Ludo Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण कोरोना या महामारी मुळे लॉकडाउनच्या परिस्थितीला सामोरे गेलेलो आहोत. या लॉकडाऊन मध्ये आपण घरात सर्वजण एकत्र होतो .तेव्हा कंटाळा घालवण्यासाठी आपण घरात खेळणारे खेळ भरपूर प्रमाणात खेळलो आहोत. त्यापैकी एक खेळ म्हणजे लुडो !!!
लुडो खेळाची संपूर्ण माहिती Ludo Game Information In Marathi
लुडो हा एक लोकप्रिय असा घरगुती खेळ आहे. या खेळाला भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही ही जास्त लोकप्रियता आहे .हा खेळ सर्वच वर्गातील लोकांना खेळायला आवडतो.
मग ती महिला असो की पुरुष, लहान मुले असो की वृद्ध या सर्वांची उत्सुकता या खेळांमध्ये पहावयास मिळते. लुडो हा खेळ प्रथम चार्ट वरच खेळला जात होता परंतु आज हा गेम आपल्या मोबाईल मध्ये ही ऑनलाईन खेळला जातो .तर चला ,आता या लूडो गेम विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
लुडो हा एक अतिशय प्राचीन खेळ आहे लुडो त्याकाळी ‘पचिसी’ म्हणून ओळखला जात असे. या खेळाचा उल्लेख शिवपुराण महाभारत आणि गीता यांसारख्या ग्रंथांमध्ये ही केलेला आहे काळाच्या ओघात या खेळात बदल होत गेले आज आपल्याला लुडो चा दोन हजार वर्षाचा इतिहास पाहायला मिळतो या खेळामध्ये प्राचीन काळी पांडवांनी द्रोपदीस पणाला लावलेली घटना महाभारतातील पौरानिक महाकाव्यात पाहायला मिळते.
हा खेळ देवी देवतांनी ही खेळला आहे अशी कथा आहे श्रीकृष्ण व सत्यभामा तसेच माता पार्वती व शिव यांनी कैलास पर्वतावर ही हा खेळ खेळला आहे अशी मान्यता आहे. तसेच सोळाव्या शतकात मुघल सलतनतचा सर्वात प्रभावशाली राजा अकबर यालाही हा खेळ खूप आवडत होता.
त्याच्या फतेहपुर सिक्री च्या दरबारात एक मोठा पचिसी बोर्ड बांधला होता. जिथे तो त्यांच्या दासींचा खेळात प्यादे म्हणून वापर करत असत. या खेळाची वेगवेगळी नावे आहेत ती पुढील प्रमाणे पगडे ,पचिसी, चोपड ,चौसाड,दैकत्तम ,सोक्तम आणि वर्गेस इत्यादी नावाने देखील लुडो हा खेळ ओळखला जातो.
स्पेनमध्ये लुडो या खेळाला परचेशी या नावाने ओळखले जात होते तर चिनी लोक त्याला चतुष पाडा असे म्हणत. आफ्रिकेमध्ये लुडो ला लुडु असे म्हटले जाऊ लागले. प्राचीन काळामध्ये भारतामध्ये अनेक समूह तयार करून चौपाड या खेळाचे अनेक संघ तयार करून रंजक सामने आयोजित केले जात होते. लुडो प्रमाणे चौपाड खेळ चार चौकांमध्ये आखला जात असे.
आजच्या काळासारख्या त्यावेळेस रंगबिरंगी सोंगट्यांचा वापर न करता त्या एवजी निरनिराळी बियाणी, टरफले यांचा वापर सोंगट्या म्हणून केला जात असे. फासे म्हणून पांढऱ्या कवड्यांचा वापर केला जाई.
या कवडया हाताच्या मुठीत घेऊन फाश्यांप्रमाणे फेकल्या जात. सरळ पडणाऱ्या कवड्यांची संख्या मोजली जात असे व त्यानुसार सोंगटी म्हणून वापरण्यात आलेली बियाणे आजच्या लुडो प्रमाणेच एक घर पुढे जाईल.
भारतातील इंग्रजांच्या आगमनानंतर चौपर हा खेळ अगदी जगभरात पोचला. 1960 नंतर या खेळात थोडा बदल करून जॉन हॅमिल्टन यांनी अमेरिकेत या खेळाचा परिचय करून दिला नंतर हा खेळ अमेरिका आणि युरोपमध्ये “द गेम ऑफ इंडिया” या नावाने विकला गेला.
हॅमिल्टन यांनी बाजारात हा खेळ “पटचीजी” या नावाने आणला. नंतर 1896 मध्ये परचीसी हे नाव बदलून सोपे नाव म्हणून “लुडो” ठेवण्यात आले. याला लातीन भाषेत ‘मी खेळतो’ असा अर्थ होतो.
नंतर हा खेळ लहान मुलांचा मनोरंजनाचा खेळ झाला व 1900 मध्ये याच खेळाच्या आवृत्त्या फ्रान्स आणि जर्मनीमध्ये प्रसिद्ध झाल्या. आता एका ॲपच्या रूपात विकसित झालेला लुडो किंग गेमेशन टेक्नॉलॉजीद्वारे चार वर्षांपूर्वी विकसित करण्यात आला.
कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर नंतर भारतात त्याच्या वापरकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. ती वाढ इतकी होती की लुडो किंग ने कँडी क्रश या लोकप्रिय गेमलाही मागे टाकून रेकॉर्ड मोडला आहे.
या मोबाईल तील लूडो गेमने नवीन तरुण पिढीला एवढ वेड लावले आहे की टपरीवर ,कट्ट्यावर ,बस स्टॉप, दुकाने ,उद्याने अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी मोबाईल मध्ये डोके घालून काहीतरी करत असतील तर घाबरून जाऊ नका तेथे लुडो चा डाव रंगलेला असतो.
केवळ तरुणांनाच नव्हे तर आजी, आजोबा व नातवंडे आई-बाबा यांचाही चांगला लुडो चा खेळ चालू असतो. स्मार्टफोनमध्ये असलेला हा लूडो खेळ सध्या सर्वत्र वाऱ्यासारखा पसरलेला आहे.
लुडो हा खेळ खेळण्यासाठी दोन किंवा जास्तीत जास्त चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. या खेळामध्ये चारही खेळाडूंना स्वतंत्रपणे खेळायचे असल्यास ते स्वतंत्रपणेही खेळू शकतात किंवा दोन खेळाडूंचा संघ तयार करून हा खेळ खेळू शकतात. संघ म्हणून खेळताना दोन्ही खेळाडू समोरासमोर बसतात व स्वतंत्रपणे खेळताना सर्व खेळाडू रंगावर आधारित त्यांची घरे निवडतात. या खेळाला जास्त जागेची गरज नसते त्यासाठी एक पुठ्ठा किंवा प्लास्टिकचा चौकोनी लुडो बोर्ड लागतो.
लुडो या खेळा मध्ये फासा हा सर्वात महत्त्वाची सोंगटी असते. फासा म्हणजे सामान्यतः एक छोटासा आयताकृती किंवा चौरस आकाराचा एक ठोकळा असतो. या ठोकळ्यावर सहा बाजूंवर 1 पासून 6 पर्यंत ठिपके काढलेले असतात. त्या लुडो डायस मध्ये 1 ते 6 पर्यंत गुण असतात. फासा फेकल्यानंतर वरच्या बाजूला जेवढे ठिपके येतील ते गुण ग्रहित धरले जातात. व त्यानुसार खेळाडूला आपली संमती पुढे न्यावी लागते.
आता आपण लुडो हा खेळ कसा खेळला जातो हे पाहूयात
लुडो या खेळात लाल पिवळा हिरवा आणि निळा अशा चार कोपऱ्यांवर रंगाची घरे असतात. या चारही घरांमध्ये प्रत्येकी चार प्रकारच्या सोंगट्या असतात. अशाप्रकारे एकूण 16 सोंगट्या असतात. प्रत्येक खेळाडू एका घराचे प्रतिनिधीत्व करतो .खेळाच्या सुरुवातीला प्रत्येकी 4 सोंगट्या या प्रत्येकाच्या घरात असतात.
खेळाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक प्रतिस्पर्धीला सर्व अडथळ्यांवर मात करून मध्यभागी जो चौकोन असतो त्यामध्ये सर्व सोंगट्या एकेक घर पुढे जाऊन त्या चौकोनात न्यायच्या असतात. जो प्रतिस्पर्धी आपल्या चारही सोंगट्या एकेक करून त्या चौकोनात नेतो तोच प्रतिस्पर्धी जिंकतो. जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते.
आता पाहूया लुडो खेळण्याचे नियम खेळाची सुरुवात करताना कोणता खेळाडू प्रथम जाईल हे भाषेच्या मदतीने ठरवली जाते म्हणजे ज्या खेळाडूला सहा गुण मिळतात तेव्हाच त्याची संमती पुढे जाऊ शकते तोपर्यंत कोणताही खेळाडू आपल्या घरातून बाहेर पडू शकत नाही संत्या या घड्याळाच्या दिशेने हलवल्या जातात ज्या खेळाडूला सहा गुण मिळतात तोच खेळाडू पहिली चाल चालू शकतो.
जर एखाद्या खेळाडूने पुढे जाताना त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याची सोंगटी आली तर तो त्याच्यावर मात करून त्या प्रतिस्पर्ध्याला परत आपल्या घरात मागे जावे लागते. मग परत पहिल्यापासून खेळ सुरू करावा लागतो. एखाद्या खेळाडूला फासे टाकल्यावर सहा गुण मिळाले तर त्याला परत एकदा फासे टाकण्याची संधी असते.
परंतु जर फाशावर सलग तीन वेळा सहा गुण मिळाल्यास कोणताही गुण दिला जात नाही. एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यापूर्वी मध्यभागी एक थांबा असतो या थांब्याला एक विशेष महत्त्व असते. या थांब्यावर कोणतीही सोंगटी आली तरी कोणताही खेळाडू या सोंगटिला मारू शकत नाही. जो खेळाडू आपल्या चारही सोंगट्या विजयी चौकोनात प्रथम नेतो तो खेळाडू विजयी होतो.
लुडो हा खेळ खेळल्यामुळे मेंदूचा विकास होतो व आपल्याला प्रत्येक परिस्थितीत शत्रूपासून आपल्या सोंगटी रक्षण कधी वाचवायची व लुडो खेळण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक असते .आपल्याला कोणती सोंगटी कशी हालवायची आहे याचा योग्य निर्णय घेऊन विजय प्राप्त करायला लागतो.