कर्नाटक राज्याची संपूर्ण माहिती Karnataka Information In Marathi

Karnataka Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण कर्नाटक या राज्याची माहिती पाहणार आहोत.भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे.कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात.

Karnataka Information In Marathi

कर्नाटक राज्याची संपूर्ण माहिती Karnataka Information In Marathi

राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत.

कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही काही भाषा बोलल्या जातात.कर्नाटक राज्यातील सर्वात नवीन जिल्हा विजयनगर आहे . राज्याची राजधानी बंगळुरू शहर आहे , जी भारताच्या जलद आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासात आघाडीवर आहे.

कर्नाटक नावाची उत्पत्ती

कर्नाटक शब्दाच्या उत्पत्तीच्या अनेक विवेचनांपैकी, सर्वात स्वीकारलेले स्पष्टीकरण असे आहे की कर्नाटक हा शब्द कारू या कन्नड शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ काळा किंवा उंच आहे आणि नाडू म्हणजे जमीन किंवा प्रदेश किंवा प्रदेश, ज्याचा अर्थ करूणाडू म्हणजे काळी जमीन किंवा उच्च. राज्य.

काला हा शब्द इथल्या बायलुसिम प्रदेशातील काळ्या मातीतून आला आहे आणि उच्छा म्हणजे दख्खनची पठारी जमीन. ब्रिटीश राजवटीत यासाठी कर्नाटक हा शब्द वापरण्यात आला, जो कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय जमिनीसाठी वापरला जातो आणि मुळात कर्नाटक या शब्दाची व्युत्पत्ती आहे.

कर्नाटक राज्याची स्थापना

राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.1973 मध्ये त्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात आले.

कर्नाटक राज्याचा इतिहास

नमस्कार मित्रांनो, आज आपण कर्नाटक या राज्याची माहिती पाहणार आहोत.भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे.कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात.

राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत.

कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही काही भाषा बोलल्या जातात.कर्नाटक राज्यातील सर्वात नवीन जिल्हा विजयनगर आहे . राज्याची राजधानी बंगळुरू शहर आहे , जी भारताच्या जलद आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासात आघाडीवर आहे.

कर्नाटक नावाची उत्पत्ती

कर्नाटक शब्दाच्या उत्पत्तीच्या अनेक विवेचनांपैकी, सर्वात स्वीकारलेले स्पष्टीकरण असे आहे की कर्नाटक हा शब्द कारू या कन्नड शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ काळा किंवा उंच आहे आणि नाडू म्हणजे जमीन किंवा प्रदेश किंवा प्रदेश, ज्याचा अर्थ करूणाडू म्हणजे काळी जमीन किंवा उच्च. राज्य.

काला हा शब्द इथल्या बायलुसिम प्रदेशातील काळ्या मातीतून आला आहे आणि उच्छा म्हणजे दख्खनची पठारी जमीन. ब्रिटीश राजवटीत यासाठी कर्नाटक हा शब्द वापरण्यात आला, जो कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय जमिनीसाठी वापरला जातो आणि मुळात कर्नाटक या शब्दाची व्युत्पत्ती आहे.

कर्नाटक राज्याची स्थापना

कर्नाटक राज्याचे भूवर्णन

भूवैज्ञानिक दृष्ट्या कर्नाटक प्राचीन, कठीण, स्फटिकी खडकांचा स्थिरप्रदेश असून भूकंप व भूमिपात यांची भीती जवळजवळ नाहीच. पृथ्वीचे कवच बनले त्यावेळेसच कर्नाटकचा ढालप्रदेश बनला. त्यानंतर या भागात झालेल्या अनेक भूगर्भीय घडामोडींमुळे येथे विविधता आढळते.

येथील बहुतांशी भाग डेक्कन ट्रॅपचा असून धारवाड, कुर्नूल, कडप्पा, कलादगी, भीमा इ. प्रणालींचे निक्षेप येथे आढळतात. भौगोलिक दृष्ट्या राज्याचे तीन प्रमुख भाग पडतात पश्चिमेकडील किनारपट्टी, सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश आणि पूर्वेचे विस्तीर्ण पठार.

पश्चिमेकडील किनारपट्टी सखल व अरुंद (उत्तरेकडे १३–३२ किमी. तर दक्षिणेकडे ४८–६४ किमी.) असून त्यावर जांभा खडकाची लहानलहान पठारे आहेत. किनार्‍यावर वाळूचे दांडे व पुळणीचे पट्टे आहेत. पूर्वपश्चिम वाहणार्‍या नद्यांची खोरी सखल असून त्यांचा वरचा भाग सुपीक आहे. किनार्‍यावरील खाड्या दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर आहेत.

सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची सरासरी उंची सु. ६०० — १,००० मी. आहे. घाटाच्या पायथ्याकडील भागास मलनाड असे म्हणतात. घाटाच्या पश्चिमेकडील उतार बहुतांशी खड्या चढणीचा व तुटलेल्या कड्याचा आहे. पूर्वेच्या बाजूला गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वतांच्या रांगा होत.

कड्यावरून वाहणार्‍या अनेक पश्चिमवाहिनी नद्यांच्या मार्गांत धबधबे असून या नद्यांपैकी शरावती, काळी या नद्या विशेषतः उल्लेखनीय आहेत. सह्याद्रीच्या प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनगिरी व कुद्रेमुख प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही प्रसिद्ध गिरिस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठार किनारपट्टीशी जोडले गेले आहे.

जिल्हे

कर्नाटकात जिल्ह्यांची एकूण संख्या ३१ आहे. १८ नोव्हेंबर २०२, ० दिवशी बळ्ळारी जिल्ह्याचे दोन भाग करून नवीन विजयनगर जिल्हा बनविण्यात आला. शासकीयदृष्टया राज्याचे चार विभाग करण्यात आले असून जिल्ह्यांची विभागवार यादी खाली दिली आहे.

बागलकोट,बल्लारी , बंगळुरू(ग्रामीण),बंगळुरू(शहर) बेळगाव,बिदर,विजापूर,  चमराजनगर,चिक्काबल्लारपूर,  चिकमागलूर,चित्रदुर्ग, दक्षिणकन्नड,दावणगेरे,धारवाड,गदग,गुलबर्गा,हसन,हावेरी,कोडागू,कोलार,कोप्पम,मंडया,म्हैसूर,रायचूर,रामनगर, शिमोगा,तुमकुर,उडुपी, उत्तर कन्नड,यादगीर.

लोकसंख्या

2001 च्या भारतीय जनगणनेनुसार , कर्नाटकची एकूण लोकसंख्या 52,850,562 आहे, त्यापैकी 26,898,918 (50.89%) पुरुष आणि 25,951,644 महिला (43.11%) आहेत. म्हणजेच दर 1000 पुरुषांमागे 964 महिला आहेत. त्यानुसार 1991 च्या लोकसंख्येमध्ये 17.25% वाढ झाली आहे.

राज्याची लोकसंख्या घनता 275.6 प्रति चौ.कि.मी आहे आणि 33.98% लोक शहरी भागात राहतात. येथील साक्षरता दर ६६.६% आहे, ज्यामध्ये ७६.१% पुरुष आणि ५६.९% महिला साक्षर आहेत.  एकूण लोकसंख्येपैकी ८३% हिंदू आणि १३% मुस्लिम, २% ख्रिश्चन, ०.७८% जैन, ०.३% बौद्ध आणि बाकीचे इतर धर्माचे आहेत.

भाषा

कन्नड की राज्याची अधिकृत भाषा असली, तरी इतर भाषिकांची संख्याही मोठी आहे. किनारपट्टीत तुळू व कोकणी, कूर्गमध्ये कोडगू व आदिवासी जमातींच्या विविध कन्नड बोली रूढ आहेत. उत्तरेकडे आर्य भाषांतील शब्द मिसळलेली, तर दक्षिणेकडे द्राविडी भाषांतील शब्द मिसळलेली कन्नड बोलली जाते. शब्दसंपत्ती व उच्चारपद्धती अंतराअंतरावर बदलत जाते.

मृदा

कर्नाटकात ‘रेगूर’ व रेतीयुक्त ‘लाल माती’ हे मृदांचे दोन मुख्य प्रकार आढळतात. रेगूरचा विस्तार प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात बेसाल्टच्या प्रदेशात आहे. रेगूरमध्ये रंगाप्रमाणे अत्यंत सुपीक काळी, भुरट्या रंगाची, मध्यम व करड्या रंगाची कनिष्ठ अशी प्रतवारी दिसून येते. कनिष्ठ प्रतीच्या मृदा ‘मुरूम’ म्हणून ओळखल्या जातात. रेगूरमधील ओलावा जास्त दिवस टिकून रहात असल्याने रब्बी पिकांना अशा मृदांच्या विभागात जास्त महत्त्व आहे.

रेतीयुक्त लाल रंगाची माती प्रामुख्याने घटप्रभा-मलप्रभा नद्यांच्या जवळील अवशिष्ट डोंगरभागात व दक्षिणेस ग्रॅनाइटने व्यापलेल्या प्रदेशात आढळून येते. उत्तरेकडील मृदा जास्त लाल रंगाची व दक्षिणेकडील फिकट रंगाची आहे. पण एकूण ही मृदा रेगूरपेक्षा कमी कसाची असते.

अन्य स्थानिक प्रकारच्या मृदांपैकी धारवाड खडकांवरील पिवळी शाडूची मृदा, ठिकठिकाणी दर्‍याखोर्‍यांत साचणारी गाळाची मृदा, किनारपट्टीवरील पुळणीची मृदा व जांभा दगडापासून उद्भवलेली लाल-जांभळी माती या विशेष महत्त्वाच्या आहेत. जांभा दगडावरील माती व काळ्या मातीच्या प्रदेशात, लोण चढलेली माती हे राज्यातील अगदी निकृष्ट मृदांचे प्रकार आहेत.

खनिजे

या राज्यात नाना तऱ्हेची खनिजे उपलब्ध होतात. लोहधातुकाच्या खाणी मुख्यत्वे बेल्लारी जिल्ह्यात असून चित्रदुर्ग, चिकमंगळूर आणि उत्तर कॅनरा (कानडा) ह्या भागांतही काही प्रमाणात लोहधातुक सापडते.

चुनखडीच्या खडकाचे साठे मुख्यत्वे गुलबर्गा, तुमकूर व विजापूर या जिल्ह्यांत असून त्यांना सिमेंट उद्योगामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्पादनात ह्या खनिजाचा दुसरा क्रमांक लागतो. मँगॅनीज ह्या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. बेल्लारी जिल्ह्यात, विशेषतः सांडूर भागात, मुख्य उत्पादन होते.

उत्तर कानडा व शिमोगा भागांतही ह्या धातूचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात होते. सुप्रसिद्ध कोलार खाणीतून सोन्याचे उत्पादन होते. रायचूर जिल्ह्यातही काही ठिकाणी सोने काढले जाते. क्रोमाइट उत्पादनात या राज्याचा भारतात ओरिसानंतर क्रम लागतो. ह्या धातूचे उत्पादन हसन जिल्ह्यात होते.

याव्यतिरिक्त क्वॉर्टझ (शिमोगा), बॉक्साइट (बेळगाव), मॅग्नेसाइट (म्हैसूर व कूर्ग), ॲस्बेस्टस (हसन), थोड्या प्रमाणात रुपे (कोलार व रायचूर) तसेच तांबे, शिसे, चिनी माती यांचे उत्पादन होते. अर्थातच व्यापारी संदर्भात सोन्याला व औद्योगिक धंद्यात लोह, मँगॅनीज व चुनखडीचे खडक या कर्नाटकातील खनिजांना विशेष स्थान आहे. ग्रॅनाइट व बेसाल्टचा उपयोग मुख्यत्वे इमारती व रस्ते तयार करण्यास होतो.

श्रवणबेळगोळची श्री गोमटेश्वराची भव्य मूर्ती, बंगलोरमध्ये अगदी अलीकडे बांधलेली विधान सौध इमारत तसेच विजयानगर, हळेबीड, बादामी अशा ऐतिहासिक व पुरातात्त्विक महत्त्वाच्या ठिकाणच्या वास्तूंत या दोन्ही खनिजांचा सुंदर उपयोग केला आहे. त्याचप्रमाणे बेलूरचे सुप्रसिद्ध चेन्नकेशव मंदिर, हे बळूच्या दगडाचा (सोपस्टोन) सुंदर कोरीव कामासाठी कसा उपयोग केला जातो, याची साक्ष देते.

हवामान

कर्नाटक राज्याचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे असले, तरी राज्याच्या दक्षिणोत्तर लांबीमुळे व स्थानिक उंचसखलतेमुळे प्रादेशिक फरक बराच आढळून येतो. उत्तर व दक्षिण कानडा जिल्ह्यांच्या किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान उष्ण (सु. २४० से.) व दमट (आर्द्रता सु. ७०%) असते.

सरासरी पर्जन्यमान सु. ३०० सेंमी. (उत्तर कानडा २७६ व दक्षिण कानडा ३९० सेंमी.) असते. पावसाळ्याचा काळ प्रामुख्याने जून ते ऑक्टोबर असतो. सह्याद्रीच्या शिखरप्रदेशात उंचीमुळे सरासरी उष्णतामान कमी असते. विशेषतः बाबा बुढण व अन्य शिखर प्रदेशांत तर जास्त थंडावा असतो.

राज्यातील या पर्वतीय भागात पर्जन्यवृष्टी २५० सेंमी. पर्यंत असते, पण पावसाळ्याचा काळ मर्यादित असतो. या काळात ढग, धुके यांचे प्राबल्य असते. हिवाळ्यात हवा निरभ्र, थंड व आल्हादकारक असते. उन्हाळ्यातही हवा थंड, क्वचित वावटळी, मेघगर्जना व वादळे यांनी गाजलेली असते. सह्याद्रीच्या पूर्व भागापासून ते थेट राज्याच्या पूर्व सीमेपर्यंत (मैदानभागात) हवामानात प्रदेशाप्रदेशाने फरक होत जातो. हा फरक पर्जन्यवृष्टीत विशेष प्रामुख्याने जाणवतो.

प्रदेश पठारी असल्याने वार्षिक तपमानाची सरासरी २०० से. इतकी असते पण उन्हाळा तीव्र (३०० ते ३२० से.) असतो. पर्जन्यमान सह्याद्रीच्या पूर्व बाजूस (शिमोगा १५० सेंमी.) घसरते व पुढे पर्जन्यछायेत ते फारच कमी होते. राज्याच्या विजापूर भागात ५० सेंमी. एवढाच पाऊस पडतो. पूर्वेच्या पट्टीत बंगालच्या उपसागरावरून येणार्‍या पावसामुळे वाढ होते (गुलबर्गा ७० सेंमी.).

पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो, तशी त्याची अनिश्चितता वाढते. त्यामुळे राज्यातील मध्य व ईशान्य भागांत (विजापूर, बेल्लारी, गुलबर्गा, रायचूर, तुमकूर, कोलार) नेहमी दुष्काळाची छाया पडण्याचा संभव असतो.

शेती

कर्नाटक हे कृषिप्रधान राज्य समजले जाते. १९६९ साली एकूण १,९१,७७,००० हे. भौगोलिक क्षेत्रापैकी ५३% भाग शेतीखाली असून त्यांपैकी १३.७% जमीन ओलिताखाली होती. याशिवाय शेतीयोग्य पण पडीक ३.३%, पडीक ४.५%, चराऊ ८.६% व बागांखाली १.६% जमीन होती.

जलसिंचनात दक्षिण मैदानात तळी, तर उत्तर मैदानात विहिरी असा भौगोलिक फरक आढळून येतो. आता बर्‍याच ठिकाणी नद्यांवर धरणे बांधली गेली असल्याने, कालव्यांनी जलसिंचन विस्तीर्ण प्रमाणात केले जात आहे.

कावेरी, तुंगभद्रा, मलप्रभा, घटप्रभा या नद्यांवरील प्रकल्पांमुळे मध्य व पूर्व कर्नाटकातील दुष्काळी भागांत कोरडवाहू जमीन राज्याच्या कृषिजमिनीपैकी जवळजवळ ६७% असल्याने, त्या प्रदेशात जिरायत शेती कशी बळकट करावी, ही समस्या महाराष्ट्राइतकीच कर्नाटकापुढे आहे.

खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेतली जातात. ज्वारी, भात, रागी, बाजरी, गहू व कडधान्ये ही राज्यातील मुख्य अन्नधान्याची पिके आहेत. नगदी पिकांत ऊस, कापूस, तेलबिया, तंबाखू, मिरची, सुपारी, नारळ, कॉफी, काजू, वेलदोडे, मिरे व द्राक्ष-मोसंबी ही मुख्य पिके आहेत.

कापूस, बाजरी आणि कडधान्यांच्या उत्पादनाविषयी उत्तर मैदान प्रसिद्ध आहे. दक्षिण मैदानात भात हे मुख्य पीक असून त्याखालोखाल रागीचे पीक महत्त्वाचे आहे. डोंगराळ भागात काही ठिकाणी ‘कुमरी’ (स्थलांतरित शेती) रूढ आहे. काही पिकांसाठी विशिष्ट भाग प्रसिद्ध आहेत : निपाणी-चिकोडीचा तंबाखू संकेश्वर-ब्याडगीची मिरची

मलनाडातील नारळ सह्याद्री पट्ट्यातील सुपारी, वेलदोडे, मिरी व बाबा बुढण प्रदेशाची कॉफी यांना भारतात व परदेशांत चांगली मागणी आहे.

कर्नाटक राज्याचा पेहराव

पुरुषांचा पारंपारिक पोशाख म्हणजे लुंगी. हे शर्टसह कंबरेच्या खाली घातले जाते. पुरुष खांदे झाकण्यासाठी अंगवस्त्रम (गमचा) घेऊन जातात . सणासुदीच्या काळात किंवा विशेष प्रसंगी पुरुष धोतीसारखा दिसणारा पांचा परिधान करतात. म्हैसूर पेटा हा पुरुषांचा पारंपारिक पोशाख आहे.

कर्नाटकातील महिलांचा पारंपरिक पोशाख म्हणजे साडी. हे रेशीम बनलेले आहे. आणि सिल्कच्या साड्या फक्त कर्नाटकातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहेत.

कर्नाटकातील कांचीपुरम किंवा कांजीवरम सिल्क त्यांच्या चमकदार रंगांनी, आलिशान डिझाईन्स आणि समृद्ध टेक्सचरने सर्वांना आश्चर्यचकित करतात. कांचीपुरम सिल्क साड्या बहुतेक हाताने विणलेल्या असतात. रेशमी धाग्यांना योग्य रंग देण्यासाठी रंगीत (रंगवलेले) केले जाते आणि मग जरी सुतामध्ये काढली जाते.

शुद्ध जरीची रचना शुद्ध रेशमी धाग्याने केली जाते आणि ती पातळ आणि डिझायनर चांदीच्या ताराने तयार केली जाते. आणि शुद्ध सोन्याने मढवलेले आहे. यारीमध्ये थोडीशी चमक जोडण्यासाठी जरीचा वापर केला जातो. कांचीपुरम साडीची पद्धत साधारणपणे वधूच्या पोशाखासाठी उपयुक्त आहे.

कर्नाटक राज्याचा आहार

लोहयुगाच्या काळातील, कर्नाटकातील पाककृती देशातील सर्वात जुनी खाद्यपदार्थांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. हे त्याच्या शेजारच्या केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्ये आणि उत्तरेकडील महाराष्ट्रातील विविध स्वाद, साहित्य आणि स्वयंपाकाच्या तंत्रांचा मेळ घालते, तसेच त्याच्या स्वतःच्या समृद्ध गॅस्ट्रोनॉमिक इतिहासासह. कर्नाटकच्या प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खासियत आहे.

शाकाहारी आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी विविध प्रकारचे पाककृती आहेत – उत्तर कर्नाटक पाककृती, दक्षिण कर्नाटक, कोडागु, उडुपी, मंगळुरु, उत्तर कॅनरा आणि नवयाथ पाककृती.

उत्तर कर्नाटक पाककृती प्रामुख्याने शाकाहारी जेवण आहे. तांदूळ आणि जोळा (ज्वारी) हे या प्रदेशातील मुख्य पदार्थ आहेत. मुख्य खाद्यपदार्थ म्हणजे ज्वारी आणि गव्हाच्या रोट्या, विविध प्रकारच्या मसालेदार करी, लोणचे आणि ताक.

उद्योगधंदे

उद्योगधंद्यांमध्ये कापूस पिंजणार्‍या व गासड्या तयार करून सूत व कापड तयार करणार्‍या गिरण्यांचा पहिला क्रमांक लागतो. या गिरण्या कापूस उत्पादन करणार्‍या प्रदेशात प्रामुख्याने आढळून येतात. दावणगेरे, बंगलोर, हुबळी व गोकाक ही मोठ्या गिरण्यांची केंद्रे आहेत.

रेशमाच्या उत्पादनात राज्य अग्रेसर असून, चन्नपटण हे तलम रेशमी कापड व साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मँगॅनीज, लोखंड, बॉक्साइट, सोने व अन्य खनिज उत्पादनाचा धंदा महत्त्वाचा आहे. लोखंड व पोलादाने यांत्रिक सामान, विजेची उपकरणे, सिमेंट, कौले, लाकूडकाम, साखर, विविध रसायने, तेल, कागद, सिगारेट, विडी इत्यादींचे कारखाने राज्यात आहेत.

मंड्या हे शहर साखर कारखान्यांविषयी प्रसिद्ध आहे. शहाबाद, बागलकोट, बेळगाव, भद्रावती ही सिमेंटकरिता प्रसिद्ध आहेत. बंगलोर, भद्रावती, शिमोगा, कोलार, दावणगेरे, मंगलोर, हुबळी, धारवाड, दांडेली, बेळगाव इ. शहरांतील आणि भोवतीचे औद्योगिकीकरण विशेष महत्त्वाचे आहे.

बंगलोर-जळ्‌हळ्ळी परिसरात भारत सरकारचे मोठे कारखाने आहेत. घड्याळे, दूरध्वनीयंत्रे, इलेक्ट्रॉनीय साहित्य, विमानाचे भाग, कापड, यंत्रे इत्यादींचे कारखाने येथे असून अनेक संशोधनसंस्था कार्यशील आहेत. दक्षिण भारतातील ही महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते.

हरिहरचा किर्लोस्करांचा यंत्र हत्यारांचा कारखाना, भद्रावतीचा पोलाद कारखाना, दांडेलीचा कागद कारखाना, मंगलोरजवळ निघणारा रसायन व खत कारखाना, बेळगावजवळचा ॲल्युमिनियमचा कारखाना हे राज्यातील मोठे उद्योगधंदे होत. होस्पेटला पोलाद कारखाना, कुद्रेमुख व सांडूरजवळ लोखंडाचे कारखाने लवकरच सुरू होत आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड , नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज , भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड , इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज , भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि हिंदुस्थान मशीन टूल्स यांसारखे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे स्थापन झाले आहेत.इ जे फक्त बंगलोर मध्ये स्थित आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट यांसारखी भारतातील अनेक प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे देखील आहेत . मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड हे मंगळूर येथे असलेले तेल शुद्धीकरण केंद्र आहे . सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड उद्योग येथे स्थापन झाले आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment