Lavani Dance Information In Marathi वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याचा आपला खास असा एक नृत्य प्रकार आहे. मग त्यामध्ये आपला महाराष्ट्र तरी कसा मागे राहील. महाराष्ट्र मध्ये अनेक प्रकारचे नृत्य सादर केले जात असले, तरीदेखील महाराष्ट्राचा सर्वात जुना आणि उत्कृष्ट नृत्य प्रकार म्हणून लावणी हा नृत्यप्रकार ओळखला जातो.
लावणी नृत्याची संपूर्ण माहिती Lavani Dance Information In Marathi
महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा हा नृत्य प्रकार अतिशय लोकप्रिय असून, महाराष्ट्रसह इतरही राज्यांमध्ये या नृत्याला चांगलीच पसंती दिली जाते. महाराष्ट्राचा पारंपारिक नृत्य प्रकार असल्यामुळे या नृत्य प्रकारात महाराष्ट्राचा पारंपारिक पोशाख असलेल्या नववारी साडी ला परिधान केले जात असते.
संगीताच्या ठेक्यावर आणि ढोलकीच्या नादावर या प्रकारामध्ये नृत्य सादर केले जात असते. लावणी या शब्दाचा उगम लावण्य या शब्दापासून झालेला आहे. अर्थात अतिशय सौंदर्यमय प्रकार असलेला हा नृत्यप्रकार नृत्य आणि संगीताचा एक वेगळाच अविष्कार असतो. लावणी मध्ये वेगवेगळ्या विषयांना हाताळत समाज प्रबोधन देखील केले जात असते. यामध्ये अगदी प्रणय्यापासून, धर्म, राजकारण, समाज इत्यादी विषयांच्या समावेश असतो.
महाराष्ट्राला युद्धभूमीचा दैदिप्यमान वारसा लाभलेला आहे, आणि पूर्वीच्या काळी या युद्धातील सैनिकांचे मनोरंजन व्हावे याकरिता लावणीचा कार्यक्रम आयोजित केला जात असे. पुढे या नृत्य प्रकाराला महाराष्ट्राने खूपच आपलेसे केले, त्यामुळे या नृत्य प्रकाराला महाराष्ट्रामध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला.
त्याचबरोबर प्रभाकर, राम जोशी, आणि होनाजी बाळा यांच्यासारख्या अतिशय प्रतिभावंत कवींनी विविध लावण्या रचल्या. त्यांच्या या शब्दाविष्काराने लावणीला वेगळीच ओळख निर्माण होण्यास मदत झाली, आणि महाराष्ट्राचा पारंपारिक प्रत्येक प्रकार असलेला हा लावणी नृत्य प्रकार सर्व तर प्रसिद्ध झाला. आजच्या भागामध्ये आपण या लावणी नृत्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.
नाव | लावणी |
प्रकार | नृत्य प्रकार |
ओळख | महाराष्ट्राचा पारंपरिक नृत्य प्रकार |
विविध प्रकार | शृंगारि लावणी आणि निर्गुणी लावणी |
सादरीकरणानुसार प्रकार | बैठकी लावणी आणि फडाची लावणी |
लावणी बद्दल ऐतिहासिक माहिती:
ढोलकीचा ताल आणि नृत्याचा ठेका या सुंदर एकत्रित करण्याचा नमुना म्हणजे महाराष्ट्राची लावणी होय. लावण्य अर्थात सौंदर्य या शब्दापासून या लावणी शब्दाचा उगम झालेला असून, अतिशय सुंदर नृत्य प्रकार म्हणून याला ओळखले जाते. भारताच्या महाराष्ट्रामध्ये उगम पावलेला हा नृत्य प्रकार मुख्यतः १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर उदयास आला होता.
या अंतर्गत तत्कालीन सैन्य युद्धामध्ये थकल्यानंतर त्यांना धीर मिळावा आणि त्यांचे मनोबल वाढविले जावे याकरिता या लावणीच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जात असे. पुढे या लावणीसाठी खास करून गीतांची रचना देखील करण्यात आली. यामध्ये मुख्यतः होनाजी बाळा, राम जोशी, आणि प्रभाकर यांच्यासारख्या कवींचा समावेश होतो. त्यामुळे लावणी कार्यक्रमाला महाराष्ट्र बाहेर देखील ओळख मिळण्यास मदत झाली.
लावणी सादरीकरणाची शैली:
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य असून, ही लावणी सादरीकरणाचे एक वैशिष्ट्य असते. त्यामध्ये विविध भावभावना व्यक्त करत नृत्यांगना विविध कामुक आणि खोडकर हावभाव करत असते. या अंतर्गत विविध प्रेक्षकांचे मनोरंजन देखील होत असते. लावणी कोणत्या प्रकारची सादर केलेली आहे, त्यानुसार तिचे शृंगारि लावणी आणि निर्गुणी लावणी यांसारखे प्रकार पडत असतात.
त्याचबरोबर या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले आहे यानुसार फडाची लावणी आणि बैठकीची लावणी असे दोन प्रकार देखील पडत असतात. यातील फडाची लावणी बघण्यासाठी प्रचंड मोठा जनसमुदाय एकत्र जमलेला असतो. मात्र बैठकीची लावणी ही केवळ काही खास व्यक्तींच्या मनोरंजनासाठी आणि बंदिस्त ठिकाणी आयोजित केलेली असते.
लावणी नृत्य चे पोशाख:
लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्रातील प्रमुख नृत्य प्रकार असण्याबरोबरच तो कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सादर केला जात असतो. या नृत्य प्रकारासाठी एक विशिष्ट प्रकारचा पोशाख असून, त्यामध्ये महिलांना नऊवारी साडी प्रदान करावी लागते. तसेच कासोटा देखील घालून ही साडी नेसावी लागते.
सोबतच अतिशय उंची दागदागिने परिधान करणे गरजेचे असते. काही महिला या दरम्यान बांगड्या, कंबर पट्टा, पैंजण यांसारख्या आभूषणाचे देखील वापर करत असतात. सोबतच कपाळावर टिकली किंवा कुंकू लावणे देखील या नृत्य प्रकार साठी गरजेचे असते. काही नृत्यांगना या कार्यक्रमादरम्यान मोगऱ्याचा गजरा देखील केसांमध्ये माळत असतात.
या नृत्य प्रकाराने अनेक महाराष्ट्रीयन महिलांना ओळख निर्माण करून दिलेली असून, त्यांच्या नावाने अनेक लावणी प्रकार देखील प्रसिद्ध आहेत. यामध्ये विठाबाई नारायणगावकर, सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, संध्या माने, सुवर्णा काळे, सुरेखा कुडची, स्नेहा वाघ, यांसारख्या दिग्गज महिलांचा समावेश होतो.
त्यांनी लावणीलाच आपले सर्वस्व समजून त्या क्षेत्रामध्ये फार मोठे नावलौकिक मिळवलेले आहे. त्यामुळे यातील काही महिला लावणी कार्यक्रमातून निवृत्ती घेऊन सुखाने जगत असल्या तरी देखील त्यांना लावणीसाठीच ओळखले जात असते.
निष्कर्ष:
सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर तमाशा आणि लावणी हे दोन मुख्य घटक प्रकटतात. हे दोन्ही घटक महाराष्ट्राची ओळख असून, महाराष्ट्राचा पारंपारिक सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यामध्ये खूपच मोलाची भूमिका बजावत असतात. तमाशामध्ये ज्याप्रमाणे समाज प्रबोधन केले जाते, त्याचप्रमाणे लावणीच्या माध्यमातून समाज प्रबोधना बरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले जात असते.
पूर्वीच्या काळी सैनिकांचा थकवा घालवला जावा, याकरिता या लावणीच्या कार्यक्रमाचा आयोजन केले जात असे. मात्र पुढे सैनिकांबरोबरच इतरही लोक या कार्यक्रमाला हजेरी लावू लागले, आणि अल्पावधीतच सर्व लोकांच्या पसंतीसाठी हा नृत्य प्रकार उतरला. त्यामुळे सर्वत्र या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ लागले.
लावणी कार्यक्रमांमध्ये नऊवारी साड्या परिधान केलेल्या युवती आपल्या पायाच्या ठेक्यावर संपूर्ण प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या या नृत्य प्रकारामध्ये प्रत्येक जण अगदी गुंतून जात असतो. आजच्या भागामध्ये आपण या लावणी नृत्याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे.
यामध्ये लावणी नृत्य म्हणजे काय, त्यासाठी कोणकोणते साहित्य आवश्यक असते, सोबतच या लावणी नृत्य प्रकाराचा इतिहास काय आहे, लावणी नृत्याला प्रसिद्धी मिळण्यामागील कारण, त्याचबरोबर यामध्ये नृत्य करणाऱ्या नृत्यकीचे स्वरूप कसे असते, लावणीचे कोणकोणते प्रकार पडतात, त्याचबरोबर त्याची पार्श्वभूमी काय असते, लावणीचे सादरीकरण कसे केले जाते, व त्यानुसार देखील काही प्रकार पडतात का, यामध्ये संगीताचे कोणकोणते उपकरणे वापरले जातात, तसेच पोशाख कसा परिधान केला जातो इत्यादी माहिती बघितलेली आहे.
FAQ
लावणी नृत्य प्रकार मुख्यतः निर्माण होण्यामागे काय कारण आहे?
महाराष्ट्राला युद्धाची भूमी म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या काळी युद्ध झाल्यानंतर सैनिकांचा थकवा घालवून त्यांना मनोरंजन मिळावे, याकरिता या लावणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.
लावणी कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणकोणते विषय हाताळले जात असतात?
लावणी दर्शकांचे मनोरंजन करण्याबरोबरच समाजप्रबोधनाचे देखील कार्य करत असते. यामध्ये अगदी प्रणय, राजकारण, समाज, आणि धर्म यांसारख्या विषयांना हाताळले जात असते.
लावणी नृत्याचे कोणकोणते दोन प्रकार पडत असतात?
लावणी नृत्याचे मुख्यतः शृंगारि लावणी आणि निर्गुणी लावणी असे मुख्य दोन प्रकार पडत असतात.
लावणी नृत्याचे सादरीकरणाच्या आधारावर कोणकोणते दोन प्रकार पडत असतात?
सादरीकरणाच्या आधारावर फडाची लावणी आणि बैठकीची लावणी असे दोन मुख्य प्रकार पडत असतात.
लावणी नृत्य प्रकारामध्ये मुख्यतः कोणत्या वाद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो?
लावणी या महाराष्ट्राच्या पारंपारिक नृत्य प्रकारांमध्ये मुख्यतः ढोलकी या वाद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. त्याबरोबरच विविध वाद्यांच्या माध्यमातून संगीत निर्मिती देखील केली जात असते.