मसाला भेंडी रेसिपी मराठी Masala Bhindi Recipe in Marathi मसाला भेंडी असो किंवा साधी भेंडी असो बरेच लोकांची फेवरेट डिश आहे. भेंडी ही एक फळभाजी आहे ती भारतात सहज उपलब्ध होते. ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत भेंडी उपलब्ध असते. बरेच लोकांच्या घरात भेंडीची भाजी बनवली जाते व खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट जरी दिसायला असली तरी ती एक चविष्ट व पौष्टिक असते.
तर आज आपण अशाच मसाला भेंडी रेसिपी विषयी माहिती जाणून घेऊया.
मसाला भेंडी रेसिपी मराठी Masala Bhindi Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
भेंडीची भाजी विविध पद्धतीने तयार केली जाते. त्यामध्ये भेंडी फ्राय, पंजाबी मसाला भेंडी, ग्रेव्ही भेंडी अशा विविध पद्धतीने भेंडी केली जाते. भेंडीची रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला अत्यंत कमी वेळ लागतो. त्यामुळे बऱ्याच वेळा गडबडीची कामे असताना आपण भेंडीची भाजी आणि पोळी करत असतो. तसेच कोळी भेंडी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते तसेच भेंडीतील दाण्यांची उसळ सुद्धा केली जाते. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही. परंतु आपण जर एकदा मसाला भेंडी रेसिपी तयार करून बघितली तर ती सर्वांनाच आवडेल व भेंडीची भाजी खाण्याची आवड तुमची दुप्पट होईल. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तीकरता बनणार आहे?
आपण ज्या व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
भेंडी रेसिपी च्या पूर्वतयारी करता आपल्याला 7 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
भेंडी रेसिपी झटपटीत तयार होते त्यामुळे आपल्याला कुकिंग करण्याकरता 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
मसाला भेंडी रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला टोटल टाईम 22 मिनिटे लागतो.
मसाला भेंडीसाठी लागणारी सामग्री :
1) एक पाव भेंडी चिरलेली
2) एक टोमॅटो बारीक चिरलेला
3) एक कांदा बारीक चिरलेला
4) तेल
5) चवीनुसार मीठ
6) एक चमचा आलं लसूण पेस्ट
7) अर्धा चमचा हळद
8) अर्धा चमचा जिरेपूड
9) लाल तिखट पाव चमचा
10) धने पावडर अर्धा चमचा
11) आमचूर पावडर पाव चमचा
12) चाट मसाला पाव चमचा
13) गरम मसाला पाव चमचा
14) कसुरी मेथी अर्धा चमचा
पाककृती :
- मसाला भेंडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक आकडांमध्ये तेल घालून सर्व भेंडी हलकी अशी तळून घ्यायचे आहे.
- नंतर हे सर्व भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्या व उरलेल्या तेलामध्ये जिरे, कांदा, आल लसूण पेस्ट घालून चांगली परतून घ्या.
- कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाका व एक मिनिटं पुन्हा परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये हळद, धने पूड, तिखट, जिरेपूड टाकून दोन मिनिटं आणखीन शिजवून द्या.
- नंतर त्यामध्ये गरम मसाला चाट मसाला आमचूर पावडर कसुरी मेथी आणि मीठ टाकून छान शिजवून घ्या.
- मसाला छान परतून झाला की, त्यामध्ये भेंडी टाकून दहा मिनिटे पुन्हा परतून घ्या.
- आता गॅस बंद करा व त्यावर कोथिंबीर घालून पोळी पराठ्यासोबत सर्व्ह करा. तुम्ही ही रेसिपी भाताबरोबरही खाऊ शकता.
पोषक घटक :
भेंडीची भाजी खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये बरेच घटक असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. भेंडीच्या भाजीमध्ये असणारे घटक पुढीलप्रमाणे. भेंडीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, इत्यादी अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आपल्या जेवणामध्ये भेंडीचा उपयोग आपण करायला पाहिजे.
फायदे :
भेंडीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत धुंदी केल्यामुळे कॅन्सर होत नाही तसेच हृदयाला देखील भेंडी स्वस्थ ठेवतात. मधुमेह होण्याची शक्यता नसते.
भेंडी खाल्ल्यामुळे पोटभक्ती बद्धकोष्ठ पोट दुखणे आणि याचे सारख्या समस्या देखील होत नाही तसेच हाडे मजबूत होतात.
भेंडी खाल्ल्यामुळे आपल्या वजन देखील नियंत्रणात राहते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते. गर्भवती महिलां करिता भेंडी एक पौष्टिक आहार आहे.
तोटे :
भेंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या त्वचेवर जखमा होऊ शकतात किंवा व्यक्तीला पोटाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
भेंडीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त घट्ट होऊ शकते. याशिवाय एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन देखील असू शकतो.
तर मित्रांनो, मसाला भेंडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा. मसाला भेंडी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा