Kaziranga National Park Information In Marathi काझीरंगा हे एक राष्ट्रीय उद्यान असून ते भारताच्या आसाम राज्यातील गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यामध्ये येते. हे राष्ट्रीय नॅशनल पार्क आहे, येथे जगातील सर्वात जास्त एक शिंगी असलेल्या गेंड्यांच्या प्रसिद्ध जाती ठेवण्यात आलेले आहेत. येथे भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन तृतीयांश गेंड्यांची संख्या या अभयारण्यात आढळून येते. काझीरंगा या अभयारण्यात अनेक वाघ सुद्धा आहेत.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानची संपूर्ण माहिती Kaziranga National Park Information In Marathi
याला वाघाचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. या जंगलात अनेक हत्ती पान म्हशी तसेच हरणे सुद्धा आहेत. काझीरंगा अभयारण्यामध्ये बरेच विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी सुद्धा आढळून येतात. काझीरंगा हे भारतातील सर्वात सुरक्षित असलेले एक अभयारण्य मानले जाते. काझीरंगा या अभयारण्यात प्रमुख चार नद्या आहेत, त्यापैकी मुख्य नदी म्हणजे एक ब्रम्हपुत्रा त्यानंतर अनेक छोटे-मोठे पाण्याची तलाव सुद्धा येथे आढळून येतात. काझीरंगा अभयारण्याला 1905 मध्ये सुरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता.
काझीरंगा हे अभयारण्य कोठे आहे?
काझीरंगा हे अभयारण्य भारतातील आसाम राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये येते. ते म्हणजे नागाव जिल्हा आणि गोलाघाट जिल्हा. या अभयारण्याची पूर्व पश्चिम लांबी 40 किलोमीटर असून उत्तर दक्षिण रुंदी 13 किलोमीटर आहे काझीरंगा 378 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला आहे.
या उद्यानात मुख्यतः तीन ऋतू आढळून येतात. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा येथे हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान असतो आणि हिवाळा जास्त करून शुष्क असतो व हिवाळ्यात येथील सरासरी कमाल तापमान 25° c असते. तर सरासरी किमान तापमान पाच अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यामध्ये इथे तलाव आणि नाले सुकून जातात. मार्च ते मे या महिन्यात उन्हाळा गरम असतो.
येथील सरासरी तापमान 37 अंश सेल्शियस असते. पावसाळा हा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये असतो आणि या जंगलांमध्ये वार्षिक सरासरी 2220 एम एम एवढा पाऊस पडतो. जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये काझीरंगा उद्यानाचा तीन चतुर्थांश भाग हा ब्रह्मपुत्राच्या पाण्याखाली आलेला असतो. या पुरामुळे प्राणी जवळच्या निखिल पर्वतरांगेचा आश्रय घेतात.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती व प्राणी:
काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात सखल प्रदेशांमुळे जलोड पूर, कुरण सवाना जंगली उष्ण कटिबंधीय, आद्र मिश्र पानझडी जंगले आणि सदाहरित जंगले असे आढळून येतात. येथे खूप घनदाट असे गवत उगवते तसेच हे गवत खूप उंच असते. या व्यतिरिक्त येथे कमळाचे तलाव, वाटरलीली भारतीय गुजबेरी, कापूस वृक्ष, रवा वृक्ष, सफरचंद यांसारख्या अनेक वनस्पती आहेत तसेच येथे तलाव, नदी काठावर विविध जलीय वनस्पती आहेत.
काझीरंगा उद्यान येथे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे गेंडे, रानम्हशी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्याशिवाय वाघ, पॅथर, भारतीय हत्ती, आळशी अस्वल, जंगली पाण्यातील म्हैस, हाक बियर, दलदलीचे हरिण, जंगली आशियाई जलमही सांबर इत्यादी प्राणी आढळून येतात.
काझीरंगाचा इतिहास :
1904 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने या भागाला भेट दिली होती आणि तेव्हा तिला एकही गेंडा या भागांमध्ये दिसता नाही, त्यामुळे तिने आपल्या पतीकडे घेण्याचे संरक्षण करण्याची मागणी केली. तेव्हा 11 जून 1905 मध्ये हा 232 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा भाग वन संरक्षित क्षेत्र म्हणून राखून ठेवण्यात आला. त्यानंतर तीन वर्षात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील 152 वर्ग किलोमीटर भाग सुद्धा या क्षेत्रात जोडण्यात आला. 1908 मध्ये काझीरंगा या क्षेत्राला वनसंरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाला.
1916 मध्ये याची रूपांतर काझीरंगा संरक्षित शिकार वनक्षेत्रामध्ये करण्यात आले आणि शेवटी म्हणजेच 1938 मध्ये या जंगलातील शिकारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. 1950 मध्ये पिढीस ट्रसी यांनी या जंगलाचे नाव बदलून काझीरंगा अभयारण्य ठेवले होते.1954 मध्ये तत्कालीन आसाम राज्य सरकारने एक कायदा लागू केला. या कायद्यान्वये गेंड्याची शिकार करणाऱ्याला मोठा दंड आणि मूकर केली गेली.
त्यानंतर 14 वर्षांनी राज्य सरकारने आसाम राष्ट्रीय उद्यान कायदा 1968 संबंध केला. त्यानुसार काझीरंगा अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला 11 फेब्रुवारी 1974 मध्ये सरकारने 430 चौरस किलोमीटरच्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत मान्यता दिली आणि युनेस्कोने 1985 मध्ये या उद्यानाचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला होता.
मागील काळाचा विचार केला असता काझीरंगा या अभयारण्यावर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे आणि ब्रह्मपुत्रा नदीला येणाऱ्या पुरांमुळे बऱ्याच प्राणी पशुपक्षी यांच्यावर परिणाम झाले. जंगल पट्ट्यातील मानवी आक्रमणामुळे सुद्धा प्राण्यांच्या नैसर्गिक वस्तीस्थळांना धोका पोहोचत होता.
आसाममधील उल्फा अतिरेक्यांनी तर आसामच्या आर्थिक स्थितीवर परिणाम केला तरी काझीरंगा वर या कारवाईचा काहीही परिणाम झाला नाही. उलट अतिरेक्यांनी शिकार यांच्या हत्या केल्याच्या नोंदी 1980 सालापासून आढळून लागल्या होत्या.
काझीरंगा उद्यानाला भेट कधी द्यावी?
काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानाला हिवाळ्यातील तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमी कमीत कमी 8 अंश सेल्सिअस असते. तर उन्हाळ्यामध्ये 35 अंश सेल्सिअस व किमान 20 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते पर्यटकांना दरवर्षी मे ते ऑक्टोबर हा कालावधी या राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची परवानगी नाही परंतु ते नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये खुले असते.
उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि वादळी असते. पावसाळ्यात हवामान दमट असते, त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीला पूर येण्याची शक्यता असते. बऱ्याचदा पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा तेथील हवामान दमट राहते. ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय उद्यान बंद असते. नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी सर्वोत्तम चांगला काळ नोव्हेंबर ते मार्च असतो.
या उद्यानाला कसे भेट द्याल :
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी तुम्ही हवाई मार्गे रेल्वे मार्गे आणि रस्ता मार्गे सुद्धा येऊ शकता. सोनोनीबारी विमानतळ हे तेजपूर पासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. गुवाहाटी विमानतळ गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नागाव विमानतळापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे आणि जोरहाट विमानतळा पासून 97 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही तेथून टॅक्सी कॅब घेऊन काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पर्यंत जाऊ शकता.
रेल्वे मार्ग जर तुम्हाला रेल्वे मार्गाने यायचे असेल तर गुहाटी आणि नागाव दरम्यान अनेक गाड्या धावतात. त्यामुळे तुम्ही गुवाहाटी ते नागावला येऊ शकता आणि तेथून काझीरंगा उद्यानापर्यंत पोहोचू शकता.
जर तुम्हाला या उद्यानाला भेट देण्यासाठी रस्ते मार्ग यायचे असेल तर गुवाहाटी आणि नागाव ही रस्त्याने चांगली जोडले आहे, त्यामुळे तुम्ही येथे खाजगी बसचा सुद्धा उपयोग घेऊ शकता.
FAQ
काझीरंगा हे उद्यान कोणत्या राज्यात आहे?
आसाम.
काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
एक शिंगी गेंडा.
काझीरंगा या अभयारण्यात कोणकोणते प्राणी आढळतात?
काझीरंगा या अभयारण्यात एकशिंगी गेंडा, वाघ, हत्ती, रानम्हशी, हरण, अस्वल इत्यादी प्राणी आढळतात.
काझीरंगा या अभयारण्याला भेट देण्याची सर्वोत्तम काळ कोणता आहे?
नोव्हेंबर ते मार्च.
काझीरंगा या अभयारण्यातून कोणती मुख्य नदी वाहते?
ब्रह्मपुत्रा.