लॅपटॉप म्हणजे काय | laptop information in Marathi

लॅपटॉप म्हणजे काय | laptop information in Marathi

काय तुम्ही कधी लॅपटॉप चा वापर केला आहे का? जर याच उत्तर हो असेल तर याविषयी तुम्हाला नक्कीच माहिती असेल. जरी नसेल तरी काही घाबरायची नाही. कारण आज आपण या लेखामध्ये आपण जाणून घेऊ या की लॅपटॉप म्हणजे काय (laptop information in Marathi) आणि त्याचे फायदे काय आहेत.

Latest Technology च्या Development मुळे आपल जीवन खूप सुधारलं आहे. आणि आताची पिढी याचा पुरेपूर फायदा करून घेत आहे. आजच्या काळात मानव पूर्णपणे टेक्नॉलॉजी वर अवलंबून आहे आणि आपली सर्व कामे Latest उपलब्ध मशीन आणि Gadgets ने पूर्ण करत आहे. उदाहरणार्थ आपण Cars, Planes, Trains चा वापर करतो लांब अंतर जाण्यासाठी. तसेच दुसऱ्या बरोबर कमुनिकेशन करण्यासाठी आपण मोबाईल फोन आणि टेलिफोन चा वापर करतो.

अश्यातच आपण आपलं Official work असेल किंवा काही दुसरं काम असेल तर ते करण्यासाठी आपण कॉम्प्युटर चा वापर करतो. आता कॉम्प्युटर सुद्धा आपल्याला जुन्या काळात असल्यासारखा वाटू लागला आहे कारण तो एकाच जागी असतो ना! त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्रास होतो ना. हीच समस्या सोडवण्यासाठी लॅपटॉप चा शोध लागला.

लॅपटॉप आणि टॅब्लेट सुद्धा आता कॉम्प्युटर आणि मोबाईल प्रमाणे फिचर्स देऊ लागल्यामुळे लोक आता कॉम्प्युटर वर जास्त अवलंबून राहत नाहीत. त्याबरोबरच लॅपटॉप चा वापर ते कोठेही करू शकतात.

त्यामुळेच आज आपण लॅपटॉप म्हणजे काय (What is laptop in Marathi), लॅपटॉप चे फायदे काय आहेत (Advantages of Laptop in Marathi) यांची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हालाही याबद्दल पूर्ण माहिती मिळेल.

लॅपटॉप म्हणजे काय (What is laptop in Marathi):

लॅपटॉप एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे, ज्याला आपण Notebook Computer सुद्धा म्हणतो. हा एक बॅटरी वर चालणारा कॉम्प्युटर असतो, जो की सामान्यतः लहान आकाराचा असतो. याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते. याबरोबरच याचा वापर आपण कोठेही करू शकतो जसं की पुस्तकालय, विमान, ऑफिस आणि मीटिंग मध्ये सुद्धा.

आता अनेक प्रकारचे लॅपटॉप बाजारात येत आहेत. आणि त्यामुळे लॅपटॉप कॉम्प्युटर चे Manufactures सुद्धा वाढले आहेत. IBM, Apple, Compaq, Dell, Toshiba, Acer, Asus इत्यादी काही लॅपटॉप Manufactures आहेत.

लॅपटॉप कम्प्युटर चा विचार केला तर यांची किंमत खूप जास्त असते कॉम्प्युटर च्या तुलनेने. अस यामुळे असतं कारण लॅपटॉप ला डिझाइन आणि Manufacture करणं खूप कठीण काम असतं.

लॅपटॉप मध्ये जो डिस्प्ले वापरला जातो तो Thin Screen Technology चा वापरला जातो. ही thin film transistor किंवा Active Matrix Screen खुप bright असते. आणि पाहायला सुद्धा ही खूप सुंदर दिसते.

लॅपटॉप चे फायदे (Advantages of Laptop in Marathi):

Portable Device:

लॅपटॉप खूप पोर्टेबल असतात. ज्यामुळे आपण यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो.

लॅपटॉप बॅटरी:

लॅपटॉप ची बॅटरी खूप वेळेपर्यंत चालते. त्यामुळे आपण पॉवर सप्लाय नसतानासुद्धा काही वेळपर्यंत लॅपटॉप वापरू शकतो. खासकरून प्रवासा दरम्यान हे जास्त उपयोगी पडते. साधारणपणे एका Laptop ची बॅटरी 3 तास चालते.

लॅपटॉप चा आकार:

जर आपण डेस्कटॉप बरोबर तुलना केली तर लॅपटॉप चा आकार लहान असतो. परंतु यावर आपण सर्व कामे करू शकतो की कामे आपण डेस्कटॉप वर करू शकतो. आकार लहान असल्यामुळे ऑफिस, शाळा, कॉलेज मध्ये सहजपणे नेऊ शकतो.

कीबोर्ड आणि माऊस गरज पडत नाही:

कारण यामध्ये Inbuilt कीबोर्ड असतो ज्यामध्ये आपण माऊस च सुद्धा काम करू शकतो. यामुळे आपल्याला External keyboard आणि माऊस ची गरज पडत नाही.

Internal Speakers:

लॅपटॉप मध्ये इंटर्नल स्पीकर सुद्धा असतात. ज्यामुळे आपल्याला कोठेही External speaker नेण्याची गरज पडत नाही.

वायफाय आणि ब्लूटूथ:

लॅपटॉप मध्ये wifi आणि blutooth ची सुद्धा सुविधा असते. ज्यामुळे आपण अगदी सहजपणे इंटरनेट वापरू शकतो. आणि एका device मधून दुसऱ्या device मध्ये फाइल्स पाठवू शकतो.

कमी वीज:

डेस्कटॉप च्या तुलनेने laptop मध्ये low power लागते. यामुळे आपलं electricity bill सुद्धा कमी येऊ शकतं.

लॅपटॉप चे तोटे (Disadvantages of laptop in Marathi):

महाग:

इतर कॉम्प्युटर च्या तुलनेने laptop जास्त महाग असतात. कारण त्याच फिचर्स चा डेस्कटॉप आपल्याला खूप कमी पैश्यात मिळू शकतो.

दुरुस्त करण्यास अडचण:

सर्व गोष्टी लॅपटॉप मध्ये च इंस्टॉल असल्यामुळे दुरुस्त करताना अनेक अडचणी येऊ शकतात डेस्कटॉप च्या तुलनेने. याशिवाय याचे components सुधा महाग असतात. दुरुस्त करण्यास अवघड असल्यामुळे कॉम्प्युटर एक्स्पर्ट सुद्धा आपल्याकडून जास्त चार्ज करू शकतो.

Customization करणे अवघड आहे:

या device मध्ये customization करणे आणि हार्डवेअर upgrade करणे खूप अवघड काम असतं. यासाठी आपल्याला कॉम्प्युटर एक्स्पर्ट ची गरज पडते.

खूप लवकर टेक्नॉलॉजी जुनी होते:

जसं की आपल्याला माहीतच आहे Technology दिवसेंदिवस upgrade होत चालली आहे. यामध्ये आपण जर एक नवीन लॅपटॉप विकत घेतला तर त्याच्या काही महिन्यातच त्याचा upgrade Version येइल. त्याबरोबरच आपण खरेदी केलेला लॅपटॉप स्वस्त होईल आणि त्याची टेक्नॉलॉजी जुनी होईल.

निष्कर्ष:
तर मित्रांनो आशा करतो की लॅपटॉप म्हणजे काय (laptop information in Marathi) हा लेख तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला माहित असलेले काही लॅपटॉप चे फायदे आणि तोटे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment