कोळंबी रस्सा रेसिपी मराठी Kolambi Rassa Recipe in Marathi कोळंबी समुद्रात राहणारा एक मासोळीचाच प्रकार आहे. त्याला आपण झिंगे देखील म्हणतो. कोळंबी रस्सा या रेसिपीला खूपच मागणी आहे त्यापेक्षाही मागणी तवा फ्राय कोळंबी रेसिपीला आहे. कारण कोळंबी ही जेवढी खायला चविष्ट लागते. तेवढीच ती सर्व पोषण तत्त्वांनी भरलेली आहे. कोळंबी रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते. ती लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत पौष्टिक आहे. परंतु रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधले महागडे रेट तसेच येथील अस्वच्छता लक्षात घेता, आपण आपल्या घरी स्वतः स्वच्छ पद्धतीने जर ही रेसिपी तयार केली तर खूप छान होईल व खाण्याचा मज्जा देखील येईल. तर आज आपण कुरकुरीत अशी कोळंबी रस्सा रेसिपी कशी तयार करायची याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
कोळंबी रस्सा रेसिपी मराठी Kolambi Rassa Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
आपण बऱ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहिल्या आहेत. त्यामध्ये कोळंबी रस्सा रेसिपी ही थोडी वेगळी आहे. ज्याप्रमाणे फिश रेसिपीज वेगवेगळ्या प्रमाणे तयार करता येतात. तसेच आपल्याला कोळंबी ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतात. जसे तवा फ्राय कोळंबी, कोळंबी बिर्याणी, कोळंबी भात, कोळंबी सुक, कोळंबी रस्सा, ग्रेव्ही कोळंबी इ. अशा प्रकारचे रेसिपी पाहिल्या आहेत. तर आज आपण कोळंबी रस्सा रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 6 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
कोळंबी रस्सा ही रेसिपी करण्या अगोदर आपल्या आधी स्वच्छ करावी लागते. तसेच पूर्व तयारी करता आपल्याला साधारणतः 15 एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
कोळंबी रस्सा रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
कोळंबी रस्सा रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कोळंबी रस्सा रेसिपी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
1) एक पाव ताजी कोळंबी
2) दोन छोटे बटाटे
3) दोन चमचे मालवणी गरम मसाला
4) तीन कांदे
5) एक वाटी खोबरे
6) दोन शेवग्याच्या शेंगा
7) एक चमचा आलं लसूण पेस्ट
8) पाव चमचा हळद
9) चवीनुसार मीठ
10) फोडणीसाठी तेल
11) कोथिंबीर
12) मिरची पावडर
रेसिपी तयार करण्यासाठी लागणारी पाककृती :
सर्वप्रथम आपल्याला कोळंबी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी लागेल. कोळंबी स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर कांदा बारीक चिरून परतून घ्या. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
नंतर कांदा काढून घ्या व त्यामध्ये खोबऱ्याची बारीक केलेले काप छान परतून घ्या.
कांदा, खोबरे थोडेसे थंड झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचा गरम मसाला, मिरची पावडर व पाव चमचा हळद घालून मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्या.
नंतर एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट घाला व छान परतून घ्या.
ही पेस्ट छान लालसर होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर कोळंबी यामध्ये घाला.
एक दोन मिनिटापर्यंत शिजल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे तुकडे व शेंगा घालून चवीपुरते मीठ घाला.
आता त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी घालून व्यवस्थित शिजवून द्या.
कोळंबी रस्सा छान शिजला की, थोड्या वेळाने गॅस बंद करा तसेच बटाटे व शेंगा शिजल्याची खात्री करून घ्या व नंतर कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे गरमागरम कोळंबी रस्सा रेसिपी तयार आहे. कोळंबी रस्सा तुम्ही भात पोळी तंदुरी रोटी किंवा भाकरी यांच्यासोबत देखील खाऊ शकता.
कोळंबीमध्ये असणारे पोषक घटक :
कोळंबीमध्ये ब जीवनसत्व, रिबोफ्लेवीन, टाइमिंग फॉलिक ऍसिड, पॅन्टोथेनीक ऍसिड, कोबालमिन तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम आयोडीन आणि सेलेनियम हे खनिजे देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून कोळंबी हे एक पौष्टिक पदार्थ आहे.
कोळंबी खाण्याचे फायदे :
कोळंबी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळते, त्यामुळे हाडे मजबूत होतात.
कोळंबी खाल्ल्यामुळे दात देखील मजबूत होतात. तुम्ही जर कोळंबीचे नियमित सेवन केले तर तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
कोळंबीमध्ये बरेच पोषक घटक आहेत, त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील चांगली राहते. अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.
तोटे :
कोळंबीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने ती कमी प्रमाणातच खावी. अन्यथा तिचे अति सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हृदयविकार वाढेल तसेच त्यापासून एलर्जी होण्याची देखील भीती असते.
कोणत्याही निरोगी फूडचे प्रमाण प्रमाणातच करायला पाहिजे अति प्रमाणात सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला कोळंबी रस्सा ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.