खाशाबा जाधव यांची संपूर्ण माहिती Khashaba Jadhav Information In Marathi

Khashaba Jadhav Information In Marathi खाशाबा जाधव हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतात कधीही न जिंकणाऱ्या खेळांमध्ये कास्यपदक मिळवले होते. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. परंतु त्यांना आतापर्यंत पद्म पुरस्कार मिळालेला नाही. खाशाबा जाधव हे त्यांच्या पायाने अत्यंत चपळ होते व त्यामुळे ते त्यांच्या काळामध्ये पैलवान पेक्षा सुद्धा वेगळे होते. त्यांच्यातील चपळता अतिशय विलक्षण होती.

Khashaba Jadhav Information In Marathi

खाशाबा जाधव यांची संपूर्ण माहिती Khashaba Jadhav Information In Marathi

इंग्लिश प्रशिक्षक रिस्क गार्डनर यांनी त्यांच्यामध्ये पाहिलेले वैशिष्ट्य आणि 1948 ऑलम्पिक खेळापूर्वी त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते. खाशाबा जाधव हे एक ओलंपिक मेडल मिळालेले भारतीय कुस्तीपटू आहेत. कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून खेळल्या जातो तसेच कुस्ती हा खेळ महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ आहे, त्यामुळे भारतीय खेळामध्ये आणि तेही ऑलिंपिक मध्ये जर कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवणारे पहिले खाशाबा जाधव हे पहिले भारतीय होते.

खाशाबा यांचा जन्म व बालपण :

खाशाबा जाधव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील कराड या तालुक्यात असणाऱ्या गोळेश्वर या छोट्या खेड्यात 15 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती आणि खाशाबांचे आजोबा हे खूप उत्तमरीत्या पैलवान करत होते तसेच ते पैलवान होते. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे सुद्धा प्रसिद्ध पैलवान होते.

त्यामुळे त्यांच्या रक्तातूनच कुस्ती या खेळाची होणेर होता. खाशाबा हे दादासाहेबांचे सर्वात लहान मुलगा होता. खाशाबा पाच वर्षाचे असताना त्यांनी डावपेच शिकायला सुरुवात केली. तसेच ते आठ वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी आपल्या परिसरातील प्रसिद्ध पैलवालांना दोन मिनिटांमध्ये लढवले होते. गावोगावी होणाऱ्या कुस्त्यांमध्ये ते सहभागी होऊ लागले व त्यांनी सगळीकडे त्यांचे नाव छापले.

खाशाबा जाधव यांचे शिक्षण :

खाशाबा यांचे शिक्षण हे कराड मधील टिळक हायस्कूल मध्ये पूर्ण झालं व नंतर त्यांनी आपले जीवन हे कुस्ती या खेळाकडे वळविले. कुस्ती हा खेळ त्यांच्या घरामध्ये आजोबांपासून चालत आलेला होता. त्यामुळे वडील खाशाबा स्वतः सुद्धा कुस्तीपटू झाले.

खाशाबा जाधव यांची कारकीर्द :

खाशाबा जाधव यांचे वडील दादाराव हे खेळामध्ये उस्ताद होते, त्यामुळे लहानपणा पासूनच खाशाबांना कुस्तीचे योग्य असे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी बाबुराव बाळवडे व भेलपुरी गुरुजी यांचे मार्गदर्शन घेऊन योग्यरीत्या कुस्ती या खेळाच्या कसरती शिकून घेतल्या. खाशाबांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा भाग घेतला होता.

ऑलम्पिकमध्ये स्वातंत्र्याचा तिरंगा फडकविण्याचा निर्धार करून ते धाडस सुद्धा केले आहे. त्यांच्यामधील उत्साह पाहून कोल्हापूरचे राजाराम कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डीकर यांनी खाशाबांना त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण सुद्धा दिले होते. तसेच कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना चांगली संधी चालून आली होती. दादासाहेबांनी शेती गहाण ठेवली व खाशा बाला कोल्हापूर येथे कुस्ती शिक्षण घेण्यासाठी पाठवले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कुस्तीपंढरी म्हणजेच कोल्हापूरमध्ये आल्यावर त्यांनी स्वतःच्या जीवनाला कलटणी मिळाली. कोल्हापुरातील मराठा बोर्डिंग स्कूलमध्ये खाशाबांनी राहून त्यांचे शिक्षण व तालीम दोन्ही सुद्धा योग्यरीत्या सांभाळून पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या प्रवासात त्यांना गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि तिथून त्यांची ऑलम्पिक साठीची वाटचाल सुरू झाली.

1948 मध्ये लंडन ओलंपिक मध्ये प्रायव्हेट गटांसाठी खाशाबा जाधव यांची निवड झाली होती. तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. सहाव्या क्रमांकावर पोहोचणारे खाशाबा हे भारतातील एकमेव खेळाडू होते. खाशाबा हे गादीवरील कुस्ती प्रकार खेळत असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमावलीचा पाहिजे तेवढा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांना पुढच्या फेरीमध्ये जाता आले नव्हते.

ऑलम्पिक स्पर्धा :

खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये इंग्लंडची राजधानी हेलसिंकी येथे जोरदार तयारी केली होती व या स्पर्धेपूर्वी ते मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत कार्यकारी मंडळाच्या सांगण्यावरून तेथे मुद्दाम एक मार्क कमी देण्यात आला होता. ज्यामुळे 1952 च्या ऑलम्पिकसाठी त्यांची निवड झाली नव्हती. येथे खाशाबा जाधव सोबत पक्षपात करण्यात आला आणि त्यांना ऑलम्पिकसाठी अपात्र ठेवण्यात आले होते. याचवेळी पंजाबच्या काही कुस्तीपटू सोबत ही पक्षपात करण्यात आला होता.

खाशाबा जाधव यांनी न्याय मिळवण्यासाठी पद्याळाचे महाराज जे यांच्याकडे विनंती केली. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला त्यामुळे कुस्ती महासंघाने कलकत्त्याला ऑलम्पिक साठी राष्ट्रीय निवड प्रक्रिया घेतली आणि या चाचणीमध्ये खाशाबांनी विरोधी कुस्तीगारांना खिचडीवर टाकले आणि त्यांची निवड 1952 च्या ऑलम्पिक साठी झाली होती.

त्यांच्या या हुशारीने ऑलम्पिकसाठी त्यांची निवड झाली परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या समोर हेलसिंकीला जाण्यासाठी अनेक पैशांचे प्रश्न समोर उभे राहिले तसेच पैशांची जमा करण्यासाठी त्यांच्यासमोर खूप मोठी समस्या निर्माण झाली परंतु गावातील लोकांनी वर्गणी जमा केले. त्यांच्या ओळखीतल्या अनेक लोकांनी त्यांना जमेल तशी मदत केली होती.

कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी खाशाबांना आपल्या विद्यार्थी ऑलम्पिकसाठी जातोय म्हणून आनंदाने स्वतःचे घर गहाण ठेवून सात हजार रुपये दिले होते तसेच त्यांचे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे यांनी त्यांना कमी पडत असलेल्या तीन हजार रुपयाची मदत सुद्धा केली होती. अशी पैशांची जुळवा जुळवा करून त्यांनी हेलसिंकी ची वारी शक्य झाली.

पण त्या काळामध्ये मुंबईचे मुख्यमंत्री असणारे मोरारजी देसाई यांच्याकडे निधी मागितले असता. त्यांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही. 1952 च्या ऑलम्पिक मध्ये विविध देशांचे 24 स्पर्धक सहभागी झाले होते. खाशाबांनी सेमी फायनल पर्यंत मिस्कीको, जर्मनी, कॅनडा यांच्याबरोबर कुस्त्या जिंकल्या आणि तिथेही त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या नावावर कास्यपदक छापले गेलं तिथे जर पक्षपात झाला नसता तर त्यांची मजल सुवर्णपदकांपर्यंत गेली असती.

त्याच स्पर्धेत हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले होते पण त्यावेळी खाशाबांचे विशेष कौतुक झाले होते 1952 च्या ऑलम्पिक मध्ये खाशाबा जाधव यांनी मिळालेले कास्यपदक हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक ठरले आणि त्यांना या विक्रम 44 वर्ष अभाधित राहिला आणि 1996 साली लेंडर स्पेसने टेनिस मध्ये भारतासाठी वैयक्तिक कास्यपदक मिळवीत या यादीमध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता.

यानंतर रेल्वे स्थानकावर हजारो लोक 151 बैलगाड्या ढोल, ताशा, लेझीम, पताका, फटाके घेऊन खाशाबा जाधव यांच्या स्वागतासाठी उभे होते त्याप्रमाणे कराड पासून ते खाशाबांचे जन्मगाव घोडेश्वर पर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. या कारकिर्दीमुळे त्यांच्या या छोट्याशा गावाची ख्याती ही जगभर प्रसिद्ध झाली.

खाशाबा जाधव यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार :

  • खाशाबा जाधव यांना त्यांच्या निधनानंतर 2010 साली दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला त्यांची नाव दिले गेले.
  • 1992 मध्ये खाशाबा जाधव यांना मरणोत्तर छत्रपती हा पुरस्कार देण्यात आला.
  • 2001 मध्ये खाशाबा जाधव यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
  • 15 जानेवारी २०२३ रोजी गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल डूगल सन्मानित केले होते.

खाशाबा जाधव यांचे निधन :

खाशाबा जाधव यांचे निधन एका रोड अपघातामध्ये 14 ऑगस्ट 1984 रोजी झाले.

FAQ

खाशाबा जाधव यांचा जन्म कधी झाला?

15 जानेवारी 1926 रोजी.

खाशाबा जाधव यांचे वडील कोण होते?

दादाराव जाधव हे उत्तम पैलवान होते.

खाशाबा जाधव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

कुस्ती.

खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिक मध्ये कोणते पदक हस्तगत केले?

कास्यपदक.

खाशाबा जाधव यांचा मृत्यू कधी झाला?

14 ऑगस्ट 1984.

Leave a Comment