कारल्याची भाजी रेसिपी मराठी Karlyachi bhaji Recipe in Marathi कारल्याची भाजी म्हटले की बरेच लोक नको मुरडतात कारण त्यांना कारल्याची भाजी कडू लागते तसेच त्या भाजीची चव त्यांना आवडत नाही. परंतु कारले हे एक औषधी आहे, असे म्हटले तरी चालेल. मधुमेहासारखे रोग कारले दूर करण्यास मदत करतात. कारल्याची भाजी पौष्टिक असते. आम्ही ज्याप्रमाणे हे रेसिपी सांगणार आहोत. त्याप्रमाणे जर तुम्ही केले तर अजिबात कडू होणार नाही व चवीलाही खमंग असे कारले रेसिपी तयार होईल. तर चला मग जाणून घेऊया कारल्याची भाजी रेसिपी विषयी माहिती.
कारल्याची भाजी रेसिपी मराठी Karlyachi bhaji Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
कारले ही रेसिपी करण्यासाठी अत्यंत सोपी व चविष्ट होणारी रेसिपी आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. जसे भरले कारले, ग्रेव्ही कारले, मसाला कारले, कांदा कारले इत्यादी सर्वच कारल्यांची रेसिपीज खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतात. तुम्ही जर एकदा कारल्याची भाजी दिलेल्या पद्धतीने बनवली तर तुम्ही देखील कारल्याची भाजी खाण्यासाठी नाही म्हणणार नाहीत. तर चला मग जाणून घेऊया. कारले रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी 5 व्यक्तींकरता तयार होणार आहे.
पूर्वतयारी करताना वेळ :
कारले रेसिपीच्या पूर्वतयारी करता किमान एक तास आपल्याला वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
कारले रेसिपी कुकिंग करण्याकरिता आपल्याला पंधरा मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
कारले रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला 1 तास 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) एक पाव कारले
2) दोन मोठे कांदे बारीक चिरलेले
3) अर्धी वाटी तेल
4) कढीपत्त्याची पाने
5) एक चमचा लसूण पेस्ट
6) एक चमचा आले पेस्ट
7) एक छोटा चमचा जिरे
8) एक चमचा धने पावडर
9) अर्धा चमचा जिरे पावडर
10) पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर
11) पाव चमचा गरम मसाला
12) एक छोटा चमचा मीठ.
13) पाव चमचा हळद
कारले भाजी रेसिपी तयार करण्याची पाककृती :
- मूंग डाळ हलवा मराठी
- कारल्याची भाजी करण्याकरता सर्वप्रथम बारीक चिरलेली कारली एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्या. त्यामध्ये मीठ व हळद टाकून अर्धा ते एक तास मुरू द्या.
- अर्धा एक तासाने हे कारले छान चोरून त्यातील सर्व रस बाहेर काढून घ्या.
- रस काढत असताना दोन्ही हातांनी चिरलेले कारले दाबून त्यातील सर्व पाणी बाहेर निघते.
- नंतर गॅसवर एक कढाई ठेवा त्यामध्ये तेल टाका तेल गरम झाले की, त्यामध्ये थोडे जिरे टाका. जिरे तडतडले की त्यामध्ये चिरलेला कांदा तळून घ्या.
- कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्या आता चिरलेले कारले त्यामध्ये टाका
- हे मिश्रण छान दोन मिनिटे परतून घ्या. नंतर मंद आचेवर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे परतून घ्या.
- नंतर चार पाच मिनिटांनी झाकण काढून पुन्हा ते परतून घ्या. नंतर त्यामध्ये सर्व सुखे मसाले आणि मीठ घाला.
- मिठाचे प्रमाण व्यवस्थित पहावे कारण आधीच आपण त्या कारल्यांना मीठ लावलेले होते.
- त्यामध्ये मसाले घातल्यानंतर पुन्हा दोन मिनिट शिजू द्या. अशा प्रकारे गरमागरम कारले रेसिपी तयार आहे.
- नंतर त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करू शकता.
ही रेसिपी खाण्यासाठी अतिशय खमंग व चविष्ट लागते. तुम्ही देखील तयार करून बघावा आम्हालाही कळवा.
कारल्याची पोषकतत्वे :
कारले खाण्यासाठी अत्यंत पोषक फळभाजी आहे. आयुर्वेदामध्ये देखील कारल्याची पाने व फळांचा उपयोग सांगितलेला आहे. कारल्यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, कॅल्शियम तसेच जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतात.
फायदे :
कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असल्यामुळे कफ आणि पचन समस्या दूर होतात. कारल्याच्या सेवनाने अन्नपचन व्यवस्थित चालते, तसेच भूक सुद्धा लागते.
कारल्याची पाने किंवा फळ पाण्यात उकडून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व कुठलाही प्रकारचा संसर्गजन्य रोग आपल्याला होत नाही.
आपल्याला उलट्या, जुलाब किंवा कॉलरा झाला तर कारल्याच्या रसामध्ये काळ मीठ टाकून पिल्यामुळे लगेच आराम मिळतो.
दम्याचा त्रास असल्यास कारल्याची भाजी खूपच फायदेशीर ठरते. दम्याचा त्रास असल्यास कारल्याची भाजी मसालेदार न करता साधी करून खावी.
हृदयाच्या विकारासाठी देखील कारल्याची भाजी रामबाण उपाय आहे. हानिकारक चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही, यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित चालतो व हृदयघात होण्याची शक्यता कमी होते.
तोटे :
कारल्याची भाजी खाण्याचे आपल्याला अनेक फायदे असले तरी तिचा अतिरिक्त वापर झाला तर त्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो.
कारल्याच्या भाजीच्या अतिरिक्त सेवन केले तर पोट दुखणे, अतिसार यांसारखे समस्या उद्भवू शकतात तसेच गरोदरपणात कारले खाणे टाळावे. अतिरिक्त कारले भाजी खाल्ल्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी होते.
तर मित्रांनो, तुम्हाला कारल्याची भाजी ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.