लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी मराठी Lal Bhopalyache Gharge Recipe in Marathi

लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी मराठी Lal Bhopalyache Gharge Recipe in Marathi भारत हा देश त्याच्या पारंपारिक खाद्य संस्कृतीसाठी ओळखला जातो. हिंदू धर्मांमध्ये धार्मिक सणांना खूप महत्त्व असते त्यामध्ये नॉनव्हेज सारखे पदार्थ वर्ज केले जातात. तसेच बऱ्याचदा चतुर्मासातही वांगी, लसूण व कांदे हे पदार्थ लोक खात नाहीत. त्यामुळे लाल भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पारंपारिक पद्धतीने या काळात केली जाते. आजही ग्रामीण भागामध्ये आपल्याला या रेसिपीज बघायला मिळतात. ज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व पौष्टिक असतात. तर चला मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी मराठी

लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी मराठी Lal Bhopalyache Gharge Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

लाल भोपळ्याचे घारगे हा फार पूर्वीपासून तयार होत येणारा पारंपारिक पदार्थ आहे. लाल भोपळ्याचे घारगे हा एक शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला लाल भोपळा किसून घ्यावा लागतो. भोपळा किसून घातल्यानंतर त्यामध्ये गूळ सुद्धा किसून घातल्या जातो. हे मिश्रण शिजवले जाते व त्यानंतर थंड झाले की, त्यामध्ये जेवढे मावेल तेवढे गव्हाचे पीठ घालून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून जाड पुरीप्रमाणे लाटून तेलातून तळले जाते. घारगे ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व पौष्टिक आहे. तसेच अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते. तर चला मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण सात व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान एक तास एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

ही रेसिपी पूर्णतः तयार करण्यासाठी आपल्याला 1 तास 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) तीन वाट्या लाल भोपळ्याचा कीस
2) दीड वाटी गूळ
3) अर्धी वाटी तांदुळाचे पीठ
4) अंदाजे गव्हाचे पीठ
5) मीठ चवीनुसार
6) दोन चमचे तूप
7) दोन वाट्या तेल

पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला लाल भोपळा बारीक किसून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून किसलेला भोपळा छान असा परतून घ्यायचा आहे.
  • भोपळा थोडा शिजत आला की त्यामध्ये किसलेला दीड वाटी गूळ घालून हे मिश्रण छान हलवत राहा.
  • गुळाचा पाक तयार व्हायला सुरुवात झाली की भोपळा आणि गुड एकजीव चांगला शिजवून तयार होतो.
  • हे मिश्रण शिजवून तयार झाले की थोडा वेळ गार होऊ द्या नंतर या मिश्रणामध्ये तांदळाचे पीठ थोडेसे मीठ व त्यात बसेल तेवढे गव्हाचे पीठ घालून घ्या.
  • हे पीठ हातांनी मोडून घ्या त्यामध्ये तेल, पाणी कशाचाही वापर न करता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे.
  • पीठ मळून झाल्यावर पंधरा मिनिटे बाजूला ठेवायचे आहे.
  • त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून तेल घालून मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
  • पंधरा मिनिटांनी तेल न लावता थोडेसे जाडसर घारगे लाटून, त्या तेलामध्ये मध्यम आचेवर लालसर तळून घ्या.
  • नंतर हे घारगे थंड झाल्यावर तुपासोबत किंवा तसेही खायला खूप छान लागतात.

पोषक घटक :

लाल भोपळ्यामध्ये विटामिन ई विटामिन ए आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच त्यामध्ये आयर्न देखील बऱ्याच प्रमाणात आढळून येतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.
लाल भोपळ्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आहे.

फायदे :

लाल भोपळ्यामध्ये विटामिन ए, सी तसेच लोह मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे लाल भोपळा खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

तसेच आरोग्य विषयीच्या बऱ्याच समस्या देखील दूर होतात.

लाल भोपळ्यामध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या डोळ्यांचे संरक्षण करते डोळ्यातील रेटिना सुरक्षित राहण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात.

आहारामध्ये नियमित लाल भोपळ्याचा समावेश केल्याने मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणारे डोळ्यांच्या समस्या नियंत्रणात राहतात.

बऱ्याचदा आपल्याला वाढत्या वजनाचा खूपच त्रास होतो अशा व्यक्तींनी लाल भोपळ्याची भाजी खावी. तसेच भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात, शरीरातील फॅट देखील कमी होतात, भुकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे आपले वजन देखील कमी होते.

तोटे :

लाल भोपळ्याचे घारगे खाणे आपल्याकरिता पोषक असले तरी देखील ते एक तळलेले पदार्थ आहे. त्यामुळे त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

आपण जर लाल भोपळ्याचे घारगे जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्याला मळमळ किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा. तसेच ही रेसिपी घरी तयार करून बघायला विसरू नका.

Leave a Comment