खाजा रेसिपी मराठी Khaja Recipe in Marathi भारत देश त्याच्या परंपरांसाठी आणि स्वादिष्ट अशा पाककृतींसाठीच प्रसिद्ध आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळी संस्कृती आणि पाककृती आहे. प्रत्येक राज्यामध्ये सण देखील वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. अनेक पारंपारिक पदार्थ येथे केले जातात. दिवाळी, दसरा, होळी, ईद, ख्रिसमस, गणेश उत्सव, नवरात्री अशा धार्मिक कार्यक्रमांना वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात. या सगळ्या निमित्त तरी प्रत्येकाच्या घरामध्ये मिठाई बनवली जाते. अशाच एका वेगळ्या मिठाई रेसिपी ची आज आम्ही तुमच्या करिता खास माहिती घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून पहा व आम्हालाही कळवा.
खाजा रेसिपी मराठी Khaja Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
खाजा ही एक आंध्र प्रदेशातील पारंपारिक अशी डिश आहे जी मैद्याच्या पिठापासून आणि साखरेच्या पाकात बुडवून तयार केले जाते. तेथील लोक हास करून सणानिमित्ताने ही बनवतात व आवडीने खातात आंध्र प्रदेशांमध्ये चिरोटी, खाजा इत्यादी अनेक नावांनी संबोधले जाते. तर बिहारमध्ये देखील खाजा ही मिठाई खूप लोकप्रिय आहे यांना लोक बिहारी खाजा असे म्हणतात. आपण सहज आपल्या घरी बनवू शकतो. तेही जास्त वेळ न घेता तर चला मग पाहूया त्यासाठी लागणारी सामग्री व कृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे?
ही रेसिपी चार व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करिता लागणारा वेळ :
पूर्व तयारी करिता लागणारा 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
खाजा तळून घ्यावे लागतात त्यामुळे तळून घेण्यासाठी व पाकात भिजण्याकरिता त्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
खाजा रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) दोन वाटी मैदा
2) 5 चमचे तेल
3) एक वाटी कॉर्नफ्लॉवर
4) एक वाटी दूध
5) चवीपुरती मीठ
6) तळण्याकरता तेल एक
7) दोन वाटी साखर पाकासाठी
पाककृती :
- मसाला डोसा रेसिपी मराठी
- एका बाऊलमध्ये मैदा चवीनुसार मीठ व गरम तेल करून घालावे. हे मिश्रण पूर्ण दुधात मोडून घ्यावे 15 मिनिटे हे मिश्रण भिजू द्यावे.
- हे पीठ भिजेपर्यंत एका भांड्यामध्ये साखर टाकून त्यामध्ये दोन वाटी पाणी घ्या व एक तारी पाक बनवून घ्या.
- नंतर त्या पिठाचे छोटे छोटे एकसारखे गोळे तयार करून प्रथम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात.
- नंतर एक एक पोळी घ्यावी, अर्ध्याच्या वर चमचा तूप लावावे. व त्यावर कॉर्नफ्लॉवर पसरवून द्यावा अशा प्रकारे सर्वच पोळ्यांवर कॉर्नफ्लॉवर फाईल होऊन एकावर एक ठेवून त्या पोळ्या एकत्रित धरून त्यांचा घट्ट रोल बनवून घ्यावा.
- सर्वात शेवटी रोल पाण्याचे बोट लावून बंद करून घ्यावे, तळताना तेलात त्याची पदर सुटणार नाहीत.
- बनवलेल्या रोलचे सुरीने अर्धा अर्धा इंचाचे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे जसे कापले जातील तसेच ठेवून हलक्या हाताने थोडसं लाटून घ्यावे.
- नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकावे तेल गरम झाले की, मंद गॅस करून सर्व तुकडे तळून घ्यावे.
- नंतर तळून घेतल्यानंतर थोडे थंड झाले की, सर्व खाजे पाकात बुडवून लगेच काढून घ्यावेत. खाजांना गुलाब जामुन सारखे पाकात मुरत ठेवण्याची गरज नसते.
- अशा प्रकारे गरमागरम टेस्टी रेसिपी खाजा तयार आहे. एवढ्या सामग्रीमध्ये तुमचे 15 खाजे तयार होतील.
- खाजातील पोषक घटक :
खाजा ही रेसिपी एक मिठाईचा प्रकार असल्यामुळे त्यामध्ये कॅल्शियम, ग्लुकोज, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के अशा प्रकारची पोषक तत्वे असतात.
खाजा खाण्याचे फायदे :
मैदा खाण्याचे तसे फारसे फायदे नाहीत, परंतु मैद्यापासून बनवलेले पदार्थ लोकांना आजकाल खूप आवडतात.
सणा तीवराला केलेली मिठाईच्या स्वरूपातील खाजा ही रेसिपी खाल्ल्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.
सकाळचे नाश्त्यामध्ये खाजा खाल्ल्यास आपल्याला जी ऊर्जा मिळते. त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. तसेच काम करण्याची इच्छा वाढते.
खाजा गोड रेसिपी असल्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्याला थकवा येत नाही.
तोटे :
मैद्याचे सेवन केल्यामुळे रक्तामधील साखर वाढते व ग्लुकोज गोळा होऊ लागतं, त्यामुळे शरीरात केमिकल रिएक्शन होते आणि आपल्याला हृदयाचा त्रास जाणवू लागतो.
मैदा हा आरोग्यवर्धक घटक नाही, मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण नसल्यामुळे मैदा खाल्ल्यानंतर पोट साफ होत नाही.
मैद्यात ब्लूटूथन असते, त्यामुळे फूड ऍलर्जी तयार करण्यासाठी मैदा कारणीभूत असतो. जेवणाला लवचिक करून त्याला माऊ टेक्स्चर देण्याचे काम मैदा करत असतो. त्यामुळे आपल्याला दुष्परिणाम जाणवतात.
तर मित्रांनो, खाजा रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.