Ladyfinger Vegetable Information In Marathi सर्वत्र प्रसिद्ध असणारी भाजी म्हणजे भेंडी होय. अगदीच कुरकुरीत बनणारी ही भेंडी अनेक प्रकारे खाल्ली जाते मात्र याची पातळ भाजी बनवता येत नाही. मित्रांनो भेंडी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून किंवा उभी चिरून त्यात मसाला भरून भरलेली भेंडी, भेंडी भुजिया सब्जी यासारख्या विविध प्रकारांनी बनवून खाल्ली जाते.
भेंडी फळभाजीची संपूर्ण माहिती Ladyfinger Vegetable Information In Marathi
भेंडीची चव अप्रतिम असल्यामुळे अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच ही भेंडी फार आवडत असते. अगदी मसाले घालून छान कुरकुरीत केलेली भेंडी कधी संपून जाते हे कळत देखील नाही. भेंडीची मसालेदार भाजी करण्याबरोबरच त्यापासून सूप सांबर रायता आणि करी यांसारखे पदार्थ देखील काही भागांमध्ये बनवले जात असतात. आजच्या भागामध्ये आपण या भेंडीच्या भाजी बद्दल माहिती घेणार आहोत तसेच त्याचे विविध फायदे देखील जाणून घेणार आहोत.
नाव | भेंडी |
प्रकार | भाजी |
उपप्रकार | फळभाजी |
शास्त्रीय नाव | Abelmoschus esculentus |
ऑर्डर | malvacae |
कुळ अथवा कुटुंब | Malvaceae |
भेंडी म्हणजे काय?
हाताच्या बोटासारखी सडपातळ लांब भाजी म्हणजे भेंडीची भाजी होय. हाताच्या बोटांप्रमाणे लांब असल्यामुळे तिला लेडीज फिंगर असे नाव आहे. या भेंडीच्या वनस्पतीवर संपूर्णतः अगदी छोटे छोटे बारीक केसाळ काटे असतात. भेंडीची फुले ही पिवळ्या रंगांमध्ये येतात मात्र त्याची फळे होता होता ती हिरवी रंगाची होतात व भेंडीची फळे पुढील बाजूस टोकदार व निमुळती होत गेलेली असतात आणि त्यावर अनेक शिरा आढळून येतात.
या भेंडीमध्ये आतील बाजूस पाच कप्पे असतात ज्यामध्ये अनेक चिकट पदार्थ लागलेल्या बिया असतात. या भेंडीच्या सेवनामुळे वात पित्त यांसारखे रोग आणि बद्धकोष्ठतेच्या संदर्भातील विकार दूर होण्यास मदत होते.
भेंडी सेवनाचे आरोग्यदायी फायदे:
मित्रांनो भेंडी मध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी गुणधर्म आढळून येत असतात त्यामध्ये विटामिन सी विविध प्रकारची खनिजे यांचा समावेश होत असतो आणि यामुळे अनेक प्रकारच्या आजारांवर मात केली जाऊ शकते.
भेंडी ही मधुमेहावर अतिशय गुणकारी ठरत असते. मधुमेह हा काही आजार नसून शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची एक स्थिती आहे जी नेहमी नेहमी उद्भवू शकते. मात्र नेहमी भेंडी खाल्ल्यामुळे या साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाऊ शकते. एन.सी बी.आय अर्थात नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार भेंडी मध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात हे सिद्ध झालेले आहे तसेच भेंडीच्या सेवनाने साखर वाढत नाही.
ज्या लोकांना पचनासंदर्भातील आजार असतील त्यांच्यासाठी सुद्धा भेंडीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. जर अन्न पचत नसेल तर इतर अनेक आजारांना निमंत्रण मिळते त्यामुळे पचन व्यवस्थित होणे अतिशय महत्त्वाचे ठरते आणि यासाठी भेंडी अतिशय फायदेशीर ठरत असते.
यासोबतच हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा भेंडीचे सेवन अतिशय फायदेशीर ठरत असते. भेंडी मध्ये उपलब्ध असणाऱ्या फायबरमुळे सिरम कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हृदय अगदी निरोगी होते आणि हृदयरोगाचा धोका टळला जातो.
भेंडीचे सेवन कर्करोगासाठी सुद्धा खूपच फायदेशीर ठरते. मित्रांनो आज काल कर्करोग खूप भयंकर स्वरूप धारण करत आहे आणि या कर्करोगावर प्रभावी इलाज म्हणून भेंडी सिद्ध झालेली आहे दिसून आलेली आहे. भेंडीतील फायबर आणि कोलन कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकत नसले तरी देखील काही प्रमाणात त्याचा धोका टाळण्यास मदत करत असतात.
तसेच भेंडीमध्ये ट्यूमर न होऊ देण्यासाठी चे गुणधर्म आढळतात त्यामुळे ज्या रुग्णांना स्तनाचा कॅन्सर असेल अशांसाठी अनियंत्रित वाढणाऱ्या पेशी रोखण्याकरिता भेंडीचे सेवन खूपच प्रभावी ठरत असते.
भेंडीचे विविध उपयोग:
- भेंडीच्या फायद्याबरोबरच तिचे अनेक प्रकारे उपयोग देखील आहेत. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे भेंडी पासून रोजच्या आहारासाठी भाजी बनविले जाऊ शकते.
- याबरोबरच अनेक प्रदेशांमध्ये भेंडी पासून लोणचे देखील तयार केले जाते जे चवीला अतिशय उत्कृष्ट असते आणि सर्वत्र खूपच लोकप्रिय आहे.
- भेंडी आणि बटाटा सोबत शिजवून मस्त व्हेज भाजी बनते. भेंडीला इतर भाज्यांसोबत शिजवल्यामुळे तिला एका चांगलीच चव येत असते.
- अनेक ठिकाणी कोवळी भेंडी तळून खाल्ली जाते ज्याची चव अगदी अप्रतिम असते.
- त्वचेच्या सौंदर्यासाठी व घनदाट केसांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर भेंडीचे सेवन करणे फायदेशीर मानले गेलेले आहे.
- भेंडी हे एक पूरक आहार म्हणून देखील घेतले जाऊ शकते मात्र यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरते.
भेंडी खरेदी करताना कशी निवडावी?
भेंडीची चव ही योग्य भेंडी निवडण्यावर अवलंबून असते. जास्त परिपक्व झालेली भेंडी खाल्ल्यास ती खाताना करकर लागते तसेच तिची चव देखील खूपच बिघडते त्यामुळे भेंडी निवडताना नेहमी दाबून बघावी. सहजतेने दबली गेलेली भेंडी असेल तरच घ्यावी. जास्त परिपक्व भेंडी घेण्यास प्राधान्य देऊ नये.
यासोबतच या भेंडीवर कुठल्या रासायनिक औषधांची किंवा कीटकनाशकांची फवारणी केल्याचे डाग आहेत का याची देखील चाचणी करावी कारण आजकाल बाजारात विकण्या अगोदरच काही तास फवारणी केली जाते जे शरीरासाठी खूपच घातक असते म्हणून अशा भेंड्या विकत घेणे शक्यतो टाळावे.
निष्कर्ष:
आवडणारी भाजी म्हणून भेंडीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अतिशय कोवळी लुसलुशीत भेंडी बघून प्रत्येकाच्याच मनामध्ये भूक जागी होते आणि त्यात जर मसालेदार भरली भेंडी केली असेल तर मग मात्र विचारू नका. आजच्या भागामध्ये आपण भेंडी या फळभाजी विषयी माहिती पाहिली.
त्यामध्ये तुम्हाला भेंडी म्हणजे काय? भेंडीला इतर भाषेमध्ये काय नावे आहेत? तसेच भेंडी द्वारे शरीराला काय काय फायदे मिळतात? तसेच मधुमेह पचनशक्ती मध्ये वाढ करणे हृदयरोग कर्करोग बद्धकोष्ठता डोळ्यांचे विकार लठ्ठपणा रक्तदाब इत्यादी समस्यांमध्ये भेंडीचा वापर कशा पद्धतीने केला जातो इत्यादी माहिती बघितलेली आहे.
याशिवाय भेंडीचे उपयोग काय काय आहेत भेंडी कशी निवडावी आणि भाजी करण्याकरिता कशा रीतीने वापरावी अति भेंडी खाल्ल्यामुळे काय दुष्परिणाम होतात तसेच घरच्या परसबागेमध्ये भेंडी कशी लावावी इत्यादी गोष्टी बघितलेल्या आहेत.
FAQ
भेंडीचे इंग्रजी भाषेतील नाव काय आहे?
भेंडीचे इंग्रजी भाषेमधील नाव लेडी फिंगर असे आहे.
भेंडीचे शास्त्रीय भाषेतील नाव काय आहे?
भेंडीचे शास्त्रीय भाषेतील नाव Abelmoschus esculentus
अति प्रमाणात भेंडी खाल्ल्यामुळे कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?
अतिप्रमाणात भेंडी खाल्ल्यामुळे त्वचेवर वेगवेगळ्या विकृती दिसून येऊ शकतात तसेच किडनी स्टोन देखील होऊ शकतो. पोटाच्या समस्या जाणवू शकतात आणि रक्त पातळ होण्याऐवजी घट्ट होऊ शकते.
सौंदर्यप्रसादानामध्ये भेंडीचा वापर कशा प्रकारे केला जातो?
सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्वचेवर लावण्यासाठी भेंडीचा वापर केला जातो कारण भेंडीमध्ये जीवनसत्व क आढळून येत असते त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीरातील जुन्या मृत पेशी निघून जाण्यास मदत मिळते तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील कंडिशनर म्हणून भेंडी लावली जाते.
संस्कृत भाषेमध्ये भेंडीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
संस्कृत भाषेमध्ये भेंडीला तींडीशा, भेंडा, करपर्णफल, आणि गंधमुला इत्यादी नावांनी ओळखले जाते.
आजच्या भागामध्ये आपण भेंडी या फळभाजी विषयी माहिती पाहिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्याकडे भेंडीची एखादी वेगळी रेसिपी असेल तर ती देखील कमेंट मध्ये नक्की कळवा. चांगल्या रेसिपीला नक्कीच नवीन लेखाद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल तसेच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना वाचायला मिळाली याकरिता त्यांच्यासोबत शेअर देखील करा.
धन्यवाद!!!