खमंग ढोकळा कसा बनवायचा याविषयी मराठी Khaman Dhokla recipe in Marathi

खमंग ढोकळा कसा बनवायचा याविषयी मराठी Khaman Dhokla recipe in Marathi  खमंग ढोकळा तयार करण्यासाठी लागणारा वेळ :
आपण पाहतो की, आपल्याला कामांमध्ये खूपच वेळ निघून जात असल्यामुळे बरेचदा नाश्ता करण्यासाठी आपल्याकडे वेळही पुरेशा नसतो. अशातच आम्ही तुमच्यासाठी झटपट तयार होणारा खमंग ढोकळा रेसिपी खास घेऊन आलो आहोत. खमंग ढोकळा तयार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं एवढा कालावधी लागतो.

Khaman Dhokla

खमंग ढोकळा कसा बनवायचा याविषयी मराठी Khaman Dhokla recipe in Marathi

कुकिंग टाईम :

जर आपण खूप जणांचा नाश्ता तयार करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला सर्वच साहित्यांच्या क्वांटिटीमध्ये वाढ नक्कीच करावी लागेल, त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये आपण साहित्य घेतलेले आहे. त्याच्यानुसारच ढोकळा वाफवण्यासाठी वेळ लागतो. कॉन्टिटी जास्त असेल तर वेळही जास्त लागेल. सर्वसाधारण दोन ते तीन व्यक्तींचा ढोकळा हा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होतो.

हे रेसिपी कोणत्या प्रकारची आहे?
खमंग ढोकळा आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे परंतु हा एक प्रसिद्ध गुजराती स्नॅक असून हा हरभराच्या पिठापासून तयार केला जातो.
हा एक परिपूर्ण खमंग ढोकळा खूप हलका आणि जाळीदार असतो. तसेच तो खूप आरोग्यदायी आणि बनवायला ही सर्वात सोपा पदार्थ आहे.

खमंग ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

खमंग ढोकळा बनवण्यासाठी खालील साहित्य आवश्यक आहेत.

1) बेसन एक वाटी

2) मोठा रवा दोन चमचे

3) एक कप पाणी

4) पिठीसाखर एक चमचा

5) इनो किंवा बेकिंग पावडर एक चमचा

6) मीठ

7) हळद पाव चमचा

8) लिंबूचा रस एक चमचा

9) तेल एक चमचा.

10) मोहरी एक चमचा

11) कढीपत्ता तीन ते चार पाने

12) हिरव्या मिरच्या तीन ते चार

13) साखर चार चमचे.

पाककृती :

 • अंडाकरी रेसिपी मराठी
 • खमंग ढोकळा तयार करण्याची पाककृती आपण येथे जाणून घेऊया वरील साहित्यांच्या आधारे आपला खमंग ढोकळा तयार करायचा आहे.
 • सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये बेसन पीठ मोठा रवा पिठीसाखर इनो चवीनुसार मीठ यांचे साहित्यात दर्शविल्याप्रमाणे मिश्रण करून घ्या.
 • हे सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाका.
 • हळद आणि सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर आता त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून बरोबर फेटून घेणे गरजेचे आहे. हे फेटून मध्य पातळ मिश्रण तयार करून घ्या.
 • नंतर त्या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकावं ते बरोबर फेटून घ्या.
 • आता कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
 • तोपर्यंत कुकरातील डब्याला किंवा पसरट डब्याला आतून सर्व बाजूने तेल लावून घ्या व मिश्रणाला डब्यामध्ये ओतून घ्या.
 • पाणी गरम झाल्यावर मिश्रण टाकलेल्या डब्याला कढईमध्ये ठेवून दहा मिनिटांसाठी झाकून ठेवा. जेणेकरून आत मधली वाफ बाहेर जाणार नाही. व मिश्रण पूर्णतः वाफवून घ्या.
 • दहा मिनिटे पूर्ण झाल्यानंतर ढोकळा वापरलेला आहे की नाही हे पाहण्याकरता ढोकळ्यामध्ये चाकू घालून बघून घ्यावे.
 • जर हे मिश्रण चाकूला चिटकलेला नसेल तर ढोकळा बरोबर वापरला गेलेला आहे हे कळते आणि जर ढोकळा चाकूच्या टोकाला चिटकला असेल तर अजून त्याला पाच मिनिट वाफवू द्या.
 • वाफलेल्या ढोकळ्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. तोपर्यंत कढईमध्ये एक चमचा तेल टाकून गरम होऊ द्या.
 • तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी, कढीपत्ता, तीन ते चार हिरव्या मिरचीची कापलेली तुकडे टाकून फोडणी तयार करून घ्या.
 • नंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून त्याला चांगली उकळी येऊ द्या.
 • उकडी आल्यावर चार चमचे साखर टाकून विरघळून घ्या आणि पाव चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ त्यामध्ये घाला.
 • आता ज्या डब्यात ढोकळा टाकलेला आहे, त्याच्या चारही बाजू चाकूने मोकळ्या करून घ्या किंवा मग डबा पसरत ताटामध्ये उलटा करून व्यवस्थित काढून घ्या व त्या ढोकळ्याचे चार ते पाच भाग करून घ्या.
 • आता कापून झाल्यावर त्या ढोकळ्याच्या भागांवरती फोडणी सोडायचे आहे. फोडणी सोडल्यानंतर दिसायला आकर्षक व चवीला पण छान असा खमंन ढोकळा तयार आहे.

किती व्यक्तींकरिता खमंग ढोकळा तयार करायचा ?
आपल्याला सुरुवातीला किती जणांकरीता खमंग ढोकळा करून घ्यायचा आहे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. जेवढ्या व्यक्तींसाठी आपल्याला ढोकळा करून घ्यायचा आहे. त्या मानाने त्या साहित्यामध्ये वाढ करावी लागेल. आपण वर केलेली सामग्री पाहिली असेलच ज्यामध्ये आपण दोन ते तीन व्यक्तींचा सकाळचा नाश्ता आरामात तयार होईल.

खमंग ढोकळ्याचे प्रकार :

खमंग ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये काही लोकप्रिय ढोकळ्याचे प्रकार पुढील प्रमाणे.
खांडवी ढोकळा, खट्टा ढोकळा चीज ढोकळा, तूर डाळ ढोकळा, सँडविच ढोकळा, मिसळलेली डाळ ढोकळा, रवा ढोकळा, मिठा ढोकळा हिरवे वाटणे ढोकळा, खमण ढोकळा आणि बेसन ढोकळा.

या रेसिपी मुळे होणारे फायदे :

या रेसिपी मुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात कारण हरभऱ्याच्या डाळीमध्ये किंवा इतर प्रकारच्या ढोकळ्यांमध्ये देखील पोषक घटक असतात.

या रेसिपी मुळे होणारे तोटे :

ढोकळ्याची टेस्ट खूप चटक लावणारे असते त्यामुळे आपण जर जास्त प्रमाणात ढोकळ्याचे सेवन केले तर आपल्याला पोटदुखी होऊ शकतो. योग्य त्या प्रमाणातच केले पाहिजे.

टीप :

ढोकळा करण्याकरता आपल्याला बेसन पीठ हे चाळून घेणे गरजेचे असते.

ढोकळा करण्यासाठी जाडा रवा वापरावा त्यामुळेच ढोकळा छान जाळीदार तयार होतो.

ढोकळ्यावरती गोड पाण्याची फोडणी सोडल्यानंतर ढोकळा लगेच न खाता थोडा वेळ थांबावे व गोड फोडणी जिरल्यानंतर खावे. त्याने अधिकच ढोकळा रुचकर लागतो.

Leave a Comment