Marathwada Information In Marathi महाराष्ट्रातील सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेला, मात्र नेहमी तेथील पाणीटंचाई आणि दुष्काळासाठी चर्चेत असणारा प्राकृतिक विभाग म्हणजे मराठवाडा होय. या विभागाच्या सीमा निश्चित नसल्या तरी देखील त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक जिल्ह्यांच्या सीमेवरून हे प्रदेश ओळखले जात असतात. अतिशय विस्तीर्ण असलेल्या मराठवाडा प्रदेशाच्या सीमा अनेक कालखंडामध्ये बदलत राहिल्या, आणि त्याचे नाव देखील बदलत राहिले.
मराठवाडा विषयी संपूर्ण माहिती Marathwada Information In Marathi
१९८२ पासून आज पर्यंत या विभागांमध्ये जवळपास सात जिल्हे वसलेले असून, त्यांच्यामध्ये परभणी, औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, उस्मानाबाद, आणि लातूर या सात जिल्ह्यांचा समावेश होत असतो. साधारणपणे ६४२८६ चौरस किलोमीटर असणाऱ्या या मराठवाडा विभागामध्ये १९८१ च्या जनगणनेनुसार जवळपास ९७ लाख लोकसंख्या आहे असे सांगितले जाते.
अगदी पुराणांमध्ये देखील या मराठवाडा विभागाचा उल्लेख असून, ऋग्वेदामध्ये देखील हा प्रदेश उल्लेखित केलेला आहे. महाभारतामध्ये दंडाकारण्य आणि रामायणामध्ये दक्षिमापथ नावाच्या प्रदेशांचा उल्लेख केलेला आहे, आणि हा प्रदेश दुसरा तिसरा काहीही नसून आपला मराठवाडा प्रदेश आहे.
मध्यंतरीच्या काळामध्ये या मराठवाडा प्रदेशाचे अनेक राज्यांमध्ये विभाजन झाले होते, मात्र पुन्हा एकदा स्वातंत्रनंतर हा भाग एकवटण्यास मदत झाली. या विभागातील उस्मानाबाद जिल्हा काही कालावधी पुरता कुंतल या नगरीचा भाग झालेला होता. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर हा भाग देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सामील राहिलेला आहे.
आज या विभागाला मराठवाडा हे नाव देण्यात आलेले असले, तरी देखील अगदी १८६४ या वर्षी कागदपत्री या ठिकाणाला मराठवाडा नाव मिळाले होते, आणि हेच नाव आजकाल रूढ झालेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक लोक राहत असून, येथील बोलीभाषा देखील काही प्रमाणात वेगवेगळे आहेत. मध्ययुगीन कालावधीमध्ये येथे निजामाचे राज्य मोठ्या प्रमाणावर होते असे सांगितले जाते. आजच्या भागामध्ये आपण या मराठवाडा विभागाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
सध्याच्या महाराष्ट्र राज्याचा एक उत्तम प्राकृतिक विभाग मात्र नेहमीच दुष्काळ आणि पाणीटंचाई यासाठी ओळखला जाणारा प्रदेश म्हणून मराठवाडा याला ओळखले जात असते. या प्रदेशावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केलेले असून, काळानुसार त्याच्या सीमा आणि नाव देखील बदलत राहिलेले आहेत.
यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश असून, अतिशय विस्तृत क्षेत्रफळासाठी देखील मराठवाडा हा प्रदेश ओळखला जात असतो. महाभारत, रामायण यांसारख्या प्राचीन काव्यामध्ये देखील आढळून येतात. मात्र त्यावेळी त्याचे नाव काहीसे वेगळे समजले जात असे. मुख्यतः १८६४ या वर्षी कागदपत्री या प्रदेशाला मराठवाडा हे नाव मिळाले असे आढळून येते.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेत लोक असल्यामुळे हैदराबाद संस्थानांमधून हा भाग वेगळा केल्यानंतर त्याला मराठवाडा हे नाव रूढ झाले होते.
मराठवाड्याचा भौगोलिक विस्तार व रचना:
मराठवाडा हा संपूर्ण परिसर जवळपास गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे असे सांगितले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेली गोदावरी नदी या मराठवाडा विभागाची जीवनदायी म्हणून ओळखली जाते. या प्रदेशाच्या उत्तर बाजूस बघायचे गेले, तर जळगाव आणि बुलढाणा हे दोन जिल्हे असून पश्चिम दिशेला अहमदनगर, नाशिक, यांसारखे जिल्हे आढळून येत असतात.
त्याचप्रमाणे सोलापूर आणि कर्नाटक मधील गुलबर्गा हे दोन ठिकाणी दक्षिण दिशेकडून तर पूर्व बाजूने आंध्र प्रदेश राज्य वसलेले आहे. त्याचबरोबर या बाजूने अकोला व यवतमाळ हे जिल्हे देखील आहेत. येथील जमीन मुख्यतः बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे. या मराठवाडा विभागामध्ये काळ्या स्वरूपाची मृदा आढळून येत असते, आणि या मृदेमध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या प्रदेशात पावसाचे प्रमाण मात्र काहिसे कमी आढळून येत असते.
मराठवाडा विभागातील काही महत्त्वाची पर्यटन स्थळे:
मित्रांनो, मराठवाडा विभागातून गोदावरी नदी गेलेली आहे, आणि या नदीच्या काठी अनेक पर्यटन स्थळे तयार झालेली असून अनेक धार्मिक स्थळांचे माहेरघर म्हणून देखील या मराठवाडा विभागाला ओळखले जात असते. महाराष्ट्रातील पैठण हे अतिशय उत्तम ठिकाण असून, भोकरदन सारखे शहर देखील मराठवाडा विभागातच वसलेले आहे.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केलेले अजिंठा आणि वेरूळ ही दोन ठिकाणी येथे असून, हे ठिकाण मराठवाडा विभागाच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आहे, यामुळे अगदी जागतिक पातळीवर देखील महाराष्ट्राची ओळख निर्माण होण्यास मदत झालेली आहे.
त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, आणि घृष्णेश्वर हे तीन ज्योतिर्लिंग देखील आहेत. त्याचबरोबर तुळजापूर, माहूर, आणि आंबेजोगाई येथील देवीची मंदिरे देखील खूपच प्रसिद्ध समजले जातात. या ठिकाणी गुरुगोविंद सिंग यांनी नांदेड ठिकाणी समाधी घेतलेली असून, येथे मोठा गुरुद्वारा देखील आहे. किल्ले देखील मोठ्या प्रमाणात असून, या मराठवाडा प्रदेशात देवगिरी, परांडा, नळदुर्ग, यांसारख्या किल्ल्यांचा समावेश होत असतो.
निष्कर्ष:
महाराष्ट्र हे मोठ्या राज्यांच्या यादीमधील एक राज्य असून, या महाराष्ट्राचा विस्तार प्रचंड मोठा झालेला आहे. महाराष्ट्र मध्ये जवळपास ३६ जिल्हे असून, या जिल्ह्यांचा कारभार बघण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर यंत्रणा आवश्यक असते. मात्र या विविध ठिकाणांचा कारभार सोप्या पद्धतीने करता यावा याकरिता अनेक कालावधीमध्ये त्याला वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित केलेली आहे.
तसेच वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळे भाग देखील तयार करण्यात आलेले असून, प्राकृतिक विभाग, प्रशासकीय विभाग, यांसारखे विभाग आढळून येत असतात. यातील मराठवाडा हे देखील एक उत्कृष्ट रचना असलेले विभाग असून, त्या अंतर्गत सात जिल्ह्यांचा समावेश होत असतो. अगदी प्राचीन काळापासून या प्रदेशाचा उल्लेख असून, वेळोवेळी त्याची नावे देखील बदलण्यात आलेली आहेत. व त्याचा विस्ताराचा क्षेत्रफळ देखील कमी अथवा अधिक करण्यात आलेले आहे.
मात्र हा प्रदेश स्वतंत्र काळामध्ये फार प्रसिद्ध झाला होता, कारण हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अंतर्गत या मराठवाडा विभागाला देखील संस्थांन अंतर्गत जोडले गेले होते. ज्यावेळी हैदराबाद मुक्तिसंग्राम झाला त्यात या मराठवाड्यातील लोकांनी देखील मोठा सहभाग नोंदवला होता.
या संस्थानाचे पुढे भारतामध्ये संमीलिकरण झाल्यानंतर त्यातील हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा दोन भाग पुन्हा वेगवेगळा करण्यात आला. यातील मराठी भाषिक भाग म्हणजेच आजचा मराठवाडा होय. या मराठवाड्याला स्वतंत्र करण्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा मोठा वाटा असून, त्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन देखील साजरा केला जात असतो.
आजच्या भागामध्ये आपण मराठवाडा या महाराष्ट्राच्या एका विभागाबद्दल माहिती बघितलेली असून, त्याची भौगोलिक रचना कशी आहे त्याचा विस्तार, या विभागाचा इतिहास इत्यादी गोष्टी जाणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर या प्रदेशांमध्ये असणारे जिल्हे, असणारी महत्त्वाची पर्यटन स्थळे, यांची देखील माहिती बघितलेली आहे.
FAQ
मराठवाडा या प्रदेशावर कोणत्या कालखंडामध्ये कोणाचे राज्य होते?
मराठवाडा या प्रदेशावर इसवी १००० ते ११०० दरम्यान प्रसेनचित महाराजांचे राज्य होते.
मराठवाडा हा विभाग महाराष्ट्रातील कोणत्या नदी खोऱ्यामध्ये वसलेला आहे?
मराठवाडा या महाराष्ट्रातील विभागाला गोदावरी नदीच्या सानिध्यात वसलेला विभाग म्हणून ओळखले जाते.
भारताच्या दृष्टीने मराठवाडा या विभागाचे काही वैशिष्ट्य आहे?
संपूर्ण भारतामध्ये भगवान शिव अर्थात महादेव यांचे सुमारे बारा ज्योतिर्लिंग असून, त्यातील सुमारे तीन ज्योतिर्लिंग एकट्या मराठवाडा विभागामध्ये वसलेले आहेत.
मराठवाडा हा विभाग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध झाला होता?
मराठवाडा हा विभाग स्वातंत्र्य काळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम या गोष्टीसाठी प्रसिद्ध झाला होता.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कोणत्या दिवसाला संबोधले जाते?
१७ सप्टेंबर या दिवसाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या नावाने ओळखले जाते.