कांदा भजी रेसिपी मराठी kanda bhaji Recipe in Marathi

कांदा भजी रेसिपी मराठी kanda bhaji Recipe in Marathi कांदा भजी ही रेसिपी सर्वांच्या परिचयाची आहे, तसेच ती भारतातील एक प्रसिद्ध अशी रेसिपी आहे.
कांदा भाजी सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी तसेच आपण जेवणासोबतही खाऊ शकतो. कांदा भजी खायला अतिशय कुरकुरीत व चविष्ट लागतात. पावसाळ्याच्या दिवसात तर सर्वांच्याच घरी कांदा भजी तळली जातात. परंतु बऱ्याच जणांना कुरकुरीत अशा कांदा भजी रेसिपी विषयी माहिती नसतं, त्यामुळे त्यांची भजी कुरकुरीत होत नाहीत म्हणून आम्ही खास तुमच्याकरिता ही रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही माहिती वाचा व खास चविष्ट, कुरकुरीत कांदा भजी आपल्या घरी बनवून बघा.

 kanda bhaji

कांदा भजी रेसिपी मराठी kanda bhaji Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

भजी बनवण्याच्या विविध पद्धती आहेत तसेच हा पदार्थ भारतातील धार्मिक सणांमध्ये केलेल्या पदार्थांमधील एक पदार्थ आहे. भज्यांची वेगवेगळे प्रकार आहेत असे कांदा भजी, मिरची भजी, मिश्र डाळींची भजी, मुंग डाळची भजी, पालक भजी, आलू भजी तसेच नॉनव्हेज भजी देखील आजकाल उपलब्ध आहे. मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये तर सकाळी भज्यांची विविध स्टॉल आपल्याला दिसतील. तेथे लोकांची गर्दी बघायला मिळते. भजी बनवण्याकरता आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे पीठ व त्यामध्ये थोडा रवा तेल मीठ तिखट व अजवान घालून तळून घेतले जातात. तर चला मग पाहूया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

कांदा भजी किती लोकांकरिता बनवणार आहोत?
कांदा भजी आपण 6 व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

कांदा भजी तयार करण्याकरता आपल्याला कांदा, मिरची वगैरे लागते त्यामुळे सर्वांची पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कांदा भजी तळून तयार करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

कांदा भजी ही रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 35 मिनिटे लागतो.

कांदा भजी बनवण्याकरता लागणारी सामग्री :

1) दोन वाटी चणा डाळीचे पीठ
2) दोन चमचे रवा
3) दोन वाटी उभा चिरलेला कांदा
4) पाव चमचा हळद
5) एक चमचा लाल मिरची पावडर
6) अर्धा चमचा अजवान
7) पाव चमचा खाण्याचा सोडा
8) दोन चमचे लिंबाचा रस
9) चवीनुसार मीठ
10) तीन चमचे कोथिंबीर बारीक चिरलेला
11) तेल तळण्याकरता
12) दोन हिरव्या मिरच्या

कांदा भजी बनवण्याची पाककृती :

 • सर्वप्रथम आपल्याला मोठी दोन कांदे उभी चिरून घ्यायची आहेत. नंतर ते पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत.
 • कांदा भजी मिश्रण भिजवण्यासाठी मोठेच भांडे घ्या.
  कांदा स्वच्छ धुऊन झाला की, त्यामध्ये मीठ घालून दहा मिनिटे तसेच ठेवून द्या.
 • तोपर्यंत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
 • आता बाजूला ठेवलेल्या कांद्याला पाणी सुटले असेल त्यामध्ये जेवढे मावेल तेवढे चना डाळीचे पीठ घाला.
  कांदा थोडा सुटा वाटत असेल तर त्यामध्ये आणखीन थोडे पीठ घाला व सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
 • आता त्यामध्ये मीठ, मिरची पावडर, अजवाइन, हळद, रवा, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, लिंबाचा रस आवश्यकता असल्यास मीठ घालावे.
 • हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यावे. तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे.
 • तेल गरम की, मिश्रणामध्ये खाण्याचा पाव चमचा सोडा टाकून मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्यावे व त्या कढाईमध्ये जेवढे भजे मावतील तेवढी भजी टाकून घ्या.
 • भजी छान अशी लालसर व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. भजी कुरकुरीत झाल्यानंतर कढाईमधून काढा व गरमागरम भजी सर्व्ह करा.
 • ही भजी तुम्ही टोमॅटो सॉस, चहा सोबत किंवा शिरा भजी खाऊ शकता. अशाप्रकारे गरमागरम कुरकुरीत भजी रेसिपी तयार आहे. अशाप्रकारे तुम्ही कांदा भजी रेसिपी नक्की करून बघा व आम्हाला कळवा.

पोषक घटक :

कांदा भजीमध्ये प्रथिने, कोलेस्ट्रॉल, कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे, फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, सोडियम व पोटॅशियम इत्यादी घटक असतात.

फायदे :

कांदा भजी खाल्ल्याने आपल्याला दिवसभराची थकान जाणवत नाही. पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे आपल्या शरीरातील एनर्जी वाढते.

कांद्याचे सेवन करणे फायद्याचे असते, त्यामुळे आपण जर कांदा भजी खात असाल तर त्यामुळे शरीरातील चरबी वाढण्याचा प्रश्न उरत नाही.

कांदा भजी हे बेसना पासून तयार होतात त्यामुळे बेसनामध्ये कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते तसेच आपल्या शरीरातील हाडे कमकुवत असतील तर ते मजबूत होतात.

कांदा भजी आपल्या शरीरासाठी हानिकारक नाहीत.

तोटे :

जास्त भजी खाल्ल्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे भजी खाताना प्रमाणातच खावे.

कांदा भजी ही तळलेली असतात, त्यामुळे त्यातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी भजी कमी प्रमाणातच खावे अन्यथा त्यांना हानी होऊ शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला कांदा भजी रेसिपी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment