काजूकतली रेसिपी मराठी Kaju Katli recipe in Marathi

काजूकतली रेसिपी मराठी Kaju Katli recipe in Marathi  प्रत्येकाला ड्रायफुड्स खायला आवडतात. ड्रायफ्रूट्समधील काजू मात्र सर्वांची आवडते आहेत.
काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काजू ड्रायफ्रूट म्हणून नाही तर काजूची भाजी, काजू कतली असे विविध पदार्थ देखील बनवले जातात. काजूमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीराला रोगापासून वाचवतात. आज अशाच एका रेसिपी विषयी माहिती सांगणार आहोत.
ती रेसिपी म्हणजे काजू कतली आहे. काजू कतलीचे नाव एकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. काजू कतली बऱ्याच लोकांची फेवरेट डिश आहे. यालाच काजू बर्फी या नावाने देखील ओळखले जाते.

 Kaju Katli

काजूकतली रेसिपी मराठी Kaju Katli recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

काजू कतली हा एक बर्फीचाच प्रकार आहे. त्यामध्ये काजूची पेस्ट व दूध तूप साखर घालून तयार केले जाते. काजू कतली उन्हाळ्याच्या दिवसात तीन ते चार दिवस टिकते तर थंड ठिकाणी म्हणजेच फ्रिजमध्ये ठेवून आपण सात-आठ दिवस आरामात खाऊ शकतो. काजू कतली किंवा काजू बर्फी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवली जाते. मँगो काजू कतली, एप्पल काजू कतली अशा विविध काजू-कतली रेसिपी बनवली जाते तसेच खाण्यासाठी अप्रतिम व चविष्ट मिठाई आहे.

काजू कतली रेसिपी विषयी आज आपण माहिती जाणून घेऊया.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता बनणार आहे?
ही रेसिपी आपण सहा व्यक्तींकरिता बनविणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

काजू कतलीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ हा 10 मिनिटे आहे.

कुकिंग टाइम :

काजू-कतली कुकिंग करण्याकरता आपल्याला 30 एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

काजूकतली बनवण्याकरता आपल्याला 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.

काजू कतलीसाठी लागणारे साहित्य :

1) एक कप दूध
2) दोन वाटी सुके काजू
3) दीड वाटी साखर पावडर
4) एक वाटी पाणी
5) एक मोठा चमचा तूप
6) बारीक केलेला सुकामेवा

काजूकतली पाककृती :

 • फिश करी रेसिपी मराठी
 • आपल्याला सर्व काजू पूर्णपणे कोरडी करून घ्यायचे आहेत. या रेसिपी करता आपल्याला सुके काजू वापरायचे आहेत.
 • नंतर हे काजू एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करून घ्यावी. काही तुकडे राहिले असले तर ते काढून घ्यावे.
 • नंतर गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवून त्यामध्ये साखरपुड व एक कप पाणी घालून त्याला चांगले घट्ट होऊ द्या. त्यामध्ये काजू पावडर आणि दूध घाला तसेच वरून तूपही घाला.
 • हे मिश्रण चांगले चार ते पाच मिनिटे गॅसवर ढवळून घ्यायचे आहे. हे मिश्रण गॅसवर ठेवत असताना गॅस बंद करायचा आहे. काजू-कतली आपल्याला लाल होऊ द्यायची नाही.
 • काजू कतलीचे मिश्रण छान घट्ट झाले की, एका पसरट ताटाला तूप लावून हे मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचे आहे.
 • या मिश्रणाचा थर जास्त पातळ नको म्हणून सर्व ताटात समान पातळीवर हे मिश्रण पसरून द्या.
 • नंतर हे मिश्रण समान पसरून दिल्यानंतर त्यावर सुकामेव्याची बारीक तुकडे पसरवून घ्या.
 • तसेच धारदार चाकूने आपल्याला हव्या असलेल्या आकारांमध्ये त्याचे काप काढून घ्या.
 • नंतर त्यावर चांदीचा वर्क चढवा हे चांगले थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा.
 • नंतर बाहेर काढून त्याची नीटपणे चकत्या वेगळ्या काढून घ्या.

अशाप्रकारे आपली काजूकतली रेसिपी तयार आहे.
तयार झालेले काजुकतली थंड जागेवर ठेवावी नाहीतर ती लवकर खराब होते.

काजु कतलीतील पोषक तत्वे :

काजू आरोग्यसाठी आवश्यक असतात, काजू पासून बनवलेले पदार्थ देखील तेवढेच पौष्टिक असतात. काजूकतलीमध्ये कॅलरीज, कर्बोदके, फायबर, शुगर, कॅल्शियम, फॅट, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि सोडियम इत्यादी पोषक घटक असतात.

फायदे :

काजूकतली खाणे शरीरासाठी फायदेमंद आहे. त्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते व केसांच्या वाढीला चालना मिळते. कारण काजूमध्ये प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात.

काजूकतलीच्या सेवनामुळे बुद्धी देखील त्यांना होते, बऱ्याच गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी काजू मदत करते, शरीरातील ऊर्जा निर्मिती व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते.

काजूमध्ये बायो ऍक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएंट नावाचा घटक असतो, हा घटक आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो.

काजूचे नियमित सेवन केल्याने कॅन्सर सारख्या आजारापासून देखील आराम मिळतो.

काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम राहते.

काजूमध्ये कॅल्शियम असल्याने याचे सेवन केल्यास गर्भवती महिलांना याचा फायदा होतो

तोटे :

काजुमध्ये अधिक मात्रेत सोडियम आढळतो आणि म्हणून जर आपण प्रमाणापेक्षा जास्त काजूचे सेवन केले तर आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण हे अनावश्यक रित्या वाढू शकते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक तसेच हृदयाशी संबंधित आजार अशा समस्या होऊ शकतात.

काजू मध्ये फायबर देखील आढळतो वास्तविक बघायला गेले तर फायबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो पण जर जास्त प्रमाणात फायबर शरीरात झाला तर त्यामुळे गॅसेसच्या समस्या तयार होतात आणि यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात.

तर मित्रांनो तुम्हाला काजूकतली ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment