मकर संक्रांत सणाची संपूर्ण माहिती Makar Sankranti Festival Information In Marathi

Makar Sankranti Festival Information In Marathi मकर संक्रांत हा एक सामाजिक सण आहे. तसेच त्यामध्ये समाजातील प्रेम भाव दिसून येतात. हा सण महाराष्ट्रात अतिशय उत्साह व आनंदाने साजरा केला जातो. या सणांमध्ये एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जातात तसेच ही पद्धत रूढी परंपरा खूप जुनी आहे. या सणाचे महत्त्व आपण जाणतो हा एक हिंदू सण आहे. हा सण सुरू करण्यामागे सुद्धा पूर्वजांचा एक चांगला हेतूच असेल असे आपल्या लक्षात येते. ज्याप्रमाणे दसरा दीपावली गणेश चतुर्थी गुढीपाडवा नवरात्र केले जातात तसेच मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो.

Makar Sankranti Festival Information In Marathi

मकर संक्रांत सणाची संपूर्ण माहिती Makar Sankranti Festival Information In Marathi

हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येतो, त्यामुळे प्रत्येकाच्या अंगी थंडी भरल्याचे जाणवते आमच्या लहानपणी सुद्धा आम्ही मकर संक्रांत असली की, नवीन कपडे घालून सकाळी एकमेकांच्या घरी तिळगुळ वाटण्यासाठी जायचं, हा सण 14 जानेवारीला येतो. कधीकधी 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला सुद्धा हा सण येत असतो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा हा उत्सव संपन्न करण्याची परंपरा आहे.

मकर संक्रांत हा सण कसा साजरा करतात :

मकर संक्रांत या दिवसाला विशेष तयारी केली जाते. या सणाला सर्वांच्या घरी काही गोडधोड पदार्थ केले जातात तसेच तिळाचे लाडू करतात. त्यालाच आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे सुद्धा म्हणतात. हे तिळाचे लाडू किंवा तिळगुळ प्रत्येकाच्या घरी वाटण्यासाठी जातात.

मकर संक्रांत या सणाला सुहासिनी वाया वान देत असतात. या वाणांमध्ये मटर, हरभरे, बोर, ऊस, गहू, तीळ व नाणे असल्याचे आपण पाहतो. सुवासिनी बाया एकमेकींच्या घरी जाऊन हा कार्यक्रम पार पाडत असतात. तसेच त्यांना हार्दिक कुंकू सुद्धा लावण्याची परंपरा आहे. पंढरपुरामध्ये सुद्धा रुक्मणी मातेला सवासी स्त्रिया आजच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी वाण देण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात.

महाराष्ट्र मध्ये हा सण कसा साजरा केला जातो?

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत या दिवशी नवीन कपडे घालतात तसेच एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे तिळगुळ देऊन म्हणण्याची परंपरा आहे. या सणाला तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ असल्यामुळे थंडीच्या मोसमात शरीरासाठी उष्णता मिळणे गरज असते म्हणून याचे मुख्य कारण या मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी असे आपल्याला कळते.

मकर संक्रांत पूजा :

मकर संक्रांत हा सण हिंदू देवता यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे या सणाच्या दिवशी शिव मंदिरामध्ये लोक भेट देत असतात तसेच त्याचा सन्मान करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्याचे पूजन करतात. मकर संक्रांति सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते, म्हणून हिंदू धर्मातील हा एक महत्त्वपूर्ण दिवस व घटना मानली जाते. या दिवशी हिवाळ्याच्या हंगामाची समाप्ती व जास्त दिवस उबदार सुरू होतो.

हा सण हिंदू धर्माच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. देवी-देवतांची पूजा केल्यास या दिवशी अधिक पुण्य मिळते असे पुराण व धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. या सणाच्या दिवशी दान केल्याने अतिशय पुण्य मिळते. भगवान सूर्याने शनि देवाला वर्धन दिले आहे की, वर्षातून एकदा तो मकर राशीत शनि देवाच्या राशीत असल्यास तो शनि देवाचे घर समृद्ध कर्मकर राशीत आल्यावर शनिदेवाने सूर्याची तीळ आणि गुळाने पूजा केली.

मकर संक्रांत आणि पतंग :

मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया दिवसभरामध्ये हळदी कुंकवाचे विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतात. त्यामुळे घरातील छोटी मुले किंवा मोठी मंडळी ही पतंग उडवण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गुंतलेले आपल्याला दिसतात.
त्यामुळे पतंग उडवण्याची ही पद्धत सुरू झाली असावी, त्या दिवशी पतंग बनविण्याचे काम सुद्धा जोरात चालते पतंग कसा तयार करायचा हे सुद्धा वडिलांकडून किंवा शिकून घेतले जाते.

मकर संक्रांत या सणाची कथा :

मकर संक्रांत या सणाविषयी एक पौराणिक कथा आहे. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण होतो म्हणजेच उत्तर गोलार्धात येतो. धार्मिक दृष्टिकोनातून जर पाहिले तर या दिवसापासून देवलोग म्हणजे स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या दिवशी स्वर्गाची दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये असे सांगितलेले आहे.

जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळामध्ये शरीराचा त्याग करतात. त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यू लोकात प्रवेश मिळत नाही, म्हणजे त्यांना मुक्ती मिळते या संदर्भामध्ये एक आख्या आहे. या दिवशी श्री भगवान विष्णूने पृथ्वीवरील असूरांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवला असे म्हटले जाते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयावर मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो व या सणाच्या दिवशी बरेच लोक पतंग उडवून सुद्धा हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रांत दान महिमा :

मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी केलेले दान हे सूर्यदेव आणि नवग्रह तसेच देवी-देवतांची पूजा केल्यास या दिवशी अधिक पुण्य मिळते असे पुराण व धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. या सणाच्या दिवशी दान केल्याने अतिशय पुण्य मिळते.

भगवान सूर्याने शनि देवाला वर्धन दिले आहे. की, वर्षातून एकदा तो मकर राशीत शनि देवाच्या राशीत असल्यास तो शनि देवाचे घर समृद्ध कर्मकर राशीत आल्यावर शनिदेवाने सूर्याची तीळ आणि गुळाने पूजा केली. मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेव आणि सूर्य देवाच्या प्रसन्नतेच्या दिवशी लोकरीचे कपडे कापूस चादरी वाहना धान्य तीळगुळ आदी वस्तू गरजूंना दान करण्याची प्रथा आहे, त्यामुळे पुण्य मिळते.

मकर संक्रांत या सणाचे महत्त्व :

मकर संक्रांत या सणाला हिंदू धर्मामध्ये विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. मकर संक्रांत या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते तसेच त्याला तांदूळ फुले नैवेद्य अर्पण करतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी सुद्धा विधी केल्या जातो.

महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये लोक मित्र कुटुंब मिठाई भेटवस्तूंची देवाण-घेवाण करतात. पारंपरिक नृत्य करतात तसेच हा सण अतिशय उत्सवाने साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे पतंग तयार केले जातात तसेच पतंग उडवण्यामध्ये एकमेकांमध्ये शर्यती लागतात. या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे सामाजिक एकता व प्रेमभाव होय.

FAQ

संक्रांत या दिवशी सुवासिनी स्त्रिया काय करतात?

वान हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात.

संक्रांत या दिवशी काय करतात?

पतंग उडवतात.

संक्रांत या सणाच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करतात?

सूर्य देवाची पूजा करतात.

मकर संक्रांत कोणत्या महिन्यात येतो?

मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो.

मकर संक्रांत या सणाच्या दिवशी लोक काय वाटतात?

मकर संक्रांत या सणाच्या दिवशी लोक तिळगुळ वाटतात तसेच दान करण्यासारख्या काही वस्तू वाटतात.

Leave a Comment