कुस्ती खेळाची संपूर्ण माहिती Kusti Game Information In Marathi

Kusti Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण कुस्ती या खेळाविषयी माहिती पाहणार आहोत.

Kusti Game Information In Marathi

कुस्ती खेळाची संपूर्ण माहिती Kusti Game Information In Marathi

महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले कि कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती.

होय, कुस्ती खेळ फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खेळल्या जातो. कुस्तीला हिंदी मध्ये ‘दंगल’ आणि इंग्रजी मध्ये ‘रेसलिंग (wrestling)‘ म्हटल्या जाते.

कुस्ती खेळाचा उगम भारतीय उपखंडात झाला असल्याचे समजते. कुस्तीला इंग्रजीत रेसलिंग असे म्हणतात. कुस्ती खेळातील खेळाडूंना मल्ल किंवा पैलवान असे संबोधले जाते.

कुस्ती हा आमच्या बाबांवर बाबांच्या काळापासून खेळला जाणारा खेळ आहे, जो आजही लोक खेळतात आणि पाहतात त्याच उत्कटतेने जे पूर्वीच्या काळात पाहिले जात होते. अनेक मोठे दिग्गज ज्यांनी कुस्तीच्या बळावर आपल्या देशाचे नावही रोशन केले आहे. जसे: दारा सिंग, सुलतान, गुलाम मोहम्मद, उदय चंद, सुशील कुमार सोलंकी, साक्षी मलिक, गीता फोगट. कुस्ती खेळातील ओलंपिक पदक मिळवणारे पहिले भारतीय खाशाबा जाधव हे आहेत व पाहिली भारतीय महिला साक्षी मलिक या आहेत.

आता आपण कुस्ती या खेळाचा इतिहास पाहू.

कुस्ती युद्धातील सर्वात जुना प्रकार आहे .प्राचीन भारतीय इतिहासात जेथे रामायण काळामध्ये बाली सुग्रीवाच्या युद्धाचे वर्णन आहे. त्यानंतर महाभारत काळात कृष्ण आणि बलराम यांच्या युद्धाचा उल्लेख आहे. गुहेच्या पेंटिंग द्वारे कुस्तीचा ऊगम पंधरा हजार वर्षांपूर्वीचा आहे.उत्पत्तीच्या पुस्तकात कुलपिता याकोबाने एका देवदूताशी युद्ध केले असे म्हणतात.

इलियाड, ज्यात होमरने इ.स.पू. 13 व्या किंवा 12 व्या शतकातील ट्रोजन युद्धाचे वर्णन केले आहे, त्यातही कुस्तीचा उल्लेख आहे. रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्यांमधील कुस्तीसह मार्शल आर्ट्सचे संदर्भ आहेत.

कुस्तीला प्राचीन ग्रीसमधील आख्यायिका आणि साहित्यात मोठे स्थान होते. कुस्ती स्पर्धा, बर्‍याच बाबींमध्ये क्रूर, प्राचीन ऑलिम्पिकमधील मध्यवर्ती खेळ म्हणून काम करत होती.

पहिली आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 1888 मध्ये न्यूयॉर्क शहरात झाली. 1904 च्या सेंट लुईस, मिसुरी येथे झालेल्या खेळांनंतर प्रत्येक आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती हा एक कार्यक्रम होता. आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) या खेळासाठी आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाची स्थापना 1912 मध्ये बेल्जियमच्या अँटवर्प येथे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएटेड रेसलिंग स्टाईलने (एफआयएलए) केली होती.

पहिली एनसीएए कुस्ती स्पर्धा देखील 1912 मध्ये आम्स, आयोवा येथे पार पडली. कोलोरॅडो स्प्रिंग्ज, कोलोरॅडो येथे राहणारी यूएसए रेसलिंग 1983 मध्ये अमेरिकन हौशी कुस्तीची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था झाली.

कुस्ती हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ आहे. राजे महाराज्यांपासून ते मुघल साम्राज्य आणि आज पर्यंत कुस्ती हा खेळ खेळला जातो. पूर्वीकाळी याला ‘मल्ल युद्ध’ म्हणून ओळखल्या जायचे. या खेळासाठी दांडग्या शरीरयष्टी सोबतच चपळ आणि तेज बुद्धिमत्तेची गरज असते.

महाराष्ट्रामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ हि कुस्तीची राज्य स्तरावरील स्पर्धा भरवण्यात येते. इतकेच नव्हे तर गावा गावात जत्रा आणि काही विशेष प्रसंगी कुस्ती स्पर्धेचे

मल्लविद्येचे माहेरघर म्हणून मान्यता पावलेल्या आपल्या देशात अजूनही‘कुस्ती’ म्हणजे ‘मातीवरील कुस्ती’ असे समीकरण मांडले जाते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मातीवरील कुस्तीला मान्यता नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये फ्री-स्टाइल (Free-style) आणि ग्रीको-रोमन (Greco-Roman) पद्धतींचा अवलंब केला जात असल्याने भारतीय मल्लांना नवीन तंत्रांची‚ नवीन नियमांची माहिती असणे अगत्याचे आहे.

कुस्ती हा भारताचा पारंपारिक खेळ आहे आणि मनोरंजनाचे खूप जुने साधन आहे. पूर्वी, जेव्हा टीव्ही युग नव्हते, तेव्हा कुस्ती स्पर्धा अनेकदा जत्रा किंवा सामाजिक प्रसंगी आयोजित केल्या जातात, ज्यात लोक सक्रियपणे सहभागी होतात. 1896 मध्ये आधुनिक ऑलिम्पिक खेळ सुरू झाले तेव्हा कुस्तीचा खेळ त्यात समाविष्ट करण्यात आला होता.

मित्रांनो, काळानुसार कुस्ती खेळाच्या कालावधीत बदल झाला आहे. पहिल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कुस्ती खेळाचा कालावधी 15 मिनिटांचा होता. नंतर नंतर ते प्रथम 9 मिनिट आणि नंतर 6 मिनिटांमध्ये बदलण्यात आले. कालांतराने पुन्हा एक बदल झाला आणि त्याचा कालावधी पुन्हा बदलला आणि 20 मिनिटे मग 10 मिनिटे 9 मिनिटे 6 मिनिटे केली. मित्रांनो आज कुस्तीचा कालावधी 5 मिनिटांचा आहे आणि 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी तो 4 मिनिटांचा आहे.

मातीवरील कुस्तीची सवय झाल्याने आपल्या मल्लांना नवीन तंत्रांशी जुळवून घेणे अवघड जाते. मातीऐवजी गादीवर (Mat) कुस्ती करावी लागते. कुस्ती अधिक गतिमान व्हावी म्हणून वेळेची बंधने आल्याने आता रेटारेटीची कुस्ती करून चालत नाही. कुस्ती चीतपट निकाली झाली नाही‚ तरी गुणाधिक्याने कुस्ती जिंकण्यासाठी कौशल्य पणास लावावे लागते.

भारतीय पद्धतीच्या कुस्तीच्या काही डावांना गादीवरील कुस्तीत मज्जाव असल्याने आणि कुस्तीचा खास पोशाख घालून कुस्ती करावी लागत असल्याने आपल्या मल्लांना काही अडचणी जाणवतात. त्यासाठी नवीन तंत्रे‚ नियम यांची अचूक माहिती असणे व सातत्याने गादीवरील कुस्तीचा सराव करणे याला पर्याय नाही.कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते.

या खेळात अनेक डाव असतात . उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.

कुस्ती विविध प्रकारांमध्ये येते, जसे की लोक शैली, फ्री स्टाईल, ग्रीको-रोमन, कॅच, सबमिशन, जूडो, साम्बो आणि इतर. कुस्ती ही दोन (कधीकधी अधिक) स्पर्धक किंवा विखुरलेल्या भागीदारांमधील शारिरीक स्पर्धा असते, जे उत्कृष्ट स्थान मिळवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न करतात.

कारण कुस्ती हा क्लिच फाइटिंग, थ्रो व टेकडाऊन, जॉइंट लॉक, पिन आणि अन्य झुंबड असणारी ताजेतवाने बनविणारी लढाई खेळ आहे. खेळ खरोखर स्पर्धात्मक किंवा क्रीडा मनोरंजन देखील असू शकतात.पंजाब हे कुस्ती किंवा पहेलवान यांच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कुश्ती किंवा भारतीय कुस्ती शिकण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

कुस्तीचा उगम भारतात झाला आहे.भारतात प्राचीन काळापासून कुस्ती लोकप्रिय आहे, हा प्रामुख्याने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा व्यायाम होता. मुघल राजवटीत जे तुर्को-मंगोल वंशाचे होते, इराणी आणि मंगोलियन कुस्तीचा प्रभाव स्थानिक मल्ल-युद्धामध्ये आधुनिक पेहलवानी तयार करण्यासाठी समाविष्ट करण्यात आला.

कुस्ती हा खेळ तसा अवघड आहे कारण खरे तर ट्रॅक आणि फील्डसोबतच पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. कुस्तीच्या सर्वोच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी, त्याला शारीरिक शक्ती, वेग, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक कणखरतेचा एक स्तर आवश्यक आहे ज्यामुळे तो भाग घेण्यासाठी सर्वात कठीण खेळांपैकी एक बनतो.

कुस्ती हा खेळ तसा अवघड आहेत तसेच त्याचे दुष्परिणाम पण आहेत.कारण कुस्ती हा शारीरिकदृष्ट्या खूप मागणी करणारा खेळ आहे,आपण अनेक खेळाडू पाहतो ज्यांना उच्च-प्रभाव फेकणे, वळणे आणि विशिष्ट विचलनामुळे दुखापत होते. यामुळे मोच, आघात (जखम), निखळणे, फ्रॅक्चर, आघात आणि अगदी गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कुस्ती खेळताना या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूला प्रशिक्षणाची जास्त गरज असते.

ज्या ठिकाणी कुस्ती खेळाचे प्रशिक्षण दिले जाते त्या जागेला आखाडा म्हटल्या जाते. कुस्ती शिकविणाऱ्या प्रशिक्षकांना गुरु किंवा उस्ताद असे म्हणतात. आखाड्यातील लाल मातीला तेल, दुध, तूप आणि ताक टाकून मऊ केल्या जाते. या मातीवर रोज हलके पाणी शिंपडल्या जाते. यामुळे माती निर्जंतुक तर होतेच सोबतच खेळाडूंना दुखापत देखील होत नाही.

खेळासाठी उपयुक्त असलेले व्यायाम येथे शिकविल्या जातो. तसेच विविध डाव-पेच आणि पकड सुद्धा शिकविल्या जाते. मल्लांना विशिष्ट खुराक बद्दल सांगितल्या जाते. तसेच कुस्तीताला एक पूरक व्यायाम प्रकार मल्लखांब बद्दल देखील प्रशिक्षण दिल्या जाते.

सीनिअर गटात खेळणाऱ्या कुस्तीगिराचे वजन ९७ कि.ग्रॅमपेक्षा अधिक असल्याशिवाय त्याला शेवटच्या गटामध्ये (९७ ते १२५ कि.ग्रॅम) खेळता येणार नाही.

पोशाख कसा असावा

कुस्तीगिराने योग्य रंगाचा (लाल अगर निळा) घट्ट बसणारा खास पोशाख (Costume) वापरला पाहिजे. स्पर्धेच्या वेळी जोडीतील वरच्या क्रमांकाचा कुस्तीगीर लाल पोशाख व खालच्या क्रमांकाचा कुस्तीगीर निळा पोशाख वापरील. टाचा किंवा खिळे नसलेले‚ सपाट व पातळ तळाचे‚ घोटे झाकले जातील असे घट्ट बसणारे शूज वापरावेत. स्पर्धकाजवळ एक हातरुमाल असावा. (बुटाच्या बंदाच्या टोकाला धातूचे आवरण नसावे).

धातूचा करगोटा‚ अंगठी‚ पेटी किंवा ताईत अशा प्रकारच्या‚ प्रतिस्पर्ध्याला दुखापत होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू अंगावर धारण करता येणार नाहीत. स्पर्धकांची नखे काढलेली असावीत.

अंगाला तेलकट किंवा निसरडे पदार्थ लावता येणार नाहीत. तसेच घामेजलेल्या अंगाने गादीवर येता येणार नाही.

स्पर्धकाने कुस्तीच्या दिवशी दाढी केलेली असावी.

स्पर्धकाला पातळ गुडघापट्टी वापरता येईल. परंतु मनगट‚ हात व घोटा येथे पट्टी वापरता येणार नाही. (जखमेचे संरक्षण करण्यासाठी किंवा डॉक्टरचे तसे सर्टिफिकेट असेल‚ तर मनगटपट्टी वापरता येईल.

खेळाचे मैदान चौरस किंवा वर्तुळाकार असू शकते. मैदानात लाल माती किंवा रबरी चटई टाकून कुस्ती खेळली जाते.

हल्ली या खेळासाठी वर्तुळाकार रबरी चटईच्या मैदानाचा उपयोग केल्या जातो. यामध्ये एक मध्य वर्तुळ असते. या वर्तुळाचा व्यास १ मी. असतो.

त्याबाहेर आणखी एक वर्तुळ असते ज्याचा व्यास ७ मी असतो. त्यानंतर रेड झोन असतो. रेड झोन चा व्यास १ मी असतो. या पासून १.५ मी अंतरावर १२ मी लांबी व रुंदी असलेला चौरस असतो.

कुस्तीचे नियम

या खेळाचे नियम साधे आणि सोपे आहेत. हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो. प्रत्येक खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर लोळवण्याचा प्रयत्न करत असतो. विजयी होण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचा खांदा आणि कंबर जमिनीवर टेकवावी लागते. कुस्तीचा सामना सारख्या वजन गटातील खेळाडूंमध्ये खेळला जातो.

मुक्त कुस्ती स्पर्धा ही १२ मिनिटांची असते. या वेळेत जो खेळाडू जास्तीत जास्त गुण मिळवतो, त्याला विजयी घोषित केल्या जाते. विजयी खेळाडूच्या खेळात दोष आढळल्यास कमी गुण असलेला खेळाडू विजयी ठरतो.

या खेळात अनेक डाव-पेच असतात जसे कि, धोबीपछाड, उभा कलाजंग, आतील टांग, निकाल इ. खेळाडू कुठला डाव वापरून समोरील खेळाडूला चित करतो हे पाहण्यासारखे असते. यातील काही डावांना अधिक गुण दिले जातात.

कुस्ती या खेळामध्ये गुण मिळवण्याचे मार्ग

टेकडाउन :

टेकडाउन हा एक गुण मिळवण्याचा मार्ग आहे ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला जमिनीकडे किवा मॅटकडे नेण्यासाठी आणि तिथे त्याला नियंत्रित करण्यासाठी २ गुण मिळत असतात

सुटका :

जर प्रतिस्पर्ध्याने एक खेळाडूला जमिनीकडे किवा मॅटकडे नेले असेल आणि तेथे नियंत्रित केले असेल आणि त्यामधून जर सुटका करता आली तर १ गुण मिळू शकतो.

उलट :

जेव्हा प्रतिस्पर्ध्याने जमिनीकडे किवा मॅटकडे नेले असेल पण तुम्ही त्याला उलटून जमिनीकडे किवा मॅटकडे नेले आणि नियंत्रित केले तर त्याचे २ गुण मिळू शकतात.

पेनल्टी पॉइंट्स :

जर खालील नियमांचे उल्लंघन केल्यास प्रतिस्पर्ध्याला १ किवा २ गुण दिले जातात.

बेकायदेशीर होल्ड्स –

शे अनेक नियम आहे जेथे रेफरी आपल्याला चेतावणी न देता दंड लावेल.

तांत्रिक उल्लंघन –

कुस्ती टाळण्यासाठी जमिन किवा मॅट सोडून किवा आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिन किवा मॅटच्या बाहेर नेले तर प्रतिस्पर्ध्याला त्याचे गुण मिळतात तसेच रेफरीच्या परवानगी शिवाय मॅट सोडले तर त्याचे गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतात.

चुकीची सुरुवात केली तर गुण गमाण्याची शक्यता असते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment