मँगो केक मराठी Mango Cake Recipe In Marathi मँगो केक हा मँगो आणि मैदा पासून बनवला जातो. हा चवीला गोड आणि स्वादिष्ट केक आहे. मँगो केक हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहेत, केक हा सर्वाना आवडतो, वाढदिवस किंवा सेलिब्रेशनसाठी आज-काल केकचा उपयोग करतात. भारतात केक हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार केक खायाला मिळतात.
मोठ्या शहरात केक सहज मिळून जातात, परुंतू काही ग्रामीण भागात स्वादिष्ट केक मिळत नाही. काही लोकांना मँगो केक खूप जास्त आवडतो. पण त्याचा परिसरात चवदार केक मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने हॉटेल सारखा स्वादिष्ट मँगो केक कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण मँगो केक रेसिपी पाहणार आहोत.
मँगो केक मराठी Mango Cake Recipe In Marathi
मँगो केकचे प्रकार :
मँगो केक हा एक स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे. मँगो केक विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो, याचे अनेक प्रकार पडतात. जसे मँगो केक, चॉकलेट केक, व्हॅनिला केक, बिस्कीट केक, स्टॉबेरी केक, आईस्क्रीम केक, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मँगो केक रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
मँगो केकच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
मँगो केक तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर केक बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मँगो केक कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
मँगो केक बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.
मँगो केकसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 1 वाटी पिठी साखर.
2) 1 वाटी मैदा.
3) थोडी मिल्क पावडर.
4) 1 चमच बेकिंग पावडर.
5) 1 चमच बेकिंग सोडा.
6) 1 वाटी आंब्याचा गाभा.
7) अर्धा चमच वेलची पावडर.
8) अर्धी वाटी काजू, बदाम, तुकडे.
9) थोडी लाल चेरी.
पाककृती :
- सर्वात पहिले आंबा स्वच्छ धुवून त्याचा मधातील गाभा काढा, आणि मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- नंतर एका प्लेटमध्ये मैदा, पिठी साखर, मिल्क पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व्यवस्थित गाळून घ्या.
- नंतर या साहित्यामध्ये आंब्याचे बारीक मिश्रण, दूध आणि तूप टाकून चांगले मिक्स करा.
- केकचे मिश्रण थोडे पातळ बनवा, पूर्ण मिश्रण एकजीव झाले पाहिजे. आता आपले केकचे मिश्रण तयार आहे.
- आता एक गोल डबा घ्या, त्याला आतून थोडे तेल लावा, म्हणजे आपला केक डब्याला चीपकनार नाही.
- आता केकचे मिश्रण डब्यात टाका, आणि व्यवस्थित टॅप करा, यावर थोडे काजू बदामचे तुकडे टाका.
- आता एक प्री हिट कुकर घ्या, कूकरच्या मधात एक स्टँड ठेवा, आणि कुकर गरम करा.
- आपला केकचा डबा कुकर मधील स्टँडवर ठेऊन झाकण व्यवस्थित लाऊन घ्या.
- आणि 15 ते 20 मिनिट केक चांगला होऊ द्या, गॅस मध्यम आसेवर ठेवा.
- 20 मिनिट नंतर मँगो केक चांगला फुगला असेल, चाकुने तपासून घ्या, केक पूर्ण झाला की नाही.
- केक झाला असेल तर, डबा बाहेर काढा, आणि थोडा थंड होऊ द्या. नंतर एका प्लेटमध्ये व्यवस्थित केक काढून घ्या.
- मँगो केकवर थोडी चेरी आणि काजू बदामचे तुकडे टाका, अशा प्रकारे केक समजवून घ्या.
- आता आपला स्वादिष्ट आणि गोड मँगो केक खाण्यासाठी तयार आहे, आपण एका प्लेटमध्ये घेऊन, मित्रासोबत केक खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
मँगो केकमध्ये असणारे घटक :
मँगो केक तयार करण्यासाठी आपण मँगो, तूप, साखर असे पौष्टिक पदार्थ वापरतो. यामुळे यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रोटीन, शुगर, फॅट, चरबी, व्हिटॅमिन सी, मॅग्निशियॅम, सोडियम, कर्बोदके हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
फायदे :
मँगो केक खाल्ल्याने आपल्या व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते, यामुळे आपल्याला हृदय विकार होत नाही.
आणि आपल्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपण निरोगी राहतो.
यामध्ये असणारे चरबी, फॅट, शुगर, सोडियम, हे घटक आपल्या शरीराची वाढ करतात, आणि शारीरिक थकवा दूर करतात.
मँगो केकमध्ये असणारे सर्व घटक आपल्या खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
मँगो केक एक पौष्टिक पदार्थ आहे, आपण मँगो केक जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला उलटी होऊ शकते.
यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.
म्हणून मँगो केक आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला मँगो केक रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.