Kumbharli Ghat Information In Marathi कुंभार्ली हा घाट सह्याद्रीच्या रांगेमध्ये कराड मधून चिपळूण कडे जाताना लागतो. हा घाट पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्हा यांना जोडणारा मधातला दुवा आहे. या घाटाची उंची 2100 फूट एवढी आहे तसेच हा घाट 12 ते 14 किलोमीटर एवढा विस्तारलेला आहे. पाटण मधून निघाल्यानंतर आपण कोयना नगरला येतो आणि कोयना नगरमधून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर कुंभारली घाट सुरू होतो. हा घाट उतरल्यानंतर कोकणामध्ये म्हणजेच चिपळूणमध्ये तुम्हाला प्रवेश भेटतो.

कुंभार्ली घाटाची संपूर्ण माहिती Kumbharli Ghat Information In Marathi
कुंभारली घाटाच्या सौंदर्याविषयी बोलायचे झाले तर हा घाट खूपच सुंदर आहे. येथील निसर्ग सौंदर्य हे निसर्ग प्रेमींसाठी तर एक आकर्षण आहे. येथे अनेक पर्यटक भेट देत असतात. कुंभार्ली घाटातून प्रवास करत असताना एक वेगळाच अनुभव तुम्हाला होतो.
येथील डोंगराने धोक्याची शाल पांघरलेली असून जणू तेथील डोंगर त्या धोक्यांमध्ये लपंडाव खेळत आहे असा आपल्याला भास होतो. येथे असलेल्या दऱ्या सुध्दा धोक्यांमुळे अस्पष्ट दिसतात. रस्त्याच्या दोन्ही कडेवर हिरवीगार शाल पांघरल्याचे आपल्याला दिसते. सर्वत्र हिरवेगार गवत मनमोहक वाटते.
कुंभार्ली घाट माहिती
कुंभार्ली घाट कुठे आहे | महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये |
लांबी | 12 ते 14 किलोमीटर |
उंची | 2100 फूट |
रस्ता | रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्हा यांना जोडणारा दुवा. |
घाटाचे वर्णन :
या घाटामध्ये सर्वत्र आपल्याला हिरवळ पहायला मिळते. घाटावरून आपल्याला डोंगर खळखळणारे झरे फेसाळ असलेले पाणी दिसते तसेच हे सर्व पाहून आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते. हे सौंदर्य डोळ्यात भरून घ्यावे तसेच याकडे पाहतच राहावे असे आपल्याला वाटते.
डोंगरावरून भरून वाहत येणारे फेसाळ दुधासारखे पाणी आणि त्यात तर पावसाची रिमझिम या दोन्हींचा आवाज कानामध्ये नेहमी घुमू लागतो. या घाटाच्या रस्त्यांमध्ये तुम्हाला माकडे आणि त्यांची पिल्ले बसलेली दिसतील. या घटांमधून वळणावळणाच्या रस्त्यातून जाताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर डोंगरदऱ्या वरून कोसळतात. त्यामुळे अनेक धबधबे येथे निर्माण झालेले आहे. एकाच वेळी हे अनेक धबधबे पाहण्याचा आपला मोह आवरत नाही. या घाटातून प्रवास करत असताना या घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते असं वाटते हा प्रवास कधी संपूच नये.
कुंभार्ली येथे पाहण्यासारखे ठिकाणे :
या घाटामध्ये पाहण्यासाठी अनेक दृष्य आहे सर्वत्र आपल्याला हिरवळ पहायला मिळते. तसेच गडावरून आपल्याला डोंगर खळखळणारे झरे फेसाळ असलेले पाणी दिसते तसेच हे सर्व पाहून आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते. हे सौंदर्य डोळ्यात भरून घ्यावे तसेच याकडे पाहतच राहावे असे आपल्याला वाटते. डोंगरावरून भरून वाहत येणारे फेसाळ दुधासारखे पाणी आणि त्यात तर पावसाची रिमझिम या दोन्हींचा आवाज कानामध्ये नेहमी घुमतो लागतो.
कुंभार्ली घाट : हा निसर्ग प्रेमींसाठी अनेक आकर्षाने घेऊन लपलेला आहे असे आपल्याला भासते येथील वातावरण अतिशय रमणी असते. अनेक पर्यटक येथे दरवर्षी भेटी देण्यासाठी जात असतात. पर्यटक येथे फोटोग्राफी आणि आपला अवस्मरणीय वेळ घालवण्यासाठी जातात.
कोयना वन्यजीव अभयारण्य : वन्यजीव प्रेमींसाठी हे एक अभयारण्य आहे तसेच कोयना वन्यजीव हे अभयारण्य कुंभारली घाटाजवळच आहे. इथे वाघ, बिबट्या, आळशी अस्वल व इतर पक्षांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. अभ्यासात निसर्ग ट्रेक सफारीमध्ये पश्चिम घाटाचे दर्शन मनमोहक सौंदर्यद्वारे आपण पाहू शकतो.
कुंभार्ली महाकाली देवी मंदिर : कुंभार्ली घाटामधून महाकाली देवीचे एक मंदिर लागते. तेथे भाविक भक्तांसाठी जणू पंढरपूरच आहे. शिरगाव, कुंभार्ली आणि खोपडी या तीन गावाचे देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे हिरव्यागार झाडीच्या कुशीत कमलारूच्या सुंदर वस्तूंमध्ये सुकाई वरदायिनी आणि महाकाली विराजमान आहेत. देवी महाकाली ही सुकाई आणि वरदायिनी यांची मोठी बहीण आहे असे मानले जाते.
नेहरू गार्डन : घाटाच्या आतमध्ये एका टेकडीवर नेहरू गार्डन वसलेले आहे. हे गार्डन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना समर्पित आहे. हे एक शांततापूर्ण ठिकाण आहे तसेच हे ठिकाण हिरव्यागार हिरवाईमध्ये शोभून दिसते. येथे आपण आराम करू शकता.
शिवथळघळ : कुंभार्ली घाटाच्या परिसरामध्ये असलेल्या या ऐतिहासिक गुफेला मराठीतील प्रसिद्ध कवी संत रामदास यांनी आपल्या अध्यात्मक कलाकृतीद्वारे येथे दासबोध ग्रंथ सुद्धा लिहिला आहे असे मानले जाते. शिवथरघळ ही एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र सुद्धा आहे. तिथे ध्यानासाठी शांत वातावरण आहे.
कुंभार्ली घाट धोकादायक :
आपल्याला कुंभारली घाट जेवढा सौंदर्याने लटलेला दिसतो तसेच त्याचे जेवढे आकर्षण आहेत तेवढाच तो धोकादायक सुद्धा आहे. हा घाट गुहागर विजापूर मार्गावर असून चिपळूण व कराड या दोन मोठ्या शहरांना जोडणारा दुवा मानला जातो परंतु हा घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक सुद्धा आहे. इथे बरेच वाहतुकी दरम्यान अपघात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा सावधनता बाळगून हा घाट पाहू शकता.
भेट देण्याची सर्वोत्तम वेळ :
या घाटाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा पावसाळा आहे कारण पावसाळ्यामध्ये येथे अनेक धबधबे आणि जिकडे तिकडे हिरवळ आपल्याला दिसते. म्हणजे जून ते सप्टेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी योग्य काळ आहे. येथे गर्जना करणारे अनेक धबधबे धुकेयुक्त असणारे पर्वत आपल्याला दिसतात.
हे आपले मन मोहून घेतात तसेच नयनरम्य वातावरण येथे असते. पावसाळ्यानंतरचा हंगाम म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान येथे हवामान आल्हाददायक असते, त्यामुळे पर्यटकांना मुसळधार पावसाशिवाय घाटाच्या सौंदर्याची दर्शन मिळते.
निवासस्थान आणि सुविधा :
कुंभार्ली घाट आणि त्यांच्या सभोवतालचे क्षेत्र पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे निवासाच्या दृष्टीने येथे अनेक रिसॉर्ट पासून ते हॉटेल्स तसेच आरामदायी होमस्टे सुद्धा आहेत. येथे अतिथी गृह सुद्धा आहेत. तुम्ही दिवसभर कुंभारी घाटावरील दृश्य तसेच त्याच्या जवळील असलेले पर्यटन स्थळ सुद्धा पाहू शकता आणि नंतर येथे वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
FAQ
कुंभार्ली घाट कोठे येतो?
कुंभार्ली घाट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो.
कुंभार्ली घाट हा कोणत्या दोन मोठ्या शहरांना जोडतो?
चिपळूण आणि कराड.
कुंभार्ली या घाटाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ कोणता आहे?
जून ते सप्टेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी योग्य काळ आहे. येथे गर्जना करणारे अनेक धबधबे, धुके असणारे पर्वत आपल्याला दिसतात. हे आपले मन मोहून घेतात तसेच नयनरम्य वातावरण येथे असते. पावसाळ्यानंतरचा हंगाम म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान येथे हवामान आल्हाददायक असते.
कुंभार्ली या घाटाची उंची किती आहे
कुंभार्ली या घाटाची उंची 2100 फूट आहे.
कुंभार्ली या घाटाची लांबी किती आहे?
या घाटाची लांबी 14 किलोमीटर आहे.