मसाला दुध मराठी Masala Dudh Recipe In Marathi मसाला दूध हा पदार्थ दूध, काजू आणि इतर साहित्य पासून बनवला जातो, हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. मसाला दूध सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आहेत, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. भारतात विविध ठिकाणी मसाला दूध हे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जाते. मसाला दूध लोकप्रिय आणि प्रसिद्ध पदार्थ आहे, आपण खूप कमी वेळात मसाला दूध घरीच बनवू शकतो.
आपण हॉटेल किंवा बेकरी बरती पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार मसाला दूध मिळते. काही लोकांना मसाला दूध खूप आवडते, पण त्याचा परिसरात चवदार मसाला दूध मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने मसाला दूध कसे बनवतात यांची रेसिपी. आता आपण मसाला दूध रेसिपी पाहणार आहोत.
मसाला दुध मराठी Masala Dudh Recipe In Marathi
मसाला दूधाचे प्रकार :
मसाला दूध हे एक स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे, जो विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. यामध्ये मसाला दूध, गोड दूध, खीर खूर्मा, बासुंदी, दूध खीर, मलाई हे सर्व प्रकार एकदम चवदार आणि गोड आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मसाला दूध रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
मसाला दुधाच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
मसाला दूध बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर मसाला दूध बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मसाला दूध कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
मसाला दूध तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 25 मिनिट वेळ लागतो.
मसाला दुधासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) अर्धा लिटर दूध.
2) 200 ग्रॅम साखर.
3) 1 चिमूट केसर.
4) 10 ते 12 बदाम.
5) 10 ते 12 काजू.
6) अर्धा चमच वेलची पावडर.
7) 1 चिमूट जायफळ.
8) थोडा पिस्ता.
पाककृती :
- सर्वात प्रथम बदाम, काजू, पिस्ताचे बारीक तुकडे करून घ्या, आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
- नंतर गॅसवरती एक खोल तळाचे भांडे ठेवा, त्यामध्ये दूध टाकून गरम करा.
- नंतर काजू, बदाम पिस्ता मिक्सर मधून बारीक करून घ्या, बारीक झाला की.
- यामध्ये थोडी वेलची पावडर आणि एक चिमूट जायफळ टाका, आणि पुन्हा एकदा चांगले फिरवून घ्या,
- दुध गरम झाले की, यामध्ये आवडीनुसार साखर टाका, आणि एक चिमूट केसर टाकून चांगले मिक्स करा.
- नंतर यामध्ये आपण बारीक केलेले काजू, बदाम पिस्ताचे मिश्रण टाका, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- तुम्ही यामध्ये थोडी हळद सुध्दा टाकू शकता, जर आवडत असेल तर, नाहीत तसे पण मसाला दूध छान होते.
- नंतर 1 मिनिट दुधाला चांगली उकडी येऊ द्या, नंतर गॅस बंद करून दूध खाली काढून घ्या.
- आता आपले स्वादिष्ट आणि चवदार मसाला दूध पिण्यासाठी तयार आहे. आपण एका छोट्या ग्लासमध्ये मसाला दूध घेऊन पिण्याचा आनंद घेऊ शकतो.
- शेपू भाजी रेसिपी मराठीत
मसाला दूधमध्ये असणारे घटक :
मसाला दूध हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे कॅल्शियम, प्रोटीन, चरबी, फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन, शुगर, प्रथिने, कर्बोदके, अँटी ऑक्सिडट्स, मॅग्निशियॅम हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
मसाला दूध हा एक पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये असणारे घटक, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
यामुळे आपले शरीर निरोगी राहते, आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
यामध्ये असणारे फॅट, चरबी, शुगर हे घटक आपल्या शरीराची वाढ करतात.
यामध्ये असणारा अँटी ऑक्सिडट्स घटक आपल्याला कॅन्सर आणि इतर आजार होऊ देत नाही.
तोटे :
मसाला दूध आपण जास्त प्रमाणात सेवन केल तर, आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.
हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
म्हणून मसाला दूध आपण योग्य प्रमाणात सेवन केल पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला मसाला दूध रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.