मालपुवा रेसिपी मराठी Malpua in Marathi

मालपुवा रेसिपी मराठी Malpua in Marathi मालपुआ ही उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी रेसिपी आहे.  ही रेसिपी रवा, मैदा, गव्हाचे पीठ, खवा इ.पदार्थ वापरूनही केले जाते.  कोणताही सण आला म्हणजे गोडधोड पदार्थांची रेलचेल प्रत्येकाच्या घरात असतेच,  खास करून ती होळीच्या सणाला बनवण्यात येते.  उन्हाळ्यामध्ये मालपुवा खाण्याची मजाच वेगळी असते.  मालपोआ म्हणजेच पॅन केक असे म्हटले तरी चालेल.  तर आज आम्ही तुमच्याकरता सोप्या शब्दांमध्ये मालपुआ ही रेसिपी घेऊन आलो आहोत.

Malpua

मालपुवा रेसिपी मराठी Malpua in Marathi

रेसिपी प्रकार  :

मालपुवा ही एक शाकाहारी भारतीय गोड मिठाई रेसिपी आहे.  जी बांगलादेश, ओडीसा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र तसेच नेपाळमध्ये खूपच लोकप्रिय आहे.  हे देवी देवतांना प्रसादाच्या स्वरूपात अर्पण केले जाते.  मालपुआ बनवण्याच्या विविध पद्धती आहेत तसेच मालपुआचे प्रकार देखील अलग आहेत जसे की, केळी मालपुआ, आंब्याचा मालपुआ, खव्याचा मालपुआ इ. जर तुम्हालाही तुमच्या घरी धार्मिक सणासुदीला किंवा एखाद्या शुभ प्रसंगाच्या वेळी मालपुआ ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता.  तेही कमी वेळात व अतिशय सोप्या पद्धतीने तसेच खायलाही चविष्ट लागते.  तर चला मग जाणून घेऊया मालपुवा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती

हे रेसिपी किती जणांकरिता आहे ?

ही रेसिपी आपण पाच व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्व तयारी करत लागणारा वेळ  :

मालपुआ रेसिपीच्या  पूर्वतयारी करता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 25 मिनिटे वेळ लागतो.

टोटल टाईम  :

ही रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 40 मिनिटे वेळ लागतो.

मालपुआ तयार करण्याकरता लागणारे सामग्री  :

1) दोन केळी

2) एक लिटर फुल क्रीम दूध

3) एक वाटी रवा

4) एक वाटी साखर

5)  वेलची पूड पाव चमचा

6) तळण्याकरता तेल किंवा तूप

7) पाणी आवश्यकतेनुसार

8)  बादाम पिस्ता बारीक चिरलेला

9) दोन केशर धागे

10) मीठ

मालपुवा बनवण्याची पाककृती  :

 • मठ्ठा रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम आपल्याला मालपुवा बनवण्यासाठी दोन केळी चांगली स्मॅश करून घ्यायचे आहे.
 • नंतर एका भांड्यामध्ये मॅच केलेली केळी आणि दूध एकत्रित करा.
 • नंतर त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालून घ्या.
 • नंतर त्यामध्ये थोडे केशर व पाव  चमचा वेलची पूड घाला.
 • तसेच त्यामध्ये अर्धा चमचा बडीशोप पावडर, व अर्धा चमचा अख्खी बडी सोप, चिमूटभर मीठ, तीन चमचे कंडेन्स्ड मिल्क घालून चांगले मिश्रण एकत्रित करून घ्या.
 • नंतर हे मिश्रण दोन तास असेच ठेवून द्यायचे आहे.  दोन तासानंतर त्यावर थोडे फुगे उठतील ते उठल्यानंतर पुन्हा हे मिश्रण चांगले ढवळून घ्या.
 • आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये देसी तूप गरम करण्यासाठी ठेवा.  तूप गरम झाल्यावर त्यामध्ये चमचाच्या साह्याने पीठ ओता.
 • नंतर मालपुआ हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, अशा वेळी गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे.
 • अशाप्रकारे सर्वच मालपुआ तळून घ्या.
 • नंतर साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून त्यामध्ये दोन वाट्या साखर घाला तसेच पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
 • साखरेच्या पाकात एक तार बनते का, ते तपासा व नंतर गॅस बंद करा आणि त्यात केशर घाला.  आता तळलेले मालपुआ या पाकामध्ये टाका.
 • हे मालपुआ 5 मिनिटं शिजवून घ्या.  नंतर ते एका प्लेटमध्ये काढून बदाम व पिस्त्याने सजवून गरमागरम सर्व्ह करा.
 • अशाप्रकारे मालपुआ मिठाई ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी करून बघा.

पोषक घटक  :

मालपुआ या पदार्थांमध्ये प्रथिने, ऊर्जा, चरबी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, प्रथिने, फॅट, असे अनेक पौष्टिक घटक आहेत.  हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

मालपुआ खाण्याचे फायदे :

मालपुआ दूध, खवा, साखर, गव्हाचे पीठ, केळी यांच्यापासून तयार केला जातो.  त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने व ऊर्जेची निर्मिती होते.  जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

मालपुआ खाल्ल्यामुळे आपल्याला एनर्जी भरल्यासारखे वाटते.  भूक लागत नाही रोगप्रतिकार शक्ती वाढते.

त्यामधील कॅल्शियम मुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात.  अशक्तपणा नाहीसा होतो.

तोटे   :

मालपुवा ही एक मिठाई आहे, त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हे खाणे टाळले पाहिजे अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

मालपुआ तळून तयार केल्या जातो त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्याचे भीती असते.  म्हणून हे पदार्थ प्रमाणातच खायला पाहिजे.

ज्यांना दुधाची एलर्जी आहे, अशा व्यक्तींनी देखील हे पदार्थ खाणे टाळावे.

तर मित्रांनो, मालपुआ या रेसिपी विषयी माहिती तुम्हाला  कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा.

Leave a Comment