मैना पक्षाची संपूर्ण माहिती Maina Bird Information In Marathi

Maina Bird Information In Marathi आपल्या अलौकिक सुंदर रंगासाठी आणि छान आवाजासाठी ओळखली जाणारी मैना सर्वांच्या ओळखीची आहे. अतिशय आश्चर्यकारक पिसारा असणारी ही प्रजाती संपूर्ण जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये आढळत असते. अनेक पक्षी मित्रांची आवडती प्रजाती असणारी ही मैना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, तिला मीना या नावाने देखील ओळखले जाते. हा एक माणसाशी सामाजिक झालेला पक्षी असून, सिमेंटच्या जंगलांमध्ये देखील या पक्षांचे अस्तित्व आढळून येत असते.

Maina Bird Information In Marathi

मैना पक्षाची संपूर्ण माहिती Maina Bird Information In Marathi

या पक्षाची चोच अतिशय मजबूत असण्याबरोबरच अतिशय शक्तिशाली असणारा हा पक्षी भक्कम पायांचा आणि लहान शेपटीचा असतो. या पक्षाचा आकार मध्यम असला तरी देखील अतिशय भुर्रकन उडण्यासाठी हा पक्षी ओळखला जातो. हे पक्षी काही स्वरूपात पोपटाच्या आवाजाची देखील नक्कल करत असतात, त्यामुळे आपोआपच त्यांचा आवाज अतिशय सुरेल येत असतो.

या पक्षांना शिट्ट्या वाजवण्याची देखील कला अवगत असते. आशिया खंडामध्ये उगम पावलेला हा पक्षी जगभरात अनेक देशांमध्ये आढळून येतो. त्यामध्ये मुख्यतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका,आणि उत्तर अमेरिका यांसारख्या ठिकाणांचा समावेश होतो. काही ठिकाणी या मैना पक्षाला सोळंकी या नावाने देखील ओळखले जाते. या पक्षामधील मादी नरापेक्षा काहीशा प्रमाणात मोठी आढळून येते. आजच्या भागामध्ये आपण या मैना अर्थात सोळंकी पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमैना
इतर नावसोळंकी
प्रकारपक्षी
कुटुंब किंवा कुळस्टूरनिडे
वर्गएव्हिज
ऑर्डरप्यासेरिफॉर्मिस

मैना पक्षाचे शारीरिक वर्णन:

मैना हा पक्षी मध्यम आकाराचा असतो. त्याची लांबी सुमारे २१ सेंटीमीटर पासून २३ सेंटीमीटर पर्यंत आढळून येत असते. कबूतर पक्षापेक्षा काहीसा लहान असलेला हा पक्षी मात्र चिमणी पक्षापेक्षा मोठा दिसून येत असतो. यातील मादी पक्षी नर पक्षापेक्षा काहीसा मोठा असतो.

मानेवर काळसर रंग असणारा हा पक्षी पिसाऱ्यावर मात्र तपकिरी रंग दाखवत असतो. सोबतच चोच, डोळे आणि पायांसारख्या ठिकाणी पिवळा रंग देखील दिसून येतो. या पक्षांमधील चोच अतिशय शक्तिशाली स्वरूपाची असते. या पक्षांच्या शरीराच्या प्रमाणात त्यांचे पाय अतिशय लांब दिसून येत असतात. साधारणपणे १०० ते १४० ग्रॅम वजन असणारे हे पक्षी खूपच चपळ देखील असतात.

अतिशय लहान असला तरी देखील खूपच सुंदर दिसणारा हा पक्षी भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळून येत असतो. अगदी मानवी वसाहती मध्ये देखील या पक्ष्यांचे अस्तित्व आपल्याला आढळून येत असते.

मैना पक्षाचे राहण्याचे ठिकाण:

मैना हा पक्षी शक्यतो शेतजमीन किंवा जंगलांमध्ये आढळून येत असतो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्न उपलब्ध असेल, अशा ठिकाणी या पक्षाचे प्रजाती जास्त संख्येने आढळून येत असते. मात्र त्यांना राहण्याची ठिकाण उपलब्ध नसेल तर या प्रजाती मानवी वसाहतींमध्ये देखील आढळून येत असतात. मुख्यतः या प्रजातीद्वारे झाडांवर घरटे बांधले जाते. मात्र झाडे उपलब्ध नसतील अशावेळी घराच्या भिंतींमध्ये देखील या पक्षांकडून घरटी बांधली जात असतात.

मैना हा एक अंडी देणारा पक्षी असल्यामुळे शक्यतो जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये या पक्षाकडून अंडी दिली जातात. एका वेळी मादी मैना पक्षी तीन ते सहा अंडी देत असते. ही अंडी घरट्यामध्ये नर व मादी अशा दोनही पक्षांकडून उबवली जात असतात. या अंड्यामधून १४ दिवसानंतर पिल्ले बाहेर पडतात.

मैना पक्ष्यांच्या प्रजाती:

संपूर्ण जगभर मैना हा पक्षी आढळून येत असतो. त्यामुळे त्यांच्या अनेक प्रजाती पडलेल्या असून, जवळपास मैना पक्षाच्या वीस प्रजाती सांगितल्या जातात. या मैना पक्षाच्या प्रजाती मुख्यतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आणि फिजी इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात.

नदीकाठी राहणाऱ्या मैना पक्षाच्या प्रजातीला पवई मैना असे नाव असून, मुख्यतः दक्षिण आशियामध्ये आणि भारतामध्ये या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात. अतिशय मंजुळ आणि शिट्टी सारखा असणारा आवाज मैना पक्षाद्वारे काढला जातो. अनेक प्रकारचे फळे, अन्नधान्य, किडे, यांचे सेवन करण्याबरोबरच कधीकधी मृत प्राणी आणि मानवाचे अन्न देखील या मैना पक्षाकडून खाल्ले जाते.

मैना पक्षाबद्दल मनोरंजक तथ्य माहिती:

  • मैना या पक्षाची प्रजाती संपूर्ण जगभर आढळते, ज्याची संख्या सुमारे वीस वेगवेगळ्या प्रजातींमध्ये विभागलेली आहे.
  • मैना पक्षांच्या अनेक प्रजाती आढळत असल्या तरी देखील भारतीय मैना आणि गुलाबी महिना अशा विविध प्रजाती या पक्षांच्या लोकप्रिय आहेत.
  • मैना हा पक्षी दोन मुख्य रंगांमध्ये आढळत असतो. ज्यामध्ये पिवळा आणि काळसर तपकिरी रंगाचा समावेश होतो.
  • दिसण्याला नर व मादी मैना पक्षी सारखेच असले, तरी देखील यातील मादी पक्षी हा नर पक्षापेक्षा काहीसा मोठा आढळून येतो.
  • छत्तीसगड या राज्याने मैना पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा दिलेला असून,  येथील हिल मैना पक्षी खूपच प्रसिद्ध आहे.
  • मैना हा एक सामाजिक स्वरूपाचा पक्षी असून, तो नेहमी कळपाने राहणे पसंत करत असतो. त्याचबरोबर मानवाच्या वसाहतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर हा पक्षी आढळून येत असतो.

निष्कर्ष:

आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या अनेक पक्षांचे काही ना काही तरी वैशिष्ट्य असतेच. मैना ही अतिशय माणसाळलेली किंवा सामाजिक झालेली प्रजाती असून, मानवांच्या वस्तीमध्ये देखील या पक्षाचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व आढळून येत असते. पिवळ्या रंगाच्या चोचीसाठी, डोळ्यासाठी व पायांसाठी ओळखली जाणारी ही छोटीशी प्रजाती चिमणीपेक्षा थोडीशी मोठी असते. मात्र कबूतर या प्रजाती पेक्षा काहीसा मोठा आढळून येतो.

जवळपास २१ ते २३ सेंटीमीटर आकार असणारी ही पक्षाची प्रजाती रंगाने करडी ते तपकिरी असते. मात्र पंख व शेपटी यांच्या खालील बाजूने ही काळ्या रंगांमध्ये असते. अर्थात असे देखील म्हणता येईल की काळ्या व तपकिरी रंगाचे मिश्रण असणारी ही प्रजाती असते. ही प्रजाती अतिशय शक्तिशाली असण्याबरोबरच चपळ देखील असते.

वजनाने साधारणपणे १०० ते १४० ग्रॅम असणारा हा पक्षी खूप अलौकिक स्वरूपाचा असतो. आजच्या भागामध्ये आपण या मैना पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, मैना पक्षाचे वर्णन जाणून घेतले आहे. सोबतच या पक्षाच्या इतिहास व पार्श्वभूमी तसेच भौतिक माहिती देखील घेतलेली असून, या पक्षांच्या राहण्याच्या सवयी, विविध प्रजाती, अन्न खाण्याची पद्धत, विविध सवयी, प्रजनन इत्यादी बाबत माहिती बघितलेली असून, त्यांच्या बाबतीत काही तथ्य माहिती देखील जाणून घेतलेली आहे.

FAQ

मैना या पक्षाची साधारण लांबी किती असते?

मैना या पक्षाची साधारण लांबी २० ते ३० सेंटीमीटर समजली जाते.

मैना या पक्षाचा रंग कसा असतो?

मैना या पक्षाचा रंग काळसर तपकीरी असतो, मात्र तिचे पाय, डोळे आणि तोच पिवळसर रंगांमध्ये असते.

मैना पक्षी कोणकोणत्या ठिकाणी राहत असतो?

मैना हा पक्षी मानवी वसाहतीसह जंगलामध्ये देखील राहत असतो. त्याचबरोबर गवताळ प्रदेश व जंगल इत्यादी ठिकाणी देखील यांची संख्या आढळून येत असते. मात्र यांच्या प्रजातीची संख्या काहीशी कमी होत चाललेली आहे.

मैना पक्षी कशा प्रकारचा आहार घेत असतो?

मैना पक्षी हा सर्वभक्षी प्रकारातील असून, त्यांच्याद्वारे विविध फळे, बियाणे, यांच्यासह लहान-लहान कीटकांची देखील सेवन केले जात असते.

मैना पक्षाच्या प्रजनन बद्दल काय सांगता येईल?

मैना हा पक्षी अंड्याच्या स्वरूपातून आपल्या पिल्लांना जन्म देत असतो. या पक्षाच्या अंड्याची संख्या सुमारे तीन ते सहा पर्यंत असते. १४ दिवस अंडी उबवल्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडत असतात.

Leave a Comment