सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती lion Information In Marathi

lion Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण सिंह या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण सिंह या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, सिंह कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत?

lion Information In Marathi

सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती lion Information In Marathi

सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते .तो सर्व प्राण्यांचा राजा असतो .सिंह मांजराच्या कुळातील एक मोठा प्राणी असून ,सिंहाचे अस्तित्व भारतामध्ये आणि आफ्रिका मध्ये आढळून येते .तो मांसभक्षक प्राणी आहे ,याचे शास्त्रीय नाव ‘पँथेरा लिओ’ आहे.

सिंहाला धैर्याचे प्रतिनिधित्व करणारा प्राणी समजले जाते. त्याच बरोबर त्यांना धैर्य आणि रॉयलटीचे प्रतीक मानले जाते .सिंह जंगलामध्ये १० ते १४ वर्ष जगतात आणि ते जर पिंजऱ्यात ठेवले असतील तर ते 20 वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकतात .

सिंहाचे आयुर्मान

जंगलामध्ये नर सिंह सहसा १० ते ११ वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत कारण इतर नर सिंहाशी अस्तित्वासाठी भांडून झालेल्या जखमांमुळे त्यांचे आयुष्य कमी होते .

सिंहाचे भक्ष

तो मृग पक्षी, म्हशी, झेब्रा ,हरिण ,मासे यांसारख्या प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरतात .

सिंहाविषयी प्राथमिक माहिती

  • सिंह नर असतात तर सिंहीणी मादी असते.
  • तसेच सिंहाला इंग्रजीमध्ये लॉयन असे म्हणतात. आणि सिंहिणीला लोयनेस असे म्हणतात व त्यांच्या पिल्लांना छावा म्हणतात.
  • सिंहनीला  दोन वर्षानंतर पिल्ले होतात सिंहिण एकावेळी २ किंवा ३  पिल्लांना जन्म देते.
  • सिंह १० ते १५  प्राणी असणाऱ्य कळपामध्ये राहतात .
  • ज्यामध्ये मादा, लहान नर व पिल्ले असतात. सिंहाच्या चेहर्‍याभोवती आणि मानेभोवती जे केस असतात त्यांना आयाळ म्हणतात सिंहनीला आयाळ नसते.

सिंहांचे विविध प्रकार

सिंहाचे अस्तित्व १० हजार वर्षापासून आशिया आणि आफ्रिका मध्ये आढळते. त्याचे दोन प्रकार शिल्लक आहेत. आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपीयन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत.पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो त्याचे सरासरी आयुष्य 10 ते 14 वर्षे असते ते लहान झुडपांच्या सवाना जंगलात आढळून येतात.

चितळ ,हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहाचे खाद्य आहे. त्यांना अंदाजे चार प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते असे म्हणतात. सिंह दिवसातील चोवीस तास झोपतात .

१) आशियाटिक सिंह

एकेकाळी तुर्की पासून दक्षिण पश्चिम आशिया ओलांडून भारतीय उपखंडात आढळणारे एशियाटिक सिंह किंवा भारतीय सिंह सध्या गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात आणि वन्यजीव अभयारण्य या मध्ये दिसतात.

नर सिंहाचे वजन 160 किलो ते 190 किलो इतके असते तर सिंहिणीचे चे वजन 110 ते 120 इतके असते. एशियाटिक सिंहाचा रंग गडद गवंडी , राखाडी किंवा वालुकामय ते काळा रंगाने ने दाट तपकिरी असतो .

२. बार्बरी सिंह

बार्बरी सिंह उत्तर आफ्रिकान सिंह म्हणून ओळखला जाणारा आहे. या सिंहाच्या उपप्रजाती पूर्वी मोरोक्को, इजिप्त, आणि अल्जेरिया मध्ये आढळल्या होत्या.पण त्या सिंहाची शिकार केल्यामुळे त्या जंगलातील सिंह नामशेष झाले.1920 मध्ये मोरॉक्को मध्ये शेवटचा बार्बरी सिंह ठार मारला. यव प्रकारच्या सिंहाचे वजन 200 किलो पेक्षा जास्त असते.

३) ट्रान्सव्हाल सिंह

ट्रान्सव्हाल सिंह हा दक्षिण पूर्व आफ्रिकन सिंह आहे .या सिंहाला कलहरी सिंह किंवा ट्रान्सव्हल शेर म्हणून ओळखले जाते. हे आफ्रिकेच्या कलहारी  प्रदेशांमध्ये आढळतात.

तसेच हे सिंह आफ्रिकेच्या क्रूजर नॅशनल पार्क येथे आढळतात. नर सिंहाची लांबी 5.5 फुट ते 10.5 फूट इतकी असते, तर सिंहिणीची लांबी 7.7 फुट ते 9.0 इतकी असते. या सिंहाचे  वजन 250 पर्यंत असते तर सिंहिणीचे  वजन 185 पर्यंत असते.

३) मसाई सिंह

मसाई सिंह हा एक आफ्रिकन सिंह असून, हा सिंह पूर्व आफ्रिकेमध्ये आढळतो. हा सिंह इतर प्रजाती पेक्षा कमी वक्र असून त्याचे पाय लांब  असतात. या सिंहाची लांबी ९.७ फूट इतकी असते.तर सिंहीणीची लांबी 8.5 फूट इतकी असते. मसाई सिंह केनिय, टांगा, युगांडा, मोझांबिक आणि टांझानिया या देशातही आढळतात.

४.इथिओपियन सिंह

इथिओपियन सिंह हा एक पूर्व आफ्रिकन सिंह आहे या सिंहाला ऑडिस बाबा सिंह किंवा अबिसिनियन सिंह या नावांनीही ओळखले जाते.

५.पांढरा सिंह

पांढरे सिंह हे क्रुगेरी सारख्याच प्रजातीचे आहेत. हे  अत्यंत दुर्मिळ  असून ते फक्त प्राणिसंग्रहालयात, अभयारण्यात ,किंवा वन्यजीव सविभागांमध्ये आढळतात.

हे आफ्रिकेच्या टिंबवती प्रदेशातील प्रदेशात आढळतात असे म्हणले जाते. त्यांचा रंग पांढरा असतो .आणि ते दक्षिण आफ्रिकेतील लॉरी पार्क  प्राणीसंग्रहालयात, न्यूझीलंडमधील झिओन किंग्डम आणि सारबिया मधील बेलग्रेड प्राणिसंग्रहालयात दिसून येतात.

आशियाटिक सिंह आणि आफ्रिकन सिंह यांच्यातील फरक कसा ओळखावा दोन्ही आशियाई आणि आफ्रिकन सिंह धोकादायक आहेत आणि ते दोन्ही panthera leo या प्रजातीचे आहेत . आशियाटिक सिंह आणि आफ्रिकन सिंह यांच्यातील फरक खाली सूची प्रमाणे दिले आहेत –

आशियाटिक सिंह-

आशियाटिक सिंह आफ्रिकन सिंहाचीच उपजाती आहे .ते फक्त भारतातील गुजरात मधील गिर वनक्षेत्रात टिकून आहेत .आशियाई सिंह हा एक धोकादायक प्रजातींपैकी एक आहे .या नर सिंहाचे वजन 190 किलो असून सिंहिणीचे वजन 165 किलो इतके असते. हे सिंह जंगलामध्ये 15 वर्ष जगू शकतात आणि जर कैदेत ठेवले तर 30 वर्ष आयुर्मान असते.

 आफ्रिकन सिंह

आफ्रिकन सिंह ही एक मुख्य सिंहाची प्रजाती आहे. आणि मुख्य प्रजाती च्या वेगवेगळ्या उपजाती आपल्याला आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात .त्याचे वजन 225 किलो इतके असते तर सिंहींनिचे वजन 165 किलो इतके असते.तसेच ते अकरा फूट लांब असतात.हे सिंह जंगलामध्ये सतरा वर्षे जगू शकतात .आणि जर कैदेत ठेवले तर 34 वर्षे जगू शकतात.

आफ्रिकन सिंह आणि आशिया सिंह यांच्यात काय फरक आहे

  • अशियाइ सिंह आणि आफ्रिकन सिंह हे दोन वेगळ्या देशातील सिंह आहे.
  • आशियाई सिंह हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर आफ्रिकन सिंह असुरक्षित वर्गात मोडले जातात.
  • आशियाई सिंहाच्या कळपात नर सिंह एकच असतो आणि आफ्रिकन सिंहांच्या कळपात दोन ते तीन नरसिंह असतात.
  • आशियाई सिंहाची लोकसंख्या खूप कमी असून आफ्रिकन सिंह यांची लोकसंख्या जास्त आहे.
  • आशियाई सिंहाना केसाचे आयाळ कमी असते तर त्यांच्या तुलनेत आफ्रिकन सिंहाना केसांची आयाळ जास्त असते.

सिंह बद्दल काही तथ्य

सिंह व आपल्या कळपाचा आणि आपल्या प्रदेशाचा बचाव करतात .सिंहाची गर्जना पाच मैलांच्या अंतरावर ऐकू येते .नर सिंहाच्या वयाचा चांगला अंदाज आपण त्याच्या मानेवरून घेऊ शकतो, जर त्याची मान जास्त काळी नसेल तर तो तरुण असतो आणि जर त्याची मान खूप काळी असेल तर त्या सिंहाचे खूप वय झालेले असते.

चालताना सिंहाची टाच जमिनीवर स्पर्श करते.सिंह हा ताशी 50 किलोमीटर पळू शकतो .दिवसात सिंहाला २० तास विश्रांती गरजेची असते. सिंह घनदाट जंगलात ,दलदल असलेल्या परिसरात किंवा वाळवंटात राहू शकत नाहीत ते गवताळ प्रदेशात राहतात.सिंहाला दिवसात ७ ते ८ किलो मास आवश्यक असते. व तो चार ते पाच दिवस पाण्याशिवाय राहू शकतो.

जगामध्ये सर्वात जास्त वजनाचा प्राणी सिंहाल आहे.आशियाई सिंह पुनर्वसन योजनाया योजनेनुसार कुनो पालपुर या जंगलात गीरचे काही सिंह पुननिर्वासित केले जातील.पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे.कुनो पालपुर येथे वाघ असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला .

वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगादा असतो आणि वजनदार पण असतो. कुनो पालपूर ला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकेल पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे गुजरातला काही सिंह आता पुन्हा पालपुर या अभयारण्यात देणे भाग पडणार आहे.तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा  एकदा नजर द्यावी .सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.

ही माहिती आपणास आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment