मसाला खाखरा मराठी Masala Khakhra Recipe in Marathi तुम्हालाही जर सकाळच्या नाश्त्यामध्ये काही वेगळे किंवा गुजराती डिश तयार करायचे असेल तर आम्ही खास तुमच्याकरता घेऊन आलो आहोत मसाला खाखरा रेसिपी. हे खाण्यासाठी कुरकुरीत तसेच टेस्टी लागते घरातील लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. मसाला खाकरा खूप टेस्टी व पौष्टिक आहे. तसेच ही रेसिपी बनवण्यासाठी देखील खूप सोपी व कमी वेळामध्ये बनते. ही रेसिपी एक गुजराती डिश असून ती महाराष्ट्रातही फेमस आहे. तर तुम्हीही रेसिपी नक्की घरी बनवून बघा. तर जाणून घेऊया खाखरा या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
मसाला खाखरा मराठी Masala Khakhra Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
खाकरा ही एक पारंपारिक गुजराती लोकप्रिय रेसिपी आहे. जी गुजरात मध्ये खूपच प्रसिद्ध आहे. आता केवळ गुजरात मध्ये नाही तर संपूर्ण भारतातही खाखरा प्रसिद्ध होत आहे आज काल बऱ्याच स्टॉलवर आपल्याला खाकरा पापड विकण्यासाठी आलेले दिसतात. विविध पद्धती आहे तसेच खाकरा पापड मध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतात. जसे की जिरे खाखरा, मेथी बाजरी पुदिना, लसूण पाणीपुरी वडापाव पावभाजी आणि पिझ्झा इथे देखील वर वापरून खाखरा तयार केला जाऊ शकतो. तसेच मुंगडी हा गोड खाखरा आहे. तर आज आपण येथे मसाला खाकरा रेसिपी विषयी माहिती पाहणार आहोत तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.
किती व्यक्तींकरिता ही रेसिपी बनणार आहे?
ही रेसिपी तीन व्यक्तींकरिता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
खाकरा ह्या रेसिपीच्या पूर्वतयारी करताना आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
खाकरा ही रेसिपी कुकिंग करण्याकरिता 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
साखरा रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
मसाला खाखरा बनवण्यासाठी लागणारी सामग्री :
1) एक वाटी गव्हाचे पीठ
2) अर्धा चमचा ओवा
3) अर्धा चमचा लाल तिखट
4) पाव चमचा हळदी पावडर
5) अर्धा चमचा कस्तुरी मेथी
6) दोन चमचे तेल
7) चवीनुसार मीठ
मसाला खाखरा बनवण्याची पाककृती :
- सर्वप्रथम मसाला खाकरा बनवण्यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर पिठात ओवा, लाल तिखट, हळद आणि कसुरी मेथी घालून सर्व चांगले मिक्स करून घ्यावे.
- नंतर या मिश्रणामध्ये तेलाचे मोहन करून घ्या. नंतर थोडे थोडे पाणी घालून छान पीठ मळून घ्या.
- नंतर पीठ मळून घेतल्यानंतर दहा मिनिटे बाजूला ठेवा. काही वेळानंतर पीठ परत एकदा मळून घ्या. यानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
- आता गॅसवर एक पॅन ठेवा व तो गरम झाल्यानंतर आस कमी करून घ्या. पिठाचा एक गोळा घेऊन पातळ असा पराठ्यासारखा लाटून घ्या.
- आता हा खाकरा आपल्याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचा आहे. खाकरा शिकत असताना त्यावर तेल किंवा तूप अजून पलटून लावून छान परतून घ्या.
- खाकरा छान परतून झाला की, ताटामध्ये काढून घ्या एका मागून एक सर्वच खाकरे अशाच प्रकारे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
- अशाप्रकारे घागरा रेसिपी तयार आहे. आता तुम्ही खाखरा चहा सोबत नाश्ता म्हणून खाऊ शकता. किंवा दुपारच्या जेवणामध्ये देखील पाहू शकता.
पोषक घटक :
खाखरा पापड यामध्ये विविध पौष्टिक घटक असतात, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये प्रोटीन, लोह, थायामिन, नियासिन, विटामिन बी 6 आणि कॅल्शियम त्या व्यतिरिक्त मॅगनीज, सेलेनियम, फॉस्फरस, तांबे आणि फोलेटसह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असतो.
फायदे :
मसाला खाकरा खाल्ल्यामुळे आपले शरीराला प्रोटीन मिळते. त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते व शरीर प्रकृती चांगली राहते.
आपल्याला ऑफिसला जायचं असेल तर मसाला खाखरा खाल्ल्यामुळे आपले मूळ फ्रेश होते व दिवसभर उत्साही वाटते.
मसाला खाखरा खाल्ल्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आणि पोट भरलेले राहते तसेच त्यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरस हे आपल्या हाडांच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
तोटे :
मसाला खाखऱ्याचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे सेवनामुळे ऍसिडिटी, जळजळ होणे तसेच रक्तात शुगरचं प्रमाण वेगाने वाढू लागत. ज्यामुळे शरीरावर नुकसानदायक प्रभाव बघायला मिळतात. खासकरून ज्यांना डायबिटीस आहे, त्यांनी प्रमाणातच मसाला खाकरा खायला पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.