मलाई कोफ्ता रेसिपी मराठी Malai Kofta Recipe in Marathi दररोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर चटपटीत मलाई कोफ्ता रेसिपी तयार करून बघा. मलाई कोफ्ता ही रेसिपी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व पोषक असते. आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मलाही खूप काही रेसिपी मागवली तर आपल्या ते खूप महागडी वाटते. परंतु आम्ही तुमच्याकरिता खास मलाई कोफ्ता ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची याविषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. मलाई कोफ्ता तयार करण्यासाठी बटाटा आणि पनीरचा वापर केला जातो. तसे तर बटाटा आणि पनीरचे आपण अनेक प्रकारच्या रेसिपीज पाहिल्या आहेत. तर चला मग आज मलाई कोफ्ता ही रेसिपी कशी बनवायची याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
मलाई कोफ्ता रेसिपी मराठी Malai Kofta Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
मलाई कोफ्ता ही रेसिपी खाण्यासाठी अप्रतिम लागते तसेच ही रेसिपी एक प्रसिद्ध विजिटेरियन डिश आहे. पनीर कोफ्ते हे क्रीम ग्रेव्हीमध्ये बुडवल्यामुळे त्यांना एक वेगळीच चव येते. आणि ही चव एवढी टेस्टी असते की, त्याच्यामुळे मलाई कोफ्ते ही रेसिपी मसूर झाली. कडी कोफ्ता, व्हेज कोफ्ता, पनीर कोफ्ता, नॉनव्हेज कोफ्ता, मलाई कोफ्ता इत्यादी रेसिपीज आपण पाहिल्या आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखीच चविष्ट व ग्रेव्हीदार कोफ्ते रेसिपीज आपण अगदी कमी वेळात घरी तयार करू शकतो. आज आपण मलाई कोफ्ता रेसिपीविषयी सविस्तर माहिती व त्याकरता लागणारे सामग्री तसेच पाककृती पाहणार आहोत.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 8 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
मलाई कोफ्ता ही रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते आणि या पूर्वतयारी करता आपल्याला किमान 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मलाई कोफ्ता ही रेसिपी कुकिंग करण्याकरता 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
मलाई कोफ्ता ही रेसिपी तयार करण्यासाठी एकूण वेळ आपल्याला 40 मिनिट एवढं लागतो.
मलाई कोफ्ता रेसिपी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
1) 1 वाटी बारीक किसलेले पनीर
2) 1 वाटी उकडलेले व मॅश केलेले बटाटे
3) एक वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर
4) पाव चमचा जिरे
5) चवीनुसार मीठ
6) दोन बारीक चिरलेल्या मिरच्या
7) तेल तळण्यासाठी
8) मैदा तीन चमचे
कोफ्ता ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
1) तेल
2) दोन मध्यम आकाराचे टोमॅटो
3) हिरवी मिरची
4) आले लसूण पेस्ट दोन चमचे
5) पाव चमचा हिंग
6) एक चमचा जिरे
7) अर्धा चमचा धने पावडर
8) पाव चमचा हळद
9) मिरची पावडर आवश्यकतेनुसार
10) पाव वाटी क्रीम
11) एक चमचा मैदा
12) एक चमचा गरम मसाला
13) चवीनुसार मीठ
14) बारीक चिरलेला कोथिंबीर दोन चमचे
कोफ्ता तयार करण्याची पाककृती :
- ॲपल ज्यूस मराठी
- कोफ्ते तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. लागेल व त्यामध्ये अर्धा चमचा मैद्याचे पीठ घालून सोपे तयार करून घ्या.
- कोफ्ते तयार करण्याची सामग्रीवर दिलेली आहे. त्यातील सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
- कोफत्याचे सर्व साहित्य व अर्धा चमचा मैदा पिठात घातल्यानंतर हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
- नंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेली कोफ्ते लाल सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या, नंतर त्यांना मधून बाहेर काढा.
- आता कोफ्त्यांसाठी ग्रेव्ही कशी तयार करायची ते पाहूया.
- कोफ्त्यांसाठी ग्रेव्ही तयार करण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घ्या.
- यानंतर मलाई आणि पीठ एकत्र करून पेस्ट बनवा.
- नंतर कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे घाला.
- नंतर टोमॅटो प्युरी, धणे, हळद आणि तिखट घाला. नंतर पॅन झाकून ठेवा आणि थोडावेळ मध्यम आचेवर शिजू द्या.
- टोमॅटो प्युरी अर्ध्यापर्यंत कमी झाल्यावर कढईमध्ये मलाई, मैदा यांची मिश्रण आणि मीठ घाला.
- त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घाला व पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये गरम मसाला पावडर कोथिंबीर घालून घ्या.
- आता त्याला दोन मिनिटे उकळी येऊ द्या आणि नंतर तयार झालेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घाला.
- नंतर उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्या. अशाप्रकारे गरमागरम हॉटेल सारखी मलाईदार कोफ्ते तयार आहेत.
पोषक घटक :
मलाई कोफ्त्यामध्ये प्रथिने, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, जीवनसत्वे, फॉस्फरस, ऊर्जा, शुगर कर्बोदके फायबर लोह इत्यादी पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आणि आपल्या शरीर देखील निरोगी राहते.
फायदे :
मलाई कोफ्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढते भूक भागलेची जाणीव होते.
मलाई कोफ्त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते. त्यामुळे आपण त्याची सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबूत राहत असते.
तसेच त्यामध्ये आपण पनीरचा उपयोग केलेला असल्यामुळे आपल्याला झोपही छान लागते.
शरीरामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे सांधेदुखीची समस्या होऊ शकते. परंतु मलाई कोफ्ते खाल्ल्यामुळे आपल्याला या त्रासापासून देखील आराम मिळू शकतो.
तोटे :
मलाई कोफ्त्यामध्ये आपण पनीरचा उपयोग केलेला आहे आणि पनीर जर भेसळयुक्त असेल तर आपल्याला त्वचा राशेस, डोकेदुखी, पोटदुखी, टायफाईड, अल्सर अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात म्हणून पनीर घेत असताना स्वच्छ व घरी तयार केलेले पनीर घ्यावे.
पनीर कोफ्त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. ज्यांना हृदयविकार आहे. अशांनी मलाई कोफ्ता कमी खावा प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये.
मलाई कोफ्ता हे तळलेला एक पदार्थ असल्यामुळे ते अति प्रमाणात खाल्ल्यास मळमळ पोटदुखी त्रास आपल्याला होऊ शकतो.
तर मित्रांनो तुम्हाला, मलाई कोफ्ते या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा. ही रेसिपी घरी तयार करून बघायला विसरू नका.