मासवडी रेसिपी मराठी Maswadi Recipe in Marathi महाराष्ट्र त्याच्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखला जातो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात. खास करून ही रेसिपी मराठवाडा आणि पुणे या भागात बनवली जाते. या रेसिपीचे नाव ऐकताच असे वाटते की, ही रेसिपी नॉनव्हेजचा प्रकार असेल परंतु तसे नाही. ती एक शाकाहारी रेसिपी आहे. तर अशाच आपण एका रेसिपी विषयी बोलणार आहोत. बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहित सुद्धा नाही. तर चला मग आज मासवडी या रेसिपी विषयी माहिती जाणून घेऊया.
मासवडी रेसिपी मराठी Maswadi Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
मासवडी ही रेसिपी शेंगदाण्याची कूट तीळ खोबरे, बेसन व इतर पदार्थ मिळून तयार केले जाते ही रेसिपी महाराष्ट्रातील बऱ्याच भागात केली जाते. मुख्यतः मराठवाडा व पुणे भागात ही रेसिपी पाहायला मिळते तसेच भारतातील ज्या भागात महाराष्ट्रातील लोक राहतात, त्या भागात देखील आपल्याला मासवडी ही रेसिपी प्रकार पाहायला मिळते. मासवडी ही रेसिपी खायला अप्रतिम तसेच चविष्ट लागते. आपण जर ही रेसिपी बनवली तर लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडेल. आपण वडीचे अनेक प्रकार पाहिले आहेत बेसन वडी, कोथिंबीर वडी, अळूवडी परंतु त्यापेक्षा थोड्या भिन्न प्रकारांमध्ये मासवडी रेसिपी बनवली जाते तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्ती करता बनवणार आहे ?
ही रेसिपी आपण पाच व्यक्तींकरिता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
मासवडी ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
मासवडी तयार करण्याकरता आपल्याला एकूण 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
मासवडी तयार करण्याकरता लागणारे साहित्य :
प्रथम आवरणाकरता लागणारे साहित्य बघूया :
1) एक वाटी बेसन
2) दीड वाटी पाणी
3) एक चमचा तेल
4) एक चमचा जिरे
5) एक चमचा आले लसूण पेस्ट
6) पाव चमचा हळद
7) चिमूटभर हिंग
8) मीठ चवीनुसार
सारणासाठी लागणारे साहित्य :
1) अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे
2) तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट
3) दोन चमचे तीळ
4) एक चमचा लसूण पेस्ट
5) एक चमचा मिरची पावडर
6) अर्धा चमचा गोडा मसाला
7) चवीनुसार मीठ
8) पाव चमचा हळद
9) बारीक चिरलेली कोथिंबीर
10) एक चमचा साखर
मासवडी बनवण्याची पाककृती :
- सर्वप्रथम आपल्याला सारण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी सुके खोबरे व तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, नंतर ते मिक्सरमध्ये बारीक कूट करून घ्यायची आहे.
- नंतर हे कूट एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये शेंगदाणे कूट, लाल तिखट, लसूण पेस्ट, हळद, मीठ, गोडा मसाला व साखर घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे नंतर हे सारण बाजूला ठेवून द्या
- आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये थोडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले की, त्यामध्ये तीळ व जिरे घाला, जिरे छान तडतडले की, त्यामध्ये लसूण पेस्ट घाला.
- लसूण पेस्ट करपू देऊ नका. लसूण पेस्ट झाली की, त्यामध्ये हळद, हिंग घाला. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ व पाणी घालून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
- या मिश्रणाला छान उकळी आली की, यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला बेसन घालायचे आहे व त्या बेसनाचा घट्ट गोळा झाला की, त्यावर पाच मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे. या मिश्रणामध्ये बेसन घालत असताना गुठळ्या होऊ देऊ नका.
- पीठ छान शिजले की गॅस बंद करा व पीठ थोडे थंड होऊ द्या.
- आता हे पीठ थंड झाले की, त्याची प्लास्टिकच्या कागदावर थापून त्यावर तयार केलेले सारण घाला. अशाप्रकारे सर्वच वड्या कापून तयार करा.
पोषक घटक :
मासवडी ही एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. त्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, फायबर, चरबी, प्रोटीन इ. महत्त्वपूर्ण घटक असतात.
फायदे :
मासवडी ही बेसनापासून तयार केली जाते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते.
बेसनामध्ये फायबर हा घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोलेस्ट्रॉल व पोटाची समस्या दूर होते.
मासवडी खाल्ल्यामुळे शरीर निरोगी राहते व कोलेस्ट्रॉलची पातळी घटते. रोगप्रतिकार शक्ती वाढते.
मासवडीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अनिमिया आपल्याला होऊ शकत नाही. थकवा अशक्तपणा, स्वास लागणे व हृदयाची स्थिती देखील सुधारते.
तोटे :
मासवडी ही बेसना पासून तयार केली जाते, बेसनामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जर आपण जास्त प्रमाणात मासवडी खाल्ली तर आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
तर मित्रांनो, तुम्हाला मासवडी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.