कुर्मा मराठी Kurma Recipe In Marathi कुर्मा हा वेग-वेगळा भाजीपाला वापरून बनवला जातो. हा खायाला एकदम स्वादिष्ट आणि पोष्टीक आहार आहे. कुर्मा दोन प्रकारे बनवला जातो, एक व्हेज कुर्मा, आणि दुसरा नॉनव्हेज कुर्मा हे दोन्ही प्रकार मसालेदार आहेत. भारतात विविध ठिकाणी कुर्मा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. कुर्मा हा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. याचा उपयोग जेवण करण्यासाठी पोळी किंवा भाकरी सोबत केला जातो.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट कुर्मा मिळतो. काही लोकांना कुर्मा रेसिपी खूप आवडते पण, त्याचा परिसरात स्वादिष्ट आणि मसालेदार कुर्मा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने चमचमीत व्हेज कुर्मा कसा बनवतात याची रेसिपी. आता आपण कुर्मा रेसिपी पाहणार आहोत.
कुर्मा मराठी Kurma Recipe In Marathi
कुर्म्याचे प्रकार :
कुर्मा हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. कुर्मा विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे कुर्मा, व्हेज कुर्मा, नॉनव्हेज कुर्मा, मसाला कुर्मा, चिकन कुर्मा, आलू कुर्मा, हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कुर्मा रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
कुर्माच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
कुर्मा तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
कुर्मा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
कुर्मा तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 45 मिनिट वेळ लागतो.
कुर्मासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 1 वाटी मटर.
2) अर्धी वाटी तीळ.
3) 2 ते 3 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
4) 2 बटाटे/आलू.
5) 1 कांदा.
6) 2 चमचे जिरे.
7) 2 चमचे धनिया पावडर.
8) 1 वाटी खोबरे.
9) 2 चमचे लाल मिरची पावडर.
10) 1 चमच हळद.
11) 1 चमच गरम मसाला.
12) तेल, मीठ.
13) थोडी कोथिंबीर.
पाककृती :
- सर्वात प्रथम भाजीपाला मटर, बटाटे, आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या, नंतर भाजीपाला चिरून घ्या.
- नंतर कांदा उभा चिरून घ्या, आणि लसन-अद्रक पेस्ट तयार करून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅस वरती एक खोल तळाची कढई ठेवा, आणि गरम करा, यामध्ये सुके खोबरे भाजून घ्या.
- खोबरे भाजून झाले की, एका प्लेटमध्ये काढा, नंतर तीळ आणि जिरे चांगल्या प्रकारे भाजून घ्या.
- नंतर एका प्लेटमध्ये काढा, थोडा कोरडा कांदा भाजा, आणि हे सर्व साहित्य खोबरे, तीळ, जिरे, कांदा आणि थोडी कोथिंबीर टाकून.
- मिक्सरच्या भांड्यात टाकून, बारीक पेस्ट तयार करा, आणि एका प्लेटमध्ये काढून, नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- नंतर गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेवा. त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, पाहिले यामध्ये थोडे जिरे टाका. जिरे चांगले फुटले की, यामध्ये बारीक कांदा टाका.
- कांदा चांगला पारदर्शी होऊ द्या, तो पर्यत परतवत रहा, कांदा थोडा लालसर झाला की, यामध्ये लसन-अद्रक पेस्ट टाका आणि कच्चा वास निघे पर्यत भाजून घ्या.
- नंतर यामध्ये धनीया पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला टाकून पूर्ण मिक्स करा.
- मसाला चांगला झाला की, यामध्ये आपण तयार केलेला खोबरे, तीळ, जिरे, यांचा पेस्ट टाका.
- आणि मसाल्यात पूर्ण मिक्स करून घ्या, नंतर यामध्ये 2 ते 3 कप गरम पाणी करून चांगले मिसळून घ्या.
- आता यामध्ये आपण कापून ठेवलेल्या भाज्या, बटाटे, मटर, आणि थोडी कोथिंबीर टाकून. 9 ते 10 मिनिट शिजू द्या.
- भाजीपाला चांगला शिजला की, यामध्ये चवीनुसार थोडे मीठ टाका, आणि वरून थोडी बारीक कोथिंबीर टाका.
- आता आपला मसालेदार आणि स्वादिष्ट व्हेज कुर्मा खाण्यासाठी तयार आहे. आपण चपाती, किंवा भाकरी सोबत थोडा कांदा आणि लिंबू घेऊन कुर्मा खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
कुर्मामध्ये असणारे घटक :
व्हेज कुर्मा हा एक पौष्टिक आहार आहे, जो वेग-वेगळ्या भाजीपाला पासून बनवला जातो. यामध्ये विविध घटक आहेत, जसे कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, चरबी, फॅट, मॅग्निशियॅम, प्रथिने, कर्बोदके, फायबर हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
व्हेज कुर्मा खाल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी प्रोटीन सारखे घटक मिळतात.
यामुळे आपले डोळे, केस, आणि त्वचा चांगली राहते, आणि शरीर निरोगी राहते.
यातील चरबी, फॅट, कर्बोदके, फायबर, हे आपल्या शरीरातील अवयव वाढवण्यास मदत करतात.
व्हेज कुर्मातील सर्व पौष्टिक घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
व्हेज कुर्मा हा एक पौष्टिक आहार आहे. आपण हा जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला मळ-मळ किंवा पोटदुखी होऊ शकते.
यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात गरजे पेक्षा जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
म्हणून व्हेज कुर्मा आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हेज कुर्मा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.