कपिल देव यांची संपूर्ण माहिती Kapil Dev Information In Marathi

Kapil Dev Information In Marathi कपिल देव हे एक भारतीय क्रिकेटर खेळाडू आहेत तसेच त्यांच्या नेतृत्वात भारत इंग्लंड मध्ये त्यांनी आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतातील कपिल देव हा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू खेळाडू होता, ज्याचे संपूर्ण देशाने कौतुक केले होते कपिल देव यांना क्रिकेटचा स्टार असे म्हटले जात होते. 1983 मध्ये त्यांनी विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांनी 1999 ते 2000 पर्यंत भारताचे प्रशिक्षक म्हणून नेतृत्व केले आहे. कपिल देव हे एक उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे खेळाडू होते तसेच खेळाच्या बाबतीत त्यांची असणारी ही दूरदृष्टी सर्वच घटकांमध्ये पुढे होती.

Kapil Dev Information In Marathi

कपिल देव यांची संपूर्ण माहिती Kapil Dev Information In Marathi

कपिल देव यांचा जन्म आणि बालपण :

कपिल देव यांचा जन्म चंदिगडमध्ये 6 जानेवारी 1959 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल निखंज आणि त्यांच्या आईचे नाव राजकुमारी लाजवंती असे होते. कपिल देव यांना सहा भावंडे होते, त्यातील कपिल देव एक सहाव्या क्रमांकाचे होते.
त्यांचे वडील हे भारताच्या फाळणीच्या वेळी चंदीगडला येऊन स्थलांतरित झाले होते. त्यांच्या वडिलांचे बांधकाम आणि साहित्य व लाकडे पुरविण्याचे व्यवसाय होता.

कपिल देव यांची शिक्षण:

कपिल देव यांनी चंदीगड येथील डी. ए. व्ही. या शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्या पुढील शिक्षण त्यांनी सेंट एडवर्ड कॉलेजमध्ये केले.

कपिल देव यांची वैयक्तिक जीवन :

कपिल देव यांचा विवाह 1980 मध्ये रोमी भाटिया यांच्यासोबत झाला होता. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.

कपिल देव यांचे क्रिकेट कारकीर्द :

कपिल देव यांना लहानपणापासून क्रिकेट खेळायला आवडायचे, त्यामुळे त्यांनी बाराव्या वर्षी प्रसिद्ध असलेले कोच देशप्रेम आझाद यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचे धडे शिकले. कपिल देव यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वप्रथम सामना हा 1975 मध्ये खेळला होता. पंजाब विरुद्ध या सामन्यांमध्ये सहा खेळाडूंना बात करून पंजाबला केवळ 63 धावा मिळून दिल्या होत्या. त्यापुढे तीन सामन्यांमधून त्यांनी बारा खेळाडू बाद केले.

1976-77 च्या क्रिकेटमध्ये जम्मू काश्मीरच्या विरोधात ते खेळले होते. त्या सामन्यामध्ये त्यांनी 36 धावा देत आठ खेळाडू बाद केले होते. हरियाणाकडून पदार्पण करताना हा सामना हरियाणा राज्याने जिंकला होता. या हंगामामध्ये बंगाल विरुद्ध सामन्यांमध्ये कपिल देव यांनी दुसऱ्याच नावामध्ये केवळ नऊ षटकात वीस धावा दिल्या आणि आठ खेळाडू बाद केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे बंगालला फक्त एकोणावीस शतकात सर्व बाद आणि 58 धावा करता आल्या होत्या.

1978 ते 1979 या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी आठवा क्रमांक पटकावून कपिल देव यांनी 62 धावा केल्या होत्या तसेच दिलीप चषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये सात खेळाडूंना बाद करत उत्तर विभागाच्या संघामध्ये त्यांना प्रवेश मिळाला होता. याच हंगामामध्ये कपिल यांनी त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात सुद्धा खेळला होता.

1979 ते 80 या हंगामात कपिल देव यांनी दिल्ली विरुद्ध 193 धावांची खेडी करत आपले प्रथम श्रेणी शतक गाठले होते.
हरियाणा संघाचा कर्णधार म्हणून त्या हंगामात कपिल देव यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या संघाने शेवटच्या फेरीपर्यंत विजय मिळवला होता. 1990-91 च्या हंगामामध्ये रणजी सीजनमध्ये हरियाणासाठी खेळताना आपल्या संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी कपिल देव यांचा मोठा हातभार होता.

बंगाल विरुद्ध च्या उपायांचे सामन्यात 141 धावांनी आणि संघाला 6051 धावांचा टप्पा मिळवून देण्यात त्यांना यश आले आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी पाच खेळाडूंना बाद सुद्धा केले. रणजी फायनलचा सामना हा खूप लक्षवेधी ठरला होता. कारण यामध्ये कपिल देव, चेतन शर्मा, अजय जडेजा यांसारखे दिग्गज खेळाडू हरियाणा संघातून खेळत होते.
त्यानंतर संजय मांजरेकर, विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला यांनी मुंबई संघामध्ये आपली हजेरी लावली होती.

मुंबई संघाला पराभूत करून हरियाणा संघाचा विजय यावेळी झाला होता. 1 ऑक्टोबर 1978 रोजी फैसल बाद येथे पाकिस्तान विरोधात खेळल्या गेलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले होते आणि त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने त्यांनी पाकिस्तानच्या सादिक मोहम्मद या खेळाडूची पहिली विकेट घेतली होती.

या सामन्यांमध्ये 33 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी करत सर्वात जलद अर्धशतक कपिल देव यांनी रचले होते. कपिल देव यांनी क्रिकेट विश्वामध्ये अवस्मरणीय कामगिरी करून ठेवली होती तसेच वेस्टइंडीज संघाविरुद्ध त्यांनी फिरोजशहा कुठला दिल्ली येथे एकशे सव्वीस धावांची बाजी लावली होती आणि सतरा खेळाडू बाद केले होते. एक दिवसीय क्रिकेट आणि कसोटी सामन्यांमध्ये कपिल देव यांचा नेहमी सहभाग होता. त्यांचा पहिला आणि एक दिवसीय क्रिकेट सामना हा पाकिस्तानच्या विरोधात होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेमध्ये कपिल देव यांनी 28 खेळाडूंना बाद करत एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. कपिल देव यांना दुखापत झाली होती, तरीसुद्धा त्यांनी आपले लक्ष नेहमी खेळावरच ठेवले होते. ऑस्ट्रेलियामधील फलंदाजाची फळीभात करताना, कपिलदेव यांनी 16 षटकांमध्ये 28 धावा घेऊन चार खेळाडू बाद केले होते. भारतासाठी हा सामना त्यांनी जिंकून दिला होता. 1982-83 यादरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यांमध्ये कपिलदेव यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

32 सामन्यांमध्ये 608 धावा आणि 34 खेळाडूंची विकेट घेऊन क्रिकेट विश्वामध्ये त्यांची उल्लेखनीय असे कामगिरी केली होती.
1983 मध्ये भारताने जिबाब्बे या देशाविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळला होता. या खेळामध्ये फलंदाजासह फलंदाजी करत कपिलदेव यांनी मदनलाल आणि रॉजर बनणे या खेळाडूच्या साथीने आपल्या भारतीय संघाला एका वेगळ्या धावसंख्येवर नेलं होतं. कपिल देव यांनी या सामन्यामध्ये शंभर चेंडूमध्ये शतक पटकवले. या सामन्यात नऊ विकेटसाठी 126 धावांची रचना त्यांनी केली होती.

138 चेंडू मध्ये 175 धावा आणि त्यामध्ये नाबाद असा लढा देत हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला होता. त्यानंतरचा सामना हा इंग्लंड सोबत होता आणि त्या सामन्यांमध्ये कपिल देव यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करून तीन विकेट घेऊन इंग्लंडला 213 धावा म्हणून रोखून ठेवले होते. हा सामना भारताने जिंकून अंतिम फेरीमध्ये जाण्याची तिकीट सुद्धा मिळवले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध खेडल्या गेलेल्या सामन्यांमध्ये वेस्टइंडीज ने भारताला फक्त 183 धावा करून दिल्या तर भारताने वेस्टइंडीजचा संपूर्ण खेळ 140 धावांवर संपला.

हा सामना भारताने जिंकला आणि भारताचा पहिलाच विश्वचषक होता. 1987 पर्यंत क्रिकेट विश्वचषकात कपिल देव यांनी कर्णधार पदावर सुद्धा कायम आपले पद टिकवून ठेवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारत पराभूत झाल्याने कपिल देव यांना पराभवासाठी जबाबदार ठरविण्यात आले होते. त्यामुळे कपिल देव यांनी कर्णधार पदावरून राजीनामा दिला होता.

कपिल देव यांना मिळालेले पुरस्कार :

  • कपिल देव यांना 1979 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • 1982 मध्ये भारताचा सर्वश्रेष्ठ मानला जाणारा पद्मश्री हा पुरस्कार त्यांना दिला.
  • 1983 मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर.
  • 1991 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला.
  • 2002 मध्ये त्यांना विसडेन शतकातील भारतीय क्रिकेट हा अवार्ड मिळाला.
  • 2010 मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम हा पुरस्कार मिळाला.
  • 2013 मध्ये सी के नायडू लाईफ टाईम अचीवमेंट हा पुरस्कार मिळाला.
  • 2008 मध्ये कपिल देव यांना लेफ्टनंट कर्नल भारतीय प्रादेशिक सेना.
  • 2019 मध्ये हरियाणाच्या क्रीडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कपिल देव यांची नियुक्ती झाली होती.

FAQ

कपिल देव यांचा जन्म कधी झाला?

6 जानेवारी 1959 रोजी.

कपिल देव यांचे पूर्ण नाव काय आहे?

कपिल देव रामलाल निखंज.

कपिल देव कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

क्रिकेट.

भारतीय क्रिकेट संघामध्ये सर्वप्रथम विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू कोण?

कपिल देव.

कपिल देव यांच्या आईचे नाव काय होते?

राजकुमारी.

Leave a Comment