Lily Flower Information In Marathi फुल हे प्रत्येकालाच आवडत असते. फुलांमुळे निसर्गासह अनेक कार्यक्रमांमध्ये देखील सौंदर्य आणले जाते. असेच एक फुल म्हणून लिली या फुलाला देखील ओळखले जाते. सुमारे १०० प्रजाती असणारे हे लिली फुल अतिशय कठोर व कंदयुक्त प्रकारचे असते. त्याची फुले फनेल प्रकाराची असून, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य व सुगंधा करीता ही फुले ओळखली जातात. रेषा असणारी ही फुले आतील बाजूने मात्र पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. या फुलांचे देठ अतिशय उंच स्वरूपाचे असते.
लिली फुलाची संपूर्ण माहिती Lily Flower Information In Marathi
या फुलाला अंतर्गत ट्युलिप या नावाने देखील ओळखले जाते. उत्तर भारतातील समस्येतोष्ण प्रदेशांमध्ये या फुलाचा उगम झालेला असून, बिया, बल्ब रायझोम, किंवा कंद इत्यादी प्रकारांनी हे फुले लावली जाऊ शकतात. टायगर लीली, चायनीज लिली, मॅडोना लीली, जपानी लीली, कांदा लिली, व्हाईट ऍस्टरलिली, आणि शतावरी लिली इत्यादी सदस्य आहेत.
लिलीयन कुळातील सर्व वनस्पतींना लिली या नावाने ओळखले जाते, मात्र त्यांचे अनेक प्रकार पडत असतात. या लीली कुठे वाढतात, यानुसार देखील त्यांचे विविध प्रकार आहेत. ज्यामध्ये वॉटर लिली, वालुकमय मृदेमधील लीली, चिकन मातीमधील लिली इत्यादी प्रकार असतात. पाऊस पडल्यानंतर व्यावसायिक स्तरावर लागवड करण्याकरिता या लिली फुलाचे कंद जमिनीमध्ये सहा इंच गाढले जातात. आणि त्यापासून फुल झाडांची निर्मिती होत असते.
आज आपण लिली या फुलाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | लिली |
शास्त्रीय नाव | लिलीयम |
हायर क्लासिफिकेशन | लिलीइ |
कुटुंब किंवा कुळ | लिलीएसी |
किंगडम | प्लांटी |
ऑर्डर | लिलीयाल्स |
मित्रांनो, बहुतेक अनेक लोकांच्या घरामध्ये आढळून येणारी वनस्पती म्हणून लिली फुलाच्या वनस्पतीला ओळखले जाते. या फुल झाडाच्या सुमारे ४० प्रजाती जगभर आढळून येत असतात. दक्षिण पूर्व आशिया व अमेरिका या ठिकाणी या लिली फुलाचा उगम झालेला असून, साधारणपणे वसंत ऋतूमध्ये या झाडांना फुले उमलत असतात. आकाराने अतिशय छोटी असणारी लिली ची फुले दिसायला मात्र खूपच आकर्षक व सुंदर स्वरूपाचे असतात.
साधारणपणे दोन ते पाच वर्ष आयुष्यमान असणारे लिलीचे झाड योग्य काळजी घेतली नाही तर लवकर देखील खराब होऊ शकते. मात्र एकदा रोप खराब झाल्यानंतर पुन्हा योग्य रीतीने त्यापासून फुले उमलत नाहीत.
भारतासह कॅनडा व अमेरिका या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर या लिलीच्या फुलांचा वापर केला जातो. युरोप देशात लोक या लीलीच्या फुलांनी घराची सजावट देखील करत असतात. विविध प्रजातीनुसार या फुलांचा वेगवेगळ्या रंग आढळत असतो. त्यामध्ये पिवळा, लाल, पांढरा, गुलाबी, केसरी रंगांचा समावेश होतो.
लिली या वनस्पतीची लागवड करण्याकरिता बल्ब किंवा कंद यांचा वापर केला जातो. जो एक खोडाचाच प्रकार असून, योग्य हवामान आल्यानंतर त्यापासून रोपांची निर्मिती होऊ शकते. सुमारे पाच फूट उंच वाढू शकणारी ही वनस्पती काही प्रजातींमध्ये मात्र बुटकी राहत असते.
लिली फुलाचे महत्व:
मित्रांनो, लीलीचे फुल हे अनेक गोष्टींचे प्रतीक आहे. त्यानुसार जपान मधील लोक पांढरीलिली एकमेकांना देऊन एकमेकांप्रती प्रेमाची इच्छा प्रकट करत असतात. त्याचबरोबर सौभाग्याचे प्रतीक म्हणून देखील जपानमध्ये या फुलांना ओळखले जाते. त्याचबरोबर जपानमध्ये विवाह सोहळा, व इतर कार्यक्रम असतील त्यावेळी सजावटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर टायगर लिली अथवा व्हाईट ऍस्टर लिली या प्रजातींचा वापर केला जातो, जेणेकरून संपूर्ण वातावरण अतिशय सुगंधित होण्यास मदत होते. लीली फुलातील काही प्रजाती अतिशय सुंदर सुवास देत असतात, तर इतर काही प्रजाती मात्र असूवासिक असतात.
लिली फुलाचे फायदे व उपयोग:
लिली या फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो. त्यामध्ये सौंदर्यप्रसाधनांचा देखील समावेश असतो. लिलीफुलांचा वापर अनेक त्वचारोगांवर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक ठिकाणी सजावट करण्यासाठी देखील लिली वापरली जाते.
घरामध्ये लीलीचे झाड लावल्यामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न होण्यास मदत होते, त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा देखील मोठा प्रमाणावर घरामध्ये होत असतो.
वातावरणामध्ये असणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड व फॉर्मलडिहाईड यांसारख्या विषारी व प्रदूषक वायूमुळे शरीराला होणारे नुकसान कमी करण्यामध्ये देखील लिली वनस्पतीचा मोठा प्रमाणावर फायदा होत असतो.
घराभोवतीची हवा शुद्ध करण्याबरोबरच घराच्या सुशोभीकरणात देखील लिली फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे घराच्या आसपास सौंदर्य निर्मिती केली जाते.
लिली फुलाची लागवड घराच्या आसपास केल्यामुळे, आजारी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घट नोंदवली जाते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये तसेच बाथरूम मध्ये बुरशी होण्याची समस्या जाणवत असते. अशावेळी बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये किंवा घरात कुंडीमध्ये लिलीचे झाड लावून ठेवल्यास बुरशी वाढत नाही.
लिली फुलाची वैशिष्ट्ये:
- लिलीचे फूल १८३७ मध्ये शोधले गेल्यामुळे त्याला व्हिक्टोरियन फुल म्हणून देखील ओळखले जाते.
- साधारणपणे दोन ते पाच फूट उंच वाढणारी लीली काही प्रजातींमध्ये आठ फुटापर्यंत देखील वाढत असते.
- लिलीचे उत्पादन दोन ते पाच वर्ष घेतले जाऊ शकते.
- लिली फुलातील अमृत नावाचा घटक लहान लहान कीटकांना आकर्षित करण्यात कारणीभूत ठरत असतो.
- अतिशय सुंदर असणारे हे फुल मांजरींसाठी मात्र घातक ठरू शकते, कारण लिली फुलाचा रस मांजरीच्या अंतर्गत अवयवांना धोका पोहोचवत असतो.
निष्कर्ष:
प्रत्येकाला फुलाची आवड असतेच. फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो, मग ते कुठले धार्मिक कार्य असो सांस्कृतिक कार्य असो किंवा इतर काही. फुल हे आवश्यक असतेच. मित्रांनो, फुलाची महती अगदी पूर्वीच्या काळापासून विशद करण्यात आलेली आहे.
आजच्या भागामध्ये आपण लिली या फुलाची माहिती बघितली आहे. ज्यामध्ये लिली फुल म्हणजे काय, या लिली फुलाचे महत्त्व, या फुलाचे विविध फायदे व उपयोग, या फुलांचे उत्पादन घेण्याची प्रक्रिया, त्यांची देखभाल घेण्याची प्रक्रिया, या फुलांची उमलण्याचे ऋतू, या झाडाची विविध वैशिष्ट्ये, त्याचबरोबर काही विशिष्ट तथ्य माहिती देखील बघितलेली आहे. सोबतच नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघितलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला या विषयी अधिक माहिती समजण्यास मदत देखील मिळालेली असेल.
FAQ
लिली या फुलाला शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?
दिली या फुलाला शास्त्रीय भाषेमध्ये लिलीयम या नावाने ओळखले जाते.
लिली या फुलाचा रंग साधारणपणे कोणता असतो?
लिली या फुलाचा रंग विविध प्रकारांमध्ये आढळून येतो, त्यामध्ये नारंगी, पांढरा, पिवळा, लाल, गुलाबी, इत्यादी विविध प्रकार आढळून येतात.
लिली फुलाची वनस्पती किंवा झाड साधारणपणे किती वर्ष जगत असते?
या वनस्पतीचे किंवा झाडाचे साधारण आयुष्यमान हे सुमारे दोन ते पाच वर्षे इतके समजले जाते.
लिलीच्या फुलाला टायगर लीली या प्रकारामध्ये वर्गीकृत करण्याचे कारण काय आहे?
लिलीच्या फुलांच्या विविध प्रजातीनुसार रंगांमध्ये फरक असतो. यातील काही प्रजातीमध्ये फुलांवर काळसर टिपके आढळून येतात, जे वाघाच्या कातडी सारखे दिसत असतात. त्यामुळे त्याला टायगर लिली किंवा वाघ लिली म्हणून ओळखले जाते.
लिली या फुलाचे कुटुंब कोणते समजले जाते?
लिली या फुलाचे कुटुंब अर्थात कुळ हे लिलीएस किंवा लिलीयाल्स म्हणून ओळखले जाते.
आजच्या भागामध्ये आपण लिली या अतिशय सुगंधी व सौंदर्यपूर्ण फुला विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडली असेल, याबद्दल आम्हाला खात्री आहे. तर मग तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे देखील आम्हाला जाणून घेणे आवडेल. सोबतच तुमच्या मित्र-मैत्रिणींना व फुलांची आवड असणाऱ्या व्यक्तीला ही माहिती पाठवून, तुम्ही त्यांना देखील या माहितीचा आस्वाद देऊ शकता.