कटाची आमटी रेसिपी मराठी katachi Amti Recipe in Marathi कटाची आमटी ही रेसिपी पुरणपोळी सोबत केली जाते. कारण ज्या वेळेस आपण पुरणाची डाळ शिजवतो, त्यावेळेस त्यातील पाणी जे उरते. त्या पाण्यापासून कटाची आमटी तयार केली जाते. ही आमटी खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते. ही आमटी बनवण्याची पद्धत देखील सोपी आहे. पुरणपोळी एखाद्या धार्मिक सणाला आपण बनवतो. त्यावेळेस देवाला नैवेद्य देखील पुरणपोळीचा दाखवतो, त्यावेळेसच कटाची आमटी देखील तयार केली जाते व देवाला नैवेद्य दाखवला जाते. तर चला मग बघूया कटाची आमटी या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
कटाची आमटी रेसिपी मराठी katachi Amti Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
कटाची आमटी ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे. जी पूर्वीपासून परंपरागत रीतीने चालत आली आहे. आपण ताकाची आमटी, आमसूलची आमटी, चिंचेची आमटी अशा अनेक आमटीचे प्रकार पाहिले आहेत परंतु कटाची आमटी ही पुरणाच्या उरलेल्या कटापासून तयार केली जाते. कटाची आमटी शरीरासाठी पौष्टिक आहे. तर चला मग जाणून घेऊया कटाची आमटी ही रेसिपी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
रेसिपी आपण पाच व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
कटाची आमटी तयार करण्याकरता पूर्वतयारी करावी लागते, त्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
कटाची आमटी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
कटाची आमटी रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 30 मिनिटे लागतो.
कटाची आमटी रेसिपी साठी लागणारे साहित्य :
1) शिजवलेल्या चना डाळीचे उरलेले पाणी
2) एक चमचा तेल
3) एक दालचिनी तुकडा
4) पाव कप कोरडा नारळ
5) दोन तमालपत्र
6) चार काळी मिरी व लवंगा
7) अर्धा चमचा मोहरी
8) अर्धा चमचा जिरे
9) चिमूटभर हिंग
10) कढीपत्त्याची पाच ते सहा पाने
11) पाव चमचा हळद
12) अर्धा चमचा गोडा मसाला
13) एक चमचा लाल तिखट
14) चवीनुसार मीठ
15) दोन चमचे चिंचेचा कोळ
16) एक चमचा गुळ
कटाची आमटी करण्याची पाककृती :
- खरवस रेसिपी मराठी
- पुरणपोळीसाठी शिजवलेल्या हरभरा डाळीतील पाणी गाळून घ्या.
- एका पातेल्यात कोरडे खोबरे घेऊन मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- भाजलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या व त्यामध्ये ही पावडर मिसळून घ्या.
- एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा तेल गरम झाले की, त्यामध्ये दालचिनीची काडी, तमालपत्र, काळी मिरी, लवंगा घालून थोडा वेळ परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये मोहरी घाला मोहरी चांगली तडतडू द्या.
त्यानंतर त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता घाला व गॅस बंद करा. - नंतर त्यामध्ये हळद गोडा मसाला आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या.
- नंतर आपल्याला पाहिजे, त्या प्रमाणात डाळीच्या कटामध्ये पाणी घालून आमटी व्यवस्थित करून घ्या.
- नंतर त्यामध्ये मीठ, चिंचेचा कोळ व गुळ घालून मिक्स करून घ्या.
- नंतर पुन्हा गॅस चालू करा व आमटीला मध्यम आचेवर साधारणता सात ते आठ मिनिटे उकळी येऊ द्या.
- नंतर कोथिंबीर घालून ही आमटी पुरणपोळी सोबत सर्व्ह करू शकता.
अशाप्रकारे स्वादिष्ट आमटी रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता.
पोषक घटक :
कटाची आमटी ही रेसिपी पौष्टिक आहे. त्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, सिग्ध पदार्थ व तंतूमय घटक भरपूर प्रमाणात असतात. तसेच हरभरा डाळीच्या पाण्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व जस्त तसेच ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक तत्त्वे आहेत.
फायदे :
कटाची आमटी हरभऱ्याच्या डाळीपासून बनवली जाते, म्हणून त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात.
हे सर्वच पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात कटाची आमटी खाल्ल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.
हरभरा डाळीमध्ये असलेले अमिनो ऍसिड आपल्या शरीरातील पेशी मजबूत करतात.
कटाची आमटी खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. ही आमटी आपल्या शरीरातील ग्लुकोज शोषून घेते. जे मधुमेह रुग्णांसाठी खूप चांगले असते.
तोटे :
कटाची आमटी जास्त प्रमाणात खाल्ली असता, आपल्याला पोट फुगीचा त्रास होऊ शकतो. किंवा मग उत्तेजक ऍलर्जी देखील होऊ शकते. म्हणून कोणतीही गोष्ट आपण प्रमाणातच खायला पाहिजे.
ज्यांना वाताचा त्रास किंवा सांधेदुखीचा त्रास आहे अशांनी ही आमटी खाऊ नये. कारण हा त्रास वाढण्याची शक्यता असते.
तर मित्रांनो, कटाची आमटीविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
No schema found.