महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषयी संपूर्ण माहिती Maharashtra Public Service Commission Information In Marathi

Maharashtra Public Service Commission Information In Marathi महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी एक स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येते. तसेच या उमेदवारांची निवड करणारी एक घटनात्मक संस्था आहे. जी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 अनन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.

Maharashtra Public Service Commission Information In Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषयी संपूर्ण माहिती Maharashtra Public Service Commission Information In Marathi

अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांच्या आरक्षणाच्या नियमानुसार या पदांच्या निवडी केल्या जातात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्य अधिकारी इत्यादी वर्ग एक वर्ग 2 आणि वर्ग 3 ची पदे ही भरली जातात.

MPSC चे मुख्य कार्यालय हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आहे तसेच महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत व कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवाराची उपलब्धता करून देत असतो. विविध सेवांमधील नियम पदोन्नती बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी गोष्टींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग सल्ला देत असतो. तर चला मग आज आपण एमपीएससी स्पर्धा विषयी जाणून घेऊया .

MPSC म्हणजे काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही महाराष्ट्रातील विविध भरती परीक्षांसाठी एक नियमक संस्था आहे, जे राज्य सरकारच्या अनेक विभागां मधील पदांसाठी पदे काढते व त्यावर नियंत्रण ठेवते. प्रशासन, पोलीस वनाधिकारी तसेच अभियांत्रिकी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तेनुसार सक्षम असलेले अर्जदार निवडण्याचे व महाराष्ट्र सरकार दरवर्षी एमपीएससी चाचण्या घेण्याचे काम एमपीएससी विभागाकडे असते.

एमपीएससी या अभ्यासक्रमामध्ये कोणता अभ्यासक्रम समाविष्ट आहे?

एमपीएससी म्हणजे काय तसेच त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड कशी कशी होते? हे आपल्याला माहित आहे तसेच आपण अभ्यासक्रमाबद्दल काही जाणून घेऊया. जर तुम्हालाही भविष्यामध्ये एमपीएससी परीक्षा द्यायची असेल तर त्यासमोर अभ्यासक्रम कसा असेल ह्या अडचणी उभ्या राहणार नाहीत.

प्राथमिक परीक्षा अभ्यासक्रम : प्राथमिक परीक्षेमध्ये चार पेपर असतात, त्यामध्ये सामान्य ज्ञान, सामान्य इंग्रजी, सामान्य मराठी आणि सामान्य अध्ययन तर प्राथमिक परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही उत्तीर्ण होता तेव्हा दुसरी मुख्य परीक्षा देण्यास तुम्ही पात्र आहेत. मुख्य परीक्षेत सहा पेपर असतात, त्यामध्ये दोन भाषेचे पेपर आणि चार सामान्य अध्ययन पेपर असतात.

भूगोल आणि इतिहास यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न उत्तरे विचारले जातात. त्यानंतर भारतीय राजकारण आणि संविधान तसेच मानव संसाधन विकास आणि मानव अधिकार यांचे अतूट संबंध आहे. नियोजन विकास व कृषी अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास अर्थशास्त्र इत्यादी अभ्यासक्रम समाविष्ट आहे.

एमपीएससी अभ्यास कसा करायचा तसेच कोणत्या पद्धतीने करायचा :

MPSC हा अभ्यासक्रम आपण जाणून घेणे खूपच गरजेचे असते. जर तुम्हाला कोणता अभ्यासक्रम आहे? हेच माहीत नसेल तर तुम्ही परीक्षेकरिता पात्र ठरणार नाहीत तसेच परीक्षे करता कोणता अभ्यासक्रम आहे, हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच लोकांना परीक्षा कशी असते किंवा त्या परीक्षा देण्यासाठी अभ्यास कसा करायचा ही पद्धतच माहीत नसते. तर एमपीएससी ही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे असेल तर तुमच्याकडे संबंधित सर्व अभ्यासक्रमांची पुस्तके असणे आवश्यक आहे.

विचारपूर्वक धोरण स्वतः तयार करायला पाहिजे. एमपीएससी ही भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या पक्षांपैकी एक आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी तसेच प्रतिष्ठित संस्था आहे. त्याला एमपीएससी शिकणे गरजेचे असते. परीक्षेत इंग्रजी आणि मराठी सारख्या आवश्यक पेपरचा समावेश असल्यामुळे त्याचे लेखन, कौशल्य विद्यार्थ्याने आधीच वाढवले पाहिजे.

प्रत्येक गोष्टीचे खोलवर अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. कोणत्या लेखकांची पुस्तके तुमच्याकरिता आवश्यक आहेत हे सुद्धा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. निवडलेल्या विषयांची संपूर्ण खोलवर अभ्यास करून मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण जाणून घेतल्या पाहिजे.

एमपीएससी परीक्षा देण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहे :

MPSC परीक्षा पास होणे तेवढेच महत्त्वाचे आहे तसेच एमपीएससी परीक्षा देण्यासाठी तुम्हाला काही पात्रतेच्या अटी आहेत. ज्या जुळत नसल्यास तुम्ही एमपीएससी परीक्षा देऊ शकत नाही. त्यासाठी एमपीएससी भरती परीक्षा मानके ठरविणाऱ्या आयोगाद्वारे ह्या अटी प्रसिद्ध केल्या जातात.

एखाद्या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी सहभागीने किंवा त्या पदासाठी किमान पात्रता आवश्यकतांशी अटींमध्ये जर आपण बसले नाही तर आपल्याला या परीक्षा देता येणार नाही जर तुम्ही खालील अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला ही परीक्षा देता येईल.

  • व्यक्ती हा भारताचा रहिवासी असला पाहिजे.
  • एमपीएससी पात्र होण्यासाठी त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • आरक्षणाचा लाभ केवळ हा महाराष्ट्रात कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या अर्जदारांनाच उपलब्ध राहील.
  • एमपीएससी देण्यासाठी तुमचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. अन्यथा तुम्हाला ही चाचणी देता येणार नाही त्यासाठी तुमचे वय 18 पेक्षा जास्त व साधारणता 33 वर्ष कमाल मर्यादा दिलेली आहे आहेत.

एमपीएससी MPSC वेतन रचना :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पी एस सी द्वारे विविध पदांसाठी वेतन पॅकेज ऑफर केली जातात. त्यांच्या अंतर्गत विविध पदे आहेत. प्रत्येक वर्गाच्या पदासाठी वेतन हे वेगवेगळे राहते. यामध्ये उमेदवारांच्या मोबदल्यात मूळ वेतन तसेच इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश.

एमपीएससी MPSC परीक्षा स्वरूप :

एमपीएससी या परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी उमेदवाराला महाराष्ट्र पी एस सी चाचणी स्वरूपाची माहिती असणे गरजेचे असते. उमेदवारांना जेव्हा परीक्षेची खरे स्वरूप समजेल त्याच वेळी उमेदवार परीक्षेची खरी तयारी करण्यास योग्य ठरतो. एमपीएससी परीक्षेच्या तीन भागांसाठी उमेदवाराला स्वतः तयार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

MPSC दोन पेपर चालवते, त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये एमपीएससीचे सहा पेपर असतात. आणि एमपीएससी परीक्षेचे प्रश्न तुम्ही डाऊनलोड करण्यासाठी mpsc.gov.in वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता.

या दोन पेपराला 200 गुण असतात. तसेच या पेपरचा वेळ हा दोन तासांचा असतो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराला एक चतुर्थांश गुण कमी होतो. भूतकाळात प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवार त्याच्या एकूण स्कोरच्या एक तृतीयांश गमावतो तसेच प्रत्येक प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये लिहिलेला आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतो. केवळ एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी उमेदवार निवडण्याच्या उद्देशाने प्रिलीम्सचे गुण विचारात घेतले जातात.

MPSC परीक्षेसाठी अर्ज कसा?

MPSC ही परीक्षा ज्या उमेदवारांना द्यायचे आहे. त्यांनी महाराष्ट्र एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना काही अटींची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला mpsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. तेथे आपला फोन नंबर, ईमेल पत्ता व मजकूर लिहिणे गरजेचे आहे.

त्यानंतर तुम्हाला लॉगिन माहिती प्राप्त झाल्यानंतर अर्ज भरायचा आहे, त्यामध्ये दिलेली माहिती भरायची आहे. त्यानंतर दस्तावेज अपलोड करायचे आहेत तसेच अर्जाच्या शेवटी तुम्हाला अर्जाची फी भरायची.

फ्रॉम पूर्ण झाल्यानंतर सबमिट करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस परीक्षा असेल त्याच्या आधी आपल्याला प्रवेश पत्र उपलब्ध होतील, नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.

Leave a Comment