महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi

Maharashtra Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण अशा राज्यांची माहिती पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र! महाराष्ट्र हे असे राज्य आहे की, ज्याच्यात सर्व जातीचे ,सर्व धर्माचे लोक आपणास दिसून येतात.क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.

Maharashtra Information In Marathi

महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi

महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे जे भारताच्या पश्चिमेला स्थित आहे. हे राज्य भारतातील सर्वात धनवान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. ज्याचा जीडीपी भारतामध्ये सर्वात जास्त आहे.महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईला भारताची वित्तीय राजधानी असे सुद्धा म्हणतात.

नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये “राष्ट्र” या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात “राष्ट्रिक” आणि नंतर “महा राष्ट्र” या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील “महाराष्ट्री” या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.

तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर ” व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. चक्र्धर स्वामी यांनी “महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे’ अशी व्याख्या केली आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. 1960 ला जरी महाराष्ट्र राज्य म्हणुन अस्तित्वात आलं असलं तरी या राज्याला भरपुर मोठा इतिहास लाभलेला आहे.

अनेक राजे महाराजे, समाजसुधारक आणि संतांच्या विभुती या राज्यात जन्माला आल्या हे या महाराष्ट्र राज्याचे सद्भाग्यच म्हणावे लागेल!महाराष्ट्राला पहिल्यांदा बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि नंतर बॉम्बे स्टेट या नावाने सुद्धा ओळखत होते.

इतिहास

महाराष्ट्र राज्याला बराच राजकर्त्या शासकांचा वारसा हक्क लाभला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा  खूप प्रदीर्घ आहे. भारतीय इतिहासकालीन पुस्तकांमध्ये आढळून येत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्पत्ती संबंधीत माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा ई. स. पू. तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे.  कारण, या पूर्वीच्या कालखंडाबद्दल विशेष अशी माहिती कोठेच आढळून येत नाही.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाबाबत विशेष माहिती सांगयचं म्हणजे, विविध कालखंडानुसार राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासकाने राज्य केलं आहे. त्यामुळे, राजकीय कालखंडानुसार राज्याच्या  प्रत्येक भागात विविधता आढळून येते.  असे असले तरी, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासामध्ये बरेच साम्य दिसून येते. मगध, चालुक्य, वाकाटक आणि राष्ट्रकुट यासारख्या वंशावळाने महाराष्ट्र राज्यावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात राज्य केलं होते.

परंतु, यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि संस्कृती आदी गोष्टींचा फारसा विकास झाला नव्हता. या कालखंडानंतर सत्येवर आलेल्या सातवाहन, शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कार्यकाळात मराठी भाषा आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.

मौर्य साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर इ.स.पू. २३० ते २२५ कालखंडा पर्यंत सातवाहन शासकांनी महाराष्ट्र राज्यावर राज्य केलं.  या कालखंडा दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा केली.  शिवाय, मराठी प्राकृत भाषा ही सातवाहनांची भाषा होती. तसचं, इ.स. ७८ साली सत्येवर आलेले राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी यांनी सुरु केलेले शक पंचांग आज देखील रूढ आहे.

सातकर्णी शासकानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर आपले राज्य प्रस्थापित केले. अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्यावर अनेक वंशावळी राज्यकर्त्यांनी राज्य केलं. असे असले तरी, महाराष्ट्र राज्य इस्लामिक सत्येच्या अधिपतेखाली गेल ते, तेराव्या शतकात दिल्लीच्या गादीवर राज्य करीत असलेल्या अल्लाउद्दिन खिलजी आणि मुहम्मद बिन तुघलक यांनी आपल्या राज किर्दीत राज्याच्या दख्खन भागातील काही भाग बळकावून घेतला.  इ.स. १३४७ साली तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्यावर राज्य केलं.

सतराव्या शतकाच्या मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्याजन्मानंतर राज्यांत मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून.  स्व: बळावर महाराष्ट्र राज्य स्थापन केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची ‘अधिकृत’ सुरुवात झाली.

शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज सत्येवर आले.  छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर मराठ्याची सत्ता पेशव्यांच्या हातात गेली.  पेशव्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठ्यांची सत्ता पार भारताच्या सीमेपार प्रस्थापित केली होती. यानंतर इ.स. १७६१ साली झालेल्या मराठा अफगाण युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर, महाराष्ट्राची सत्ता लयास गेली. परिणामी देशाच्या विविध भागांतील मराठ्यांचे साम्राज्य अनेक सरदारांनी वाटून घेतले.

यानंतर देशांत आलेल्या इंग्रज सरकारने मराठ्यांसोबत युद्ध करून त्यांनी सत्ता बळकावून घेतली. परिणामी राज्यांत इंग्रज सत्ता स्थापना झाली.  यानंतर देशांत अनेक क्रांतिकारक, समाजसुधार घडले आणि त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आंदोलन उभारले. भारताला सन १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशांत राज्य स्थापन करण्याबाबत आंदोलन होवू लागले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेकरीता सुमारे १०५ हुतात्म्यानी बलिदान दिले. सन १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याबाबत ऐतिहासिक माहिती मिळते.

भूवर्णन

भारत आशियातील एक महत्त्वाचा देश आहे.भारत हा उत्तर पश्चिम गोलार्धात आहे. भारतीय हा दक्षिण आशियामधील जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आणि प्रमुख देश आहे.

हा देश लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर तर क्षेत्रफळाने जगातील  सातव्या क्रमांकावर आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे  हिंदी महासागरापर्यंत आशियाचा पसरलेला एक मोठा भूभाग आहे.  त्यास भारतीय उपखंड असे म्हणतात. यालाच भारतीय द्वीपकल्प असेही म्हटले जाते.

द्वीपकल्प म्हणजे अशी भूमी की ज्या भूमीच्या तिन्ही बाजूने पाणी असते व एका बाजूने जमिनीचा भूभाग पाण्यामध्ये शिरल्या सारखा दिसतो. या खंडात भारत, माली, पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका व भूतान यांचा समावेश होतो.

महाराष्ट्राची भूमी उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. म्हणून महाराष्ट्राचे स्थान महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्राची पश्चिम – पूर्व लांबी 800 किलोमीटर आहे. व दक्षिण बाजूची रुंदी 720 किलोमीटर आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 36  जिल्हे आहेत.भारतीय द्वीपकल्प पठाराचा आकार अनियमित व त्रिकोणाकृती आहे.

उत्तर भारतामधील मैदानाच्या दक्षिणे पासून कन्याकुमारीपर्यंत ही पठारे पसरलेली आहेत.दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद आकार आहे. द्वीपकल्पाचा पाया कोकणात आहे. व निमुळते टोक पूर्वेच्या बाजूस गोंदिया कडे आहे.पश्चिमेकडील अरबी समुद्र पासून पूर्वेकडे साधारणत: पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरला आहे. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी.

सुमारे 800 किलोमीटर आहे.

महाराष्ट्राच्या वायव्य भागात गाळणा टेकड्या, सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या व सातमाळा डोंगररांगा आहेत. ईशान्येस दरेकसा टेकड्या आहेत. पूर्वेस भामरागड डोंगर व चिरोली टेकडया या नैसर्गिक सीमा तयार करतात. दक्षिणेकडील भागात पठारावर कोकणातील तेरेखोल नदी व हिरण्यकेशी नदी आहेत. आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र  आहे.अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत.

गुजरात राज्य हे महाराष्ट्राच्या वायव्य भागात आहे. दादरा व नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे. पूर्वेस छत्तीसगड, अग्नेयेस तेलंगणा, उत्तरेस मध्यप्रदेश ई. राज्यांच्या सीमा रेषा आहेत. अरबी समुद्र पश्चिमेस आहे. दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्ये आहेत.  नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, जळगाव, बुलढाणा, अमरावती, या जिल्ह्यांची मध्यप्रदेशाला सीमा लागतात.

महाराष्ट्राची सीमा व सीमेवरील जिल्हे –

  • दक्षिणेकडील भागात कर्नाटकाकडे कोल्हापूर,  सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, या सात जिल्ह्यांची सीमा आहेत.
  • दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित  प्रदेशात पालघर जिल्ह्यांची सीमा आहेत.
  • गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्हा पूर्वेकडील छत्तीसगड या राज्याची सीमा आहेत.
  • गोवा या राज्याबरोबर दक्षिणेस गोवा राज्याची सीमा आहे.
  • यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व नांदेड या चार जिल्हा आग्नेयकडील तेलंगण  राज्यातील  सीमा आहेत.
  • मध्य प्रदेशाबरोबर उत्तरेकडे अमरावती, नागपूर, नंदुरबार,धुळे, बुलढाणा , गोंदिया, जळगाव व भंडारा या आठ जिल्ह्यांच्या सीमा आहेत.

लोकसंख्या

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत.

लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ (चौ.कि.मी.) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.

राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.

भाषा

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

महाराष्ट्र राज्य असे आहे की जेथे सर्व प्रकारच्या भाषा बोलल्या जातात त्यामुळे हे राज्य सर्वधर्मसमभाव आहे.

राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे जी सामान्यत: कामाच्या उद्देशाने बोलली जाते. महाराष्ट्राच्या काही भागात कोकणी देखील बोलली जाते. उर्दू, कन्नड, तेलगू, गुजराती आणि भोजपुरी या राज्यात बोलल्या जाणाऱ्या इतर भाषा येथे राहणाऱ्या विविध समुदायाद्वारे बोलल्या जातात.

हवामान

राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते.

मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते.

सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत.

मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

शेती

गहू , ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, भुईमूग, ऊस जास्त प्रमाणात व मूग, हरबरा, चवळी वटाणा मोहरी , उडीद, कुळीद ही पिके वरील पिकाच्या अंतर्गत घेतली जातात पण त्याचे प्रमाण कमी असले तरी बाजारात विक्रीला त्या मालाला उठाव आहे .

राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर खरीपाचे सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. राज्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात तर रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. देशातील ज्वारीखालील एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. तर उत्पादन भारताच्या ५७% आहे. ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आघाडीवर.

ज्वारीचे कोठार :

सोलापूर, अहमदनगर व परभणी हे जिल्हे. ज्वारीच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर.

यवतमाळ :

‘पांढरे सोने’ पिकविणारा जिल्हा. महाराष्ट्रात कर्जत, खोपोली व रत्नागिरी येथे भात (तांदूळ) संशोधन केंद्रे आहेत. धुळे, जळगाव (तापी खोरे); बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती (पूर्णा खोरे) आणि भीमा-कृष्णा खोऱ्यात गहू पीक घेतले जाते.

महाराष्ट्रात एकूण पीकक्षेत्रापैकी ३% क्षेत्र ऊस पिकाखाली, मात्र राज्याच्या आर्थिक विकासात या पिकाचे महत्त्वाचे योगदान. महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबांची संख्या : १.४८ कोटी . गेल्या दीड शतकात महाराष्ट्रात अन्नधान्य लागवडीखालील क्षेत्रात १.७ दशलक्ष हेक्टरची घट झाली आहे.

मृदा

महाराष्ट्रात मृदेचे वेगवेगळे आढळतात.महाराष्ट्रातील ८०% पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे. परिणामी महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काली मृदा आढळते.

महाराष्ट्रात साधारणतः पुढील प्रकारच्या मृदा आढळतात:मृदेचा रंग, पोत,जडण प्रक्रिया आणि थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदेचे पाच प्रकार करता येतील.काळी मृदा ,जांभी मृदा ,तांबडी मृदा, गाळाची मृदा, चिकण मृदा.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती

भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.

वेशभूषा

मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे ” कोळी “.

स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment