मॅगी रेसिपी मराठी Maggi Recipe in Marathi

मॅगी रेसिपी मराठी Maggi Recipe in Marathi मॅगी हे भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. मॅगी बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यामधील साहित्य व घटकांचा कमी जास्त वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने मॅगी बनवली जाते. आज-काल मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये मॅगीचे स्टॉल आपल्याला दिसून येतात. जिथे वेगवेगळ्या प्रकारची मॅगी रेसिपी तयार केली जाते परंतु त्याचे महागडे रेट पाहता. आपण आपल्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने मॅगी रेसिपी करू शकतो. तेही कमी वेळामध्ये व कमी खर्चातही तर चला मग जाणून घेऊया मॅगी या रेसिपी विषयी माहिती.

 Maggi Recipe in Marathi

मॅगी रेसिपी मराठी Maggi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

मॅगी रेसिपी बनवण्यासाठी अत्यंत सोपी व कमी वेळामध्ये तयार होते. तसेच खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते. मॅगी बनवण्यासाठी टोमॅटो, मटार, कोथिंबीर, पनीर चीज यांसारखे पदार्थ वापरून मॅगी रेसिपी तयार केली जाते किंवा मग साधी मॅगी देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आजकाल मॅगी समोसा, मॅगी भजी, पनीर मॅगी, मसाला मॅगी, टोमॅटो कांदा मॅगी व साधी मॅगी असे विविध प्रकार मॅगी रेसिपीचे आपल्याला दिसून येतात. तर आज आपण येथे टोमॅटो मॅगी व मसाला मॅगी रेसिपी विषयी माहिती पाहणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण दोन व्यक्तींकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला केवळ 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मॅगी ही रेसिपी कुकिंग करण्याकरता केवळ आपल्याला 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

मॅगी रेसिपी तयार करण्याकरता एकूण वेळ आपल्याला 10 मिनिटे लागतो.

मसाला मॅगीसाठी लागणारे साहित्य :

1) दोन चमचे तेल
2) वाटी बारीक चिरलेला कांदा
3) एक बारीक चिरलेला टोमॅटो
4) दोन बारीक चिरलेली शिमला मिरची
5) अर्धी वाटी हिरवे वाटाणे
6) अर्धी वाटी गाजर
7) एक चमचा कांदे लसूण मसाला
8) एक चमचा लाल तिखट
9) मॅगी मसाला
10) दोन वाटी पाणी चवीनुसार
11) मीठ
12) मॅगी

पाककृती :

 • चहा मसाला मराठी
 • एक कढाई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवा.
 • नंतर तेल गरम झाले की, कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
 • नंतर टोमॅटो शिमला मिरची हिरव्या वाटाणे गाजर घालून छान मिक्स करून घ्या.
 • छान परतून झाले की, कांदा लसूण मसाला, लाल तिखट व मॅगी मसाला घालून हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्या. नंतर दोन मिनिटे सर्व काही शिजवून घ्या.
 • नंतर त्यामध्ये पाणी मीठ घाला व ते उघडेपर्यंत छान शिजल्या नंतर मॅगी घालून मिक्स करा.
 • या मिश्रणावर तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. अशा प्रकारे गरमागरम मॅगी तयार आहे. आता तुम्हीही मॅगी थंड झाल्यानंतर खाऊ शकता किंवा गरमागरम मॅगी देखील खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते.

टोमॅटो मॅगी रेसिपी :

टोमॅटो मॅगी रेसिपी साठी लागणारे साहित्य :

1) एक पॉकेट मॅगी
2) दोन कप पाणी
3) टोमॅटो बारीक चिरलेला
4) एक हिरवी मिरची बारीक चिरलेली
5) कोथिंबीर बारीक चिरलेली
6) चवीनुसार मीठ

टोमॅटो मॅगी बनवण्याची पाककृती :

 • सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन कप पाणी गरम करा व त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून घ्यावी.
 • त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मॅगी आणि मॅगी मसाला घाला.
 • आता ही मॅगीची ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करा व नंतर चवीनुसार मीठ घाला.
 • नंतर गॅसवरून उतरवून घ्या व गरमागरम टोमॅटो मॅगी सर्व्ह करा.
  तुम्हाला जर मॅगी आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व आम्हालाही कमेंट करून नक्की सांगा.

पोषक घटक :

मॅगीमध्ये टाकलेल्या पदार्थांनुसार आवश्यक घटक निर्माण होतात. जसे की टोमॅटो मॅगी, पनीर मॅगी, चीज मॅगी टाकल्यामुळे त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, विटामिन ई, फायबर, चरबी इ. घटक तयार होतात.

मॅगी खाण्याचे फायदे :

मॅगी खाल्ल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते व आपल्याला भूक लागत नाही.

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर मॅगीचे सेवन करणे फायद्याचे ठरेल त्यामुळे आपले वजन वाढत नाही.

मॅगीमध्ये टाकण्यात येणाऱ्या सामग्रीमुळे मॅगीची चव बदलते. त्यामुळे मॅगी कोणतीही बनवली तरी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते.

मॅगी खाण्याचे तोटे :

मॅगीचे नियमित सेवन करणे आपल्या करिता घातक ठरू शकते. कारण मॅगीचे नियमित सेवन केल्यामुळे रक्त कमी होऊ शकते.

मॅगीच्या अतिसेवनाने संधिवात होऊ शकतो तसेच शिक्षणाच्या क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती कमकुवत बनू शकते

आपण मॅगी खात असताना कमी प्रमाणातच खाल्ली पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला मॅगी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा

Leave a Comment