Lata Mangeshkar Information In Marathi लता मंगेशकर यांना भारताची कोकिला असे म्हटले जाते. लता मंगेशकर ह्या गायन मध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यांच्या आवाजाची चर्चा ही जगभरात केल्या जाते. त्यांना प्रेमाने दीदी असे म्हणतात. त्यांचा आवाज हा खूपच मधुर आणि सुरेला आहे त्यांची नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये सुद्धा रेकॉर्ड केल्या गेलेले आहे. त्यांची सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम आहे त्यांनी 1948 या काळापासून त्यांनी तीस ते चाळीस हजार गाणे गायले आहे.

लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi
लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा गळा हा संशोधनासाठी पाठवण्यात आला होता. त्यांचा आवाज एवढा मधुर कसा आहे? तसेच आज सर्व गायक ते लहान असो किंवा वृद्ध असो लता दीदींना संगीताची देवी मानतात तसेच त्यांचे गाणे ऐकायला सुद्धा खूप आवडतात. त्यांना लहानपणी हेमा या नावाने ओळखले जात होते. लतादीदींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर लग्न न करता संगीतालाच आपला धर्म, गुरु व कर्म मानत पांढऱ्या साडी मध्ये आपले जीवन व्यतीत केले.
लता मंगेशकर यांचा जन्म व बालपण :
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्य प्रदेश मधील इंदूर या शहरात झाला. त्यांना चार भावंडे होती, तीन बहिणी आणि एक भाऊ असे होते. लता ही सर्वात मोठी होती. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर असे होते तर आईचे नाव शेवंती असे होते. त्यांचे वडिल एक शास्त्रीय गायक होते. तसेच ते नाट्य कलावंत होते.
लता ही त्यांच्या आई-वडिलांची सर्वात मोठी मुलगी होती. त्यानंतर तिला आशा उषा मीना आणि हृदयनाथ असे लहान भावंड होते. लता जी यांना संगीताचे धडे त्यांच्या वडिलांकडून आपल्या घरी मिळाले. त्यांच्या पाच वर्षाच्या वयामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला जणू काही मोहिनीच घातली आहे. त्यांचा आवाज किंवा त्यांची गाणी आज अजरामर झालेले आहेत त्यांचे बालपण हे सांगलीमध्ये गेले.
लतादीदींचे शिक्षण :
लता दीदींना बाल वयातच संगीताची आवड निर्माण झाली व त्यांना आपल्या घरूनच संगीताचे धडे मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी सांगलीतील मारुती चौकातील दांडेकर मोर्चा जवळील अकरा नंबरच्या सरकारी शाळेमध्ये आपल्या लहान भावंडांसह शिकायला जाण्यास सुरुवात केली.
एक दिवशी त्यांची छोटी बहीण आशा रडू लागली तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले तेव्हापासून लतादीदींनी शाळेत जाणे बंद केले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंब हे सांगली शहर सोडून गेले.
लतादीदींची चित्रपट कारकीर्द :
1942 मध्ये लता मंगेशकर ह्या तेरा वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील हृदयविकाराने मरण पावले. तेव्हा नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी त्यांच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम करण्यास सांगितले.
लता यांनी नाचूया गडे खेळू सारी माननीय भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकर यांच्या ‘किती हालचाल’ या मराठी चित्रपटासाठी गायले ; परंतु हे गाणे चित्रपटातून वगळले गेले मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगाच्या आधी मंगळागौरी या चित्रपटातील एक छोटीशी भूमिका दिली.
त्या चित्रपटात त्यांनी “नटली चित्राची नवलाई” हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले होते. 1945 मध्ये ते मास्टरविनायकांच्या कंपनी कार्यालयाचे स्थानानंतर मुंबईमध्ये झाले तेव्हा लता मंगेशकर सुद्धा मुंबईला आल्या आणि त्या उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून हिंदुस्तानी शस्त्र संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा मे या हिंदी चित्रपटासाठी हे गाणे गायले होते.
लता आणि आशा यांनी मास्टरविनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात नूरजहांसोबत छोट्या भूमीत साकारल्या होत्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणो मे हे भजन सुद्धा गायले होते मास्टरविनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या रेकॉर्डच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली होती.
1947 मध्ये भारताच्या फाळणी नंतर उस्ताद अमानत अली खान हे नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर करून गेले. तेव्हा लतादीदी अमानत हा यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला आल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा कडून लतादीदींना तालीम मिळाली. त्यानंतर 1948 मध्ये मास्टरविनायकांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींना मार्गदर्शन केले. त्या काळामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये मुलगा शमशाद बेगम आणि जोहराबाई यांच्यासारख्या आणून नासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका खूप लोकप्रिय झाल्या होत्या.
स्वातंत्र्यानंतरची लतादीदींची गाणे :
1950 च्या दशकामध्ये लतादीदींनी ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायली. लतादीदींच्या आवाज ऐकून मोठे दिग्दर्शक सुद्धा लतादीदींना काम करण्यासाठी आग्रह करू लागले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असा त्यांना सर्वप्रथम फिल्म फेअर अवार्ड मिळाला. लतादीदींनी अनेक हिंदी व मराठी गाणी सुद्धा गायली होती तसेच त्यांची ती गाणी आज अजरामर झाले आहेत. 1962 मध्ये त्यांना दुसरा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
“बीस साल बाद” हा चित्रपट त्यासाली प्रदर्शित झाला होता. “कही दीप जले कही दिल” या गाण्यासाठी लताजींना हा पुरस्कार दिला होता. त्यानंतर 1963 मध्ये “ए मेरे वतन के लोगो” कवी प्रदीप यांनी लिहिलेलं व श्री रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीत लतादीदींनी गायले, तेव्हा भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे उपस्थित होते.
हे देशभक्तीवर आधारित गीत असून लतादीदींनी त्यांच्या आवाजात या गीताला अशी काही स्वरांची जादू केली की देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहताना पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अश्रूणावर झाले होते.
लता मंगेशकर यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार :
लता मंगेशकर यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त वन टाइम अचीवमेंट हा सन्मान मिळालेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना राष्ट्रीय पुरस्कार व महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
भारत सरकारचा पुरस्कार :
- 1969 – पद्मभूषण
- 1989 – दादासाहेब फाळके पुरस्कार
- 1999 – पद्मविभूषण
- 2001 – भारतरत्न
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
1972 – परी चित्रपत चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
1974 – कोरा कागज मधील चित्रपट गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
1990 – फिल्मी गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
बरेच पुरस्कार मिळालेले काही पुरस्कार त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. नवीन कलाकारांना हे पुरस्कार द्या म्हणून सांगितले.
लता मंगेशकर यांचे निधन :
लता मंगेशकर यांचे निधन ब्रिज कँडी हॉस्पिटल मध्ये झाले. ज्या 92 वर्षाच्या होत्या, त्यांना कोरोनाची लागण झाली होती 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी त्यांची निधन झाले.
FAQ
लता मंगेशकर यांची पूर्ण नाव काय?
लता दीनानाथ मंगेशकर.
लता दीदी यांचा जन्म कुठे झाला?
मध्यप्रदेश मधील इंदूर या शहरांमध्ये लतादीदींचा जन्म झाला.
लता मंगेशकर यांच्या आईचे नाव काय होते?
शेवंती मंगेशकर.
लता मंगेशकर यांची वैशिष्ट्य काय आहे?
विशिष्ट आवाजासाठी आणि तीन सप्तकांपेक्षा जास्त विस्तारलेल्या गायनासाठी लतादीदी खूप प्रसिद्ध आहे.
लता मंगेशकर यांचा मृत्यू कधी झाला?
6 फेब्रुवारी 2022 रोजी.