खान्देशी शेवभाजी रेसिपी | khandeshi shev bhaji recipe in marathi

खान्देशी शेवभाजी रेसिपी | khandeshi shev bhaji recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आज आपण खान्देशी शेवभाजी रेसिपी ( khandeshi shev bhaji recipe in marathi ) पाहणार आहोत.

खान्देशी शेवभाजी रेसिपी साहित्य ( khandeshi shev bhaji recipe in marathi ) :

  • 3 कांदे बारीक चिरलेले
  • 2 टोमॅटो बारीक चिरलेले
  • 2 चमचे खसखस
  • अर्धी वाटी खवलेलं खोबर
  • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • खडा मसाला-
  • 2 लवंगा
  • 2 मोठ्या विलायच्या
  • दालचिनी चा तुकडा
  • 2 मिऱ्या
  • तमालपत्र
  • 2 लाल मिरच्या
  • 3 चमचे तेल

खान्देशी शेवभाजी रेसिपी कृती ( khandeshi shev bhaji recipe in steps ) :

सर्वात आधी कढईत एक चमचा तेल गरम करून घ्यावे व त्यात सर्व खडे मसाले घालावे जसे की
लवंगा,मिऱ्या,दालचिनी, विलायची,तमालपत्र, लाल मिरच्या,अर्धी वाटी खवलेलं खोबर,व खसखस घालावी. व हा मसाला चांगला परतून घ्यावा.मसाला खरपूस भाजून झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा थोडा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो घालावा टोमॅटो थोडा मऊ झाला की आललसूण पेस्ट घालावी व मसाला तेल सुट्सपर्यंत परतून घ्यावा.

मसाला परतून झाला की गॅस बंद करून हा मसाला काही वेळासाठी थंड करून घ्यावा व गार झालेला मसाला मिक्सर मधून वाटून घ्यावा.

राजमा मसाला रेसिपी | rajma masala recipe in marathi येथे वाचा

त्यांनतर पुन्हा कढईत तेल गरम करून घ्यावे व हिंग,जिरे,मोहरी ची फोडणी द्यावी फोडणी तडतडली की त्यात कढीपत्ता घालावा व वाटलेला मसाला देखील घालवा .

मसाला चांगला परतून एक जीव करून घ्यावा मसाला चांगला शिजला की त्यात आवडीनुसार लाल तिखट घालावे,एक चमचा धनेपूड घालावी,चिमूट भर हळद घालावी, व मसाला चांगला परतून घ्यावा आपल्या भाजी कितपत घट्ट हवी त्यानुसार भाजीत गरम पाणी घालावे.

चवीनुसार मीठ घालावे व भाजीला एक उकळी काढून घ्यावी.
बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व भाजी सर्व्ह करताना त्यात भावनगरी शेव घालावी.

आपली शेवभाजी तयार आहे.

Leave a Comment