे ?
ही रेसिपी 10 किलो कच्च्या कैऱ्यांची तयार होणार आहे.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

कच्च्या कैरीचे लोणचे ही रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते व तिच्या पूर्वतयारी करता किमान 40 मिनिटे एवढा वेळ आपल्याला लागतो.

तयार करण्याची प्रक्रिया :

लोणचे तयार करण्यासाठी आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

कच्च्या कैरीचे मसालेदार लोणचे तयार करण्यासाठी आपल्याला 1 तास 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कच्च्या कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) दहा किलो कैऱ्या
2) दीड किलो मीठ
3) दोन किलो तेल
4) एक पाव मिरची पावडर
5) अर्धा किलो मोहरी डाळ
6) एक पाव बडीशोप
7) दीडशे ग्रॅम मेथी
8) दीडशे ग्रॅम धने

लोणचे मसाला :

1) एक चमचा हिंग
2) सात ते आठ चक्रफुल
3) दालचिनी
4) 20 लवंगा
5) 20 मिरे
6) मसाला वेलदोडे
7) सूट छोटा तुकडा
8) पाच चमचे साखर

पाककृती :

  • मँगो केक मराठी
  • सर्वप्रथम लोणचे मसाला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यावा.
  • कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुऊन कोरड्या करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. कैऱ्याचे छोटे तुकडे केल्यानंतर त्यातील आतील गर बाहेर काढून टाकावा. व कैऱ्यांची तुकडे स्वच्छ पुसून घ्यावीत.
  • नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. हे तेल थोडे थंड झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेला मसाला सर्व मिक्स करून घ्यावे.
  • नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकावे, त्यामुळे छान लाल रंग येतो. तसेच चवीतही बराच फरक पडतो. त्यामध्ये ते लाल मिरची ही आपण तव्यावर भाजून घालू शकतो.
  • आता लोणचे मसाला तयार झालेला आहे या लोणचे मसाल्यामध्ये थोडे थोडे कैऱ्यांचे तुकडे घालून व्यवस्थित मसाला लावून भरणीमध्ये भरून घ्यावे.
  • आठ ते दहा दिवस या लोणच्या भरलेला हलवणे गरजेचे असते. नंतर त्यामध्ये गुळ किसून घालावा.
    अशाप्रकारे कैरीचे आंबट गोड लोणचे तयार होईल.

पोषक घटक :

आंबा या फळांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, झिंक कॉपर, पोटॅशियम, मिनरल्स अशा प्रकारचे पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

फायदे :

आंबा खाणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहे. आंब्यामधील असणाऱ्या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात तसेच चेहऱ्यावरील तेज कायम राहण्यासाठी आंबा हे फोड उपयुक्त ठरते.

आंब्यामुळे शरीरातील नसा टिशू व स्नायू मजबूत होतात तसेच शरीर आतून स्वच्छ होते.

आंब्यातील विटामिन बी 6 मुळे रक्तातील होमोसेस्टीनाचे प्रमाण संतुलित राहते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.

आंबा या फळांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यास चांगली मदत होते.

तोटे :

ज्या लोकांना आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे अशांनी देखील आंबाही फळ कमी प्रमाणात सेवन करावे अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात सारखा आजार वाढू शकतो.

आंब्याचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

तर मित्रांनो, कच्च्या कैरीचे लोणचे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment