Kunbi Samaj Information In Marathi आजकाल मराठा आरक्षण व कुणबी समाज या गोष्टी फारच चर्चेत आलेल्या आहेत, आणि यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन देखील कारणीभूत आहे. त्यामुळे कुणबी समाज म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल. कुणबी समाज म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी वर्ग होय.
कुणबी समाजची संपूर्ण माहिती Kunbi Samaj Information In Marathi
पूर्वीच्या काळी बारा बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. त्यामध्ये एक म्हणून कुणबी समाजाला ओळखले जात असे. हा समाज म्हणजे ग्रामीण भागातील शेती करून उदरनिर्वाह करणारा लोकांचा समूह असून, ही कुठलीही जात किंवा धर्म नाही, तर एक समाज आहे.
भारतामध्ये अनेक धन दांडगे शेतकरी असले, तरी देखील सीमांत व लहान शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याच शेतकऱ्यांच्या गटांचा मिळून कुणबी समाज तयार होत असतो. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, गोवा या ठिकाणी देखील कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतो.
मागासवर्गीय गटामध्ये समाविष्ट असलेला हा कुणबी समाज मुख्यतः शेती पिकवण्याचे कार्य करत असतो. या कुणबी समाजाने वेळेप्रमाणे बदलत अनेक क्षेत्रांमध्ये कार्य केलेले आहे. चौदाव्या शतकानंतर हा समाज शेतीसह सैन्य क्षेत्रामध्ये देखील दिसून येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील त्यांच्या सैन्यामध्ये असणारे मावळे हे मुख्यतः कुणबी समाजाचे होते. कुणबी हा मराठा समाजाचाच एक भाग आहे, असे देखील म्हटले जाते. आजच्या भागामध्ये आपण या कुणबी समाजाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | कुणबी |
प्रकार | समाज |
समावेश | कष्टकरी, मराठी शेतकरी |
गट | इतर मागास प्रवर्ग |
मुख्य गट | मराठा |
कार्य | शेती |
इतर कार्य | सैन्य |
कुणबी समाजाबद्दल ऐतिहासिक माहिती:
अनेक लोकांना कुणबी समाजाबद्दल गैरसमज असून, ते त्यांना कुणबी जात समाजत असतात. मात्र कुणबी ही जात नसून, एक समाज आहे, व तो मराठा या जातीतील एक उपप्रकार आहे. या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आढळून येते. त्याचबरोबर आसपासच्या राज्यांमध्ये देखील आढळून येते.
महाराष्ट्रातील सुमारे ३५ टक्के लोकसंख्या ही कुणबी समाजाची असून, ठाणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी यांसारख्या जिल्ह्यांमध्ये ही संख्या अधिक पटीने आहे. कुणबी लोकांद्वारे कुणबी ही एक बोलीभाषा बोलली जाते, मात्र या भाषेमध्ये ठिकाणानुसार विविध बदल होत जातात. तसेच शब्दांचे उच्चार देखील बदलत असतात.
या कुणबी समाजाला फार मोठा इतिहास लाभलेला असून, अगदी मनुस्मृती सारख्या ग्रंथांमध्ये देखील या कुणबी समाजाचे वर्णन आढळून येते. कुणबी समाजाचे नाव पडण्यामागे एक मोठी कहाणी असून, पूर्वीच्या काळी सहा बैल जोड्या किंवा बारा बैल ज्यांच्याकडे असतील, आणि त्या बैलांद्वारे नांगरल्या गेलेल्या जमिनीचा जो मालक असेल, अशा लोकांना कुलपती म्हणून ओळखले जात असे. पुढे या शब्दांचे हळूहळू अपभ्रंश होत गेले, आणि कुलपती पासून कुळवई, कुळवी, कुणवी आणि कुणबी असे शब्द उत्क्रांत होत गेले.
मराठा आणि कुणबी समाज:
मराठा ही हिंदू समाजातील एकच जात असून, त्या अंतर्गत कुणबी हा समाज येत असतो. कुणबी हा समाज कुठलीही स्पष्ट वेगळी जात नसून, मराठा समाजातीलच एक गट आहे. मराठा समाजामधील बहुतांश लोक वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांमध्ये गुतलेले असण्याबरोबर, शेती देखील करत असतात.
मराठा समाजाचे जे लोक शेती करतात, त्यांना कुणबी या गटाखाली वर्गीकृत केले जात असते? छत्रपती. शिवाजी महाराजांनी देखील या समाजाला आपल्या सैन्यामध्ये स्थान दिलेले असून, या समाजाला पूर्वीपासूनच प्रतिष्ठेचे समजले गेलेले आहे. मुख्यतः जमिनी ताब्यात असणाऱ्या लोकांना कुणबी गटाखाली वर्गीकृत केले जाते. या समाजाचे मुख्य व्यवसाय हा जमिनी कसने हाच असतो.
निष्कर्ष:
भारत हा एकसंध आणि विविधतेत एकता दाखवणारा देश असला, तरी देखील विविध प्रांतानुसार वेगवेगळ्या चालीरीती, बोलीभाषा, इत्यादी आढळून येत असतात. आणि त्यानुसारच समाजाचे वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, समाज इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. त्यातही मराठा समाज हा महाराष्ट्र मधील एक प्रमुख जातीचा समाज असून त्यामध्ये कुणबी या घटकांचा देखील समावेश होतो.
संपूर्ण देशाला शेती करून अन्न खाऊ घालणारे कष्टकरी वर्गातील लोक कुणबी असतात. कुणबी समाजाच्या मुख्य उद्देशांमध्ये शेती करणे असले, तरी देखील स्वराज्य काळामध्ये त्यांनी सैन्य दलामध्ये देखील कार्य केलेले आहे.
आजच्या भागामध्ये आपण या कुणबी समाजाबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. त्यामध्ये कुणबी समाज म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे, या शब्दाचा उगम तसेच कुणबी समाजाचा वारसा, मराठा व कुणबी यांच्यामधील असलेले साम्य व फरक, त्याचबरोबर काही प्रश्न उत्तरे इत्यादी बाबींवर माहिती बघितली आहे.
FAQ
कुणबी समाज म्हणजे काय?
कुणबी समाज हा मराठा समाजातील एक गटाचा प्रकार असून, या समाजामध्ये शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन समजले जाते.
कुणबी समाज हा पूर्वीच्या काळी कशाचा भाग होता?
पूर्वेच्या काळी बारा बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती, आणि याच पद्धतीचा एक भाग म्हणून कुणबी समाजाला ओळखले जात असे.
कुणबी शब्दाचा उगम कोणत्या स्वरूपाने झाला?
शेती करणाऱ्या गटाला कुणबी म्हणून ओळखले जायचे. त्यांच्यातील ज्या लोकांकडे बारा बैल असत, त्यांना कुलपती या नावाने ओळखले जाई. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत त्यापासून कुलवयी, कुळवी, कुणवी आणि कुणबी असे शब्द तयार झाले असावे, असे सांगितले जाते.
कुणबी समाज ही एक जात आहे की नाही?
कुणबी समाज ही एक जात नसून, मराठा जातीतील किंवा समाजातील शेतकरी कष्टकरी वर्गांचा हा एक गट आहे. तो एक व्यवसाय स्वरूपात ओळखला जातो.
कुणबी समाज ही एक जात आहे की नाही?
कुणबी समाज ही एक जात नसून, मराठा जातीतील किंवा समाजातील शेतकरी कष्टकरी वर्गांचा हा एक गट आहे. तो एक व्यवसाय स्वरूपात ओळखला जातो.
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्या पैकी कुणबी समाजाची लोकसंख्या किती टक्के आहे?
महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. यातील कुणबी या समाजाची लोकसंख्या टक्केवारीनुसार सुमारे ३५ टक्के इतकी आहे.