खैर वनस्पती विषयी संपूर्ण माहिती Khair Plant Information In Marathi

Khair Plant Information In Marathi आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पान खाल्ले असेलच खाल्ले नसेल तर निदान पान कसे असते हे बघितले तरी असेलच. हिरवे पान खाल्ल्यानंतर तोंड लाल का होते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्याचे कारण आहे या पानांमध्ये वापरला जाणारा कात होय.

Khair Plant Information In Marathi

खैर वनस्पती विषयी संपूर्ण माहिती Khair Plant Information In Marathi

हा कात खैर या झाडापासून बनवला जातो. ही एक अतिशय औषधी व आयुर्वेदिक स्वरूपाची वनस्पती असून अगदी कुष्ठरोगांसारख्या आजारांवर देखील गुणकारी ठरलेली आहे. काही मसालेदार मात्र तुरट चव असणारी ही वनस्पती अन्नाचे पचन करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

त्याचबरोबर या वनस्पतीच्या सेवनामुळे भूक देखील कडाडून लागत असते त्यामुळे शरीराची मजबुती करण्यामध्ये खैराचे झाड अतिशय उपयुक्त असते असे सांगितले जाते. आजच्या भागामध्ये आपण या खैर वनस्पती बद्दल आणि त्याच्यापासून बनवण्यात येणाऱ्या कात पदार्थाबद्दल माहिती बघणार आहोत.

नावखैर
इतर नावेकात चे झाड, बाभूळ, चंद्र
शास्त्रीय नावसेनेगेलीया केटॅटू
कुटुंब किंवा कुळफ्याब्यासी
प्रभागमॅग्नोलिओफायटा
वंशबाभूळ जन्य वनस्पती
वापरखाण्याचे पान पूजा साहित्य इत्यादी
उगमगीर अभयारण्य
रंगतपकिरी
उंचीकिमान ९ ते कमाल १२ मीटर

कात या पदार्थासाठी सुप्रसिद्ध असलेली वनस्पती म्हणून खैराला ओळखले जाते. ही एक सदापर्णी स्वरूपातील वनस्पती असून अंदाजे ९ ते कमाल १२ मीटरपर्यंत उंच वाढत असते. सुरुवातीला अगदी लुसलुशीत हिरवी दिसणारी पाने चूर्ण झाल्यानंतर खरबरीत होतात तसेच याच्या फांद्या देखील काटेरी असल्यामुळे अतिशय खरबरीत दिसत असतात.

या वनस्पतीची काटे बोरीच्या झाडाप्रमाणे असतात. या वनस्पतीची पाने ही एकत्र व पिसासारखी दिसणारी असतात ज्यातील एका दलामध्ये सुमारे दहा ते बारा पानांच्या जोड्या असतात. या वनस्पतीला शेंगा देखील येतात ज्या दिसताना चोची सारख्या दिसतात. त्या एका शेंगेमध्ये ३ ते सुमारे १० बिया आढळून येत असतात.

कठीण लाकडांच्या यादीमध्ये या खैराचा समावेश होत असतो. याचा अजून एक गुणधर्म म्हणजे या लाकडाला वाळवी लागत नाही त्यामुळे अतिशय मोठ्या कालावधी करिता हे लाकूड वापरले जाऊ शकते. या लाकडापासून विविध शेती अवजारे, हत्यार, घरगुती लाकडी साहित्य किंवा शस्त्रास्त्रांच्या मोठी बनविल्या जातात कारण हे लाकूड अतिशय मऊ आणि गुळगुळीत स्वरूपाचे असते. काही ठिकाणी जळणाकरिता देखील या खैराच्या लाकडाचा वापर केला जातो.

खैराच्या वनस्पती पासून सर्वात उपयुक्त बनवले जाणारे पदार्थ म्हणून कात ओळखला जातो. खाण्याच्या पानांमध्ये वापरला जाणारा हा कात या लाकडाच्या मृत पेशींपासून बनवला जातो असे सांगतात. हा कात पानाला रंग व चव आणण्याचे कार्य करण्याबरोबरच अतिशय आरोग्यदायी देखील आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात.

तोंडाचे विविध आजार बरे करण्यासाठी, तोंडाला चव आणण्यासाठी, तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी व दातांना चांगले आरोग्य प्रदान करण्यासाठी हा कात ओळखला जातो. लघवीला अधिक वेळा जावे लागत असेल अशा स्थितीमध्ये देखील हा कात वापरला जातो.

कापडाच्या रंगकामांमध्ये देखील कात उपयुक्त असून काताद्वारे खात्यास्वरूपाचा रंग कापडाला दिला जातो. हा कात रक्ताला शुद्ध करणे आणि अन्नपचवणे यामध्ये देखील खूपच फायदेशीर आहे. विड्याचे पान खाताना त्यामध्ये मुख वास म्हणून या काताचा वापर केला जातो त्यामुळे तोंड देखील लाल होऊन जाते.

पूर्वीच्या काळी सर्वात दुर्धर समजला जाणारा आजार म्हणून कुष्ठरोगाला ओळखले जात असे. यासाठी कात घेऊन त्याचे तेल काढले जात असे आणि हे तेल मध आवळ्याचा रस आणि तूप यांच्यामध्ये मिसळून कुष्ठरोगी व्यक्तीला खायला दिले जात असे.

खैर वनस्पती चे फायदे:

खैर ही अतिशय आरोग्यदायी वनस्पती आहे यापासून बनवण्यात येणाऱ्या कातामुळे शरीर शुद्धीकरण होण्यासाठी खूपच मदत होते. एस्कॉलॉपिक ऍसिड मध्ये आढळणारे सर्व गुणधर्म या कातामध्ये आढळून येत असतात.

कोणा व्यक्तीला अतिसार झाला असेल तर या खैरच्या वनस्पतीचा वापर करण्याचा सल्ला दिला जात असे. या गोष्टीवर इटलीमध्ये फार मोठा अभ्यास केला गेलेला असून शरीरातील कोलन नावाच्या स्नायूंना नियंत्रित करण्याचे कार्य या खैर वनस्पती द्वारे केले जाते. त्याचबरोबर डायरीया झाला असेल तर खैर खूपच फायदेशीर ठरत आहे.

खैर झाडाच्या बिया या प्रतिजैवक गुणधर्माच्या असतात त्यामुळे निर्जंतुकीकरणांमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

मधुमेही रुग्णांसाठी खैर खूपच फायदेशीर ठरत आहे या संदर्भात बांगलादेशमध्ये देखील संशोधन झालेले असून या खैर वनस्पतीचे पान पाण्यात उकळून त्याचा वापर मग तुम्ही ह्या व्यक्तींवर करू शकता. या उपायाची प्रभावीता तपासण्याकरिता सर्वप्रथम उंदरांमध्ये याचा वापर केला गेला होता ज्यामुळे उंदरातील साखर कमी होण्यास मदत मिळाली होती. त्याचबरोबर या वनस्पतीच्या सेवनामुळे रोगप्रत्यकारक शक्ती वाढते शरीराचा दाह कमी होतो.

खैर वापरण्याकरिता त्याचे विविध उत्पादने उपयोगात आणली जातात ज्यामध्ये माऊथ वॉश करणे, गुळण्या करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. खैराचा वापर किती करावा याकरिता व्यक्तीचे आरोग्य व वय विचारात घेतले जाते. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच गरजेचे ठरते.

निष्कर्ष:

भारत हा सर्व बाबतीमध्ये विविधता असणारा देश आहे मग ते विचार, बोलीभाषा असो किंवा प्राणी, वनस्पती असू. भारतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. या प्रत्येक वनस्पतींना आपली स्वतःची अशी वेगळी ओळख असते त्याचबरोबर काही औषधी स्वरूपाच्या असतात तर काही वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जातात.

अशीच एक वनस्पती जी आरोग्यदायी असण्याबरोबरच पूजा कार्य किंवा यज्ञ हवन इत्यादीमध्ये देखील वापरली जाते. त्याचबरोबर अगदी खाण्याच्या पानांमध्ये देखील जिचा वापर होतो अशी वनस्पती म्हणजे खैर होय.

आजच्या भागामध्ये आपण याच खैर वनस्पती बद्दल माहिती बघितलेली असून त्यामध्ये तुम्हाला विविध गोष्टींची माहिती झाली असेल जसे की खैर म्हणजे काय? त्याचे विविध गुणधर्म काय काय असतात? या खैर वनस्पतीच्या सेवनाने कोणकोणते फायदे होतात? त्याचबरोबर तिचे उपयोग कोणकोणत्या ठिकाणी केले जातात? खैर वापरण्याच्या पद्धती?  जंगलामध्ये गेले असता खैरचे झाड कशा रीतीने ओळखावे? त्याचबरोबर खैर वापराने किंवा सेवनाने होणारे विविध तोटे इत्यादी प्रकारची माहिती बघितली आहे.

FAQ

खैर वनस्पती किंवा झाड कोणकोणत्या कार्यासाठी वापरली जाते?

खैर या वनस्पतीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो ज्यामध्ये धार्मिक समारंभ, यज्ञ हवन, खाण्याचे पान इत्यादी ठिकाणी वापर केला जातो.

खैर या झाडाचे स्वरूप कसे असते?

खैर ही वनस्पती काटेरी स्वरूपाची असते जी साधारणपणे नऊ ते बारा मीटर उंचीपर्यंत जाते तसेच लालसर तपकिरी गाठी या लाकडावर संपूर्ण आढळून येतात.

खैर ही वनस्पती कोणत्या कुळातील आहे?

खैरे ही वनस्पती बाभूळ कुळातील आहे.

खैर ही वनस्पती कोणत्या ठिकाणी उगम पावली आहे किंवा सर्वप्रथम आढळून आली होती?

खैर ही वनस्पती सर्वप्रथम गीरच्या जंगलामध्ये आढळून आली. तेथील वन्यजीव अभयारण्य मध्ये आढळून आली होती त्यामुळे येथील ठिकाणाला तिचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते.

खैर वनस्पतीचे थोडक्यात गुणधर्म कसे सांगता येतील?

वनस्पतीचे थोडक्यात गुणधर्म सांगायचे झाल्यास चवीला काहीशी तुरट असणारी ही वनस्पती कुष्ठरोगाच्या इलाजावर प्रभावी समजली जाते त्याचप्रमाणे त्वचेवरील काही जखमा चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या आणि फोड इत्यादी गोष्टीसह हृदय रोगावर उपचार करण्यामध्ये देखील खैर वनस्पती अतिशय फायदेशीर ठरत असते.

Leave a Comment