कसारा घाटची संपूर्ण माहिती Kasara Ghat Information In Marathi

Kasara Ghat Information In Marathi कसारा घाट जेव्हा आपण मुंबईवरून नाशिकला जातो तेव्हा आपल्याला या घाटातून जावे लागते. कसारा घाटाचे मूळ नाव थळघाट असे आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नाही. या घाटाची उंची दोन हजार फूट एवढी आहे. तसेच कसारा घाटातून रेल्वे मार्ग सुद्धा जातो आणि रेल्वे मार्गातून आपण जात असताना खूप मज्जा येते. हा रेल्वे मार्ग भारतातील सर्वात वेगवान रेल्वे मार्ग आहे. हा घाट चढताना डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्ध वर्तुळाकार इग्लूच्या आकाराचे दगडी बांधकाम केलेले पाहायला मिळतो. त्या घाटातून येताना किंवा जाताना आपल्याला हे बांधकाम पाहायला मिळते.

Kasara Ghat Information In Marathi

कसारा घाटची संपूर्ण माहिती Kasara Ghat Information In Marathi

या घाटामध्ये थांबणे मात्र खूप धोक्याचे आहे. कारण या घाटामध्ये गाड्यांची खूप गर्दी असते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर हा घाट पाहण्यासारखा असतो. पावसाळ्यामध्ये या घाटाचे सौंदर्य हे एकदम खुलून दिसते. हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची येथे खूप मोठी गर्दी असते तसेच अनेक पर्यटक येथे फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी थांबतात. या घाटाच्या आसपास टेकड्या सुद्धा आहेत तसेच बळवंत नावाचा गड सुद्धा आहे. तर चला मग या घाटाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कसारा घाटाची भौगोलिक माहिती :

कसारा हा घाट मुंबईच्या ईशान्य दिशेला 120 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे तसेच मुंबई आणि नाशिक या प्रमुख महाराष्ट्र शहरांमधील हा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. समुद्रसपाटीपासून अंदाजे 650 मीटर उंचीवर हा घाट वसलेला आहे आणि 11 किलोमीटर क्षेत्र या घाटाने व्यापलेले आहे.

या घाटातून सह्याद्रीच्या पर्वत रंगांचे अतिशय आकर्षक व सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. तसेच हिरवीगार शाल पांघरलेली पर्वत, दऱ्या आणि तुंबणारे धबधबे तसेच खोल जंगलांनी वेढलेले दृश्य आपल्याला दिसते.

कसारा घाटाचे नैसर्गिक सौंदर्य :

कसारा घाटाचे नैसर्गिक सौंदर्य अतिशय अप्रतिम आहे तसेच हा घाट पाहण्यासारखा आहे. या घाटाचे सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये तर अधिक खुलून दिसते. तेथे अनेक पर्यटक थांबतात आणि सेल्फी काढतात. या घाटातील इग्नूच्या आकाराचे दगडी बांधकाम जर आपण जवळून पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हे बांधकाम म्हणजे एक विहीर आहे आणि जवळपास 30-35 फूट व्यासाची ही विहीर असून त्यामध्ये कचरा किंवा जंगली प्राणी पडू नये म्हणून दगडी बांधकाम करून त्याच्यावर टोपली सारखे छप्पर बांधलेले आहे.

डोंगराच्या वरच्या बाजूला चार वसहती म्हणजे छोटी गावे आहेत. या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीच्या खुल्या भागातून पाणी भरत असतात. जुन्या काळामध्ये कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूना या घाटामध्ये विश्रांती मिळावी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्ध वर्तुळाकार इग्लूच्या आकाराचे केलेले दगडी बांधकाम हे अहिल्याबाई होळकर यांनी केले आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीस आज अडीचशे वर्ष पूर्ण झाले आहे परंतु त्यांनी बांधलेली ही विहीर आजही कडक उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाण्याने भरलेली असते आणि तिचा उपयोग घाटातून येण्या जाणाऱ्या वाटसरूसाठी होतो. या विहिरीला खूप पाणी आहे. हे पण एक आश्चर्यच आहे, कसारा घाटात पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असतो आणि तिथे धुके पडलेले असते.

पाऊस आणि धुक्यांचा हा खेळ पाहण्यास आपल्याला खूप आनंद मिळतो. कसारा घाटात ‘भावली’ या नावाचे धरण आहे तसेच या परिसरात अनेक धबधबे वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेले प्रदेश, घाटण देवीचा परिसर, दारणा अशी अनेक ठिकाणी पाहण्यासारखे आहेत. जणू काही या घाटाला निसर्गाचे वरदानच मिळाले आहे असे म्हटले तरी चालेल.

कसारा या घाटाजवडील पाहण्यासारखे ठिकाणे :

भंडारदरा :

महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये असलेले अकोले तालुक्यातील भंडारदरा हे एक खेडगाव आहे. हे गाव प्रवरा या नदीच्या काठावर वसलेले असून हे गाव म्हणजे विशिष्ट अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक धबधबे जलाचे शुद्ध आणि थंड हवा तसेच हिरवी झाडे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. त्यामुळे इथल्या गावाच्या सौंदर्यात निसर्गनिर्मित असलेली दृश्य आणखीनच आकर्षक वाटतात. सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरांकडे आणि दर्या पर्यटकांना विशेष आकर्षित करून घेतात व पुन्हा पुन्हा येण्यास भाग पडतात.

मुंबई-नाशिक अहमदनगर आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना ही ठिकाणी अतिशय प्रिय आहेत. हे लोक आपली सुट्टी घालवण्यासाठी या ठिकाणांवर येतात. मुंबई-नाशिक घोटी मार्गे हा रस्ता केवळ साडेतीन ते दोन तासातच आहे तसेच मुंबईच्या मध्य रेल्वेतील कसारा घाट असताना वरून उतरून टॅक्सी किंवा प्रायव्हेट बसने सुद्धा तुम्ही भंडारदरा येथे जाता येते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सोय तर नेहमी सुरु असते.

कळसुबाई शिखर :

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. याला महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट असे सुद्धा म्हणतात हे शिखर समुद्रसपाटीपासून पाच हजार चारशे फूट एवढे उंच आहे. पुण्यापासून याचे अंतर 180 किलोमीटर आहे. तर मुंबई नाशिकहून घोटी, भंडारदरा, बारी मार्गे कळसुबाई शिखरकडे जाता येते.

या शिखराला कळसुबाई हे नाव का पडलं तर यामागे एक कथा आहे. ती कथा म्हणजे त्या गावांमध्ये एक कळसुबाई नावाची सून होती आणि जंगलात आढळणाऱ्या सर्व वनस्पतींची तिला माहिती होती. त्यामुळे संकट काळामध्ये कळसुबाई गावकऱ्यांची सेवा करत असे. त्यामुळे गावकरी कळसुबाईला आपली देवता मानत होते. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणी जपण्यासाठी गावकऱ्यांनी त्या शिखराला कळसुबाई हे नाव दिले आणि तेथे तिचे देऊळ बांधले.

रंधा धबधबा :

हा धबधबा शेंडी या गावापासून 10 किमी. अंतरावर आहे तसेच हा धबधबा एक खूप मोठा धबधबा आहे, जो गावाच्या नावावरून प्रसिद्ध झालेला आहे. पावसाळ्यामध्ये हा धबधबा खूप मोठे रौद्ररूप धारण करतो. पावसाळ्यामध्ये मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने आणखीन एक धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. हे दोन्हीही धबधबे पूर्णतः वाहताना अतिशय विलक्षण दिसतात.

कसारा घाट रात्रीच्या वेळी महाभयंकर असा दिसतो तेथील लोक म्हणतात. तिथल्या हायवेवरील कथा आहे की, तेथील लोकांकडून आपल्याला काही गोष्टी ऐकायला मिळतात. कोणी रात्रीच्या वेळी तिथे गेला की, कोणी डोकं नसलेली बाई त्यांना लिफ्ट मागते तर कोणी म्हणते तिथं गोल गोल घाटात आपण फिरत राहतो. तेथे नेहमी अपघात होत असतात तसेच तेथे अशा अनेक घटना घडतात.

सांस्कृतिक वारसा :

कसारा या घटना खूप मोठा इतिहास व ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व लाभलेले आहे. कारण येथे अनेक ऐतिहासिक किल्ले मंदिरे स्थापत्य कलेचा आणि इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांमुळे येथील एक संस्कृतीचा उदय होतो. दख्खनच्या पठाराला किनारपट्टीच्या प्रदेशांची जोडणारा हा भाग एक मध्ययुगीन काळातील महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता असेही म्हटले जाते.

साल्हेर मुल्हेर आणि हरगड यांसारख्या किल्ल्यांच्या उपस्थितीमुळे हा एक व्यापारी मार्ग संरक्षणात मोठ्या प्रमाणात मदत झाली असेल असेही लक्षात येते. या गटाचा प्रदेश हा प्राचीन काळातील गुहा आणि दगड शिल्पांनी भरलेला आहे, जे पूर्वीच्या काळातील कलात्मक पराक्रमाची आपल्याला आजही आठवण करून देतात.

FAQ

कसारा घाट कुठे येतो?

मुंबई वरून नाशिकला जाताना आपल्याला कसारा घाट लागतो.

कसारा घाटाचे क्षेत्र किती किलोमीटर मध्ये व्यापलेले आहे?

कसारा घाटाचे क्षेत्र 11 किलोमीटर मध्ये व्यापलेले आहे.

कळसुबाईचे शिखरची उंची किती मीटर आहे?

समुद्रसपाटीपासून 5400 किमी. आहे.

कसारा घाटाची उंची किती आहे?

कसारा घाट हा समुद्रसपाटीपासून अंदाजे 600 किलोमीटर एवढा उंच आहे.

कसारा या घाटातील विहीर कोणी बांधलेली आहे?

अहिल्याबाई होळकर.

Leave a Comment