मटकी उसळ मराठी Matki Usal Recipe In Marathi

मटकी उसळ मराठी Matki Usal Recipe In Marathi  मटकी उसळ ही भिजलेल्या मटकी पासून तयार केलेला एक पौष्टिक आणि स्वादिष्ट आहार आहे. मटकी उसळ हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, जो खायाला मसालेदार आणि लोकप्रिय पदार्थ आहे. मटकी उसळचा उपयोग नाश्ता म्हणून केला जातो. यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

आपण हॉटेलमध्ये पाहिले असेल किती चवदार आणि मसालेदार मटकी उसळ खायाला मिळते. काही लोकांना मटकी उसळ खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट मटकी उसळ मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि मसालेदार मटकी उसळ कशी बनवतात याची रेसिपी. आता आपण मटकी उसळ रेसिपी पाहणार आहेस.

 Matki Usal

मटकी उसळ मराठी Matki Usal Recipe In Marathi

मटकी उसळचे प्रकार :

मटकी उसळ स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. मटकी उसळ अनेक प्रकारे बनवली जाते, यामध्ये मटकी उसळ, मटकी करी, मटकी भेळ, मसाला मटकी, गोड मटकी हे सर्व प्रकार खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मटकी उसळ ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

मटकी उसळच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

मटकी उसळ तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. सर्व साहित्य एकत्र केले की, लवकर मटकी उसळ तयार होते, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मटकी उसळ कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

मटकी उसळ तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला एकूण वेळ 35 मिनिटे लागतो.

मटकी उसळसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 4 वाट्या मटकी.
2) 2 चमचे लसण अद्रक पेस्ट.
3) 2 चमचे मिरची पावडर.
4) 1 चमच धानिया पावडर.
5) 1 चमच हळद.
6) तेल.
7) कोथींबीर.
8) 2 मध्यम कांदे.
9) 2 टोमॅटो.
10) 1 चमच गरम मसाला.
11) चवीनुसार मीठ.
12) कढीपत्ता.
13) 2 ते 3 हिरवी मिरची.
14) अर्धा चमच जिरे.

पाककृती :

  • मटकी उसळ बनवण्या अगोदरच्या दिवशी मटकी भिजू घाला, नंतर मटकी चांगली भिजली की एका कोरड्या कपड्यात 9 ते 10 तास गुंडाळून ठेवा.
  • नंतर मटकीला कोंब येतील यामुळे मटकी उसळ पौष्टिक आहार बनते, नंतर मटकी स्वच्छ धुऊन घ्या.
  • नंतर कोथिंबीर, मिरची, कांदा, आणि टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा.
  • नंतर एक खोल तळाचा पॅन घ्या, गॅस चालू करून गॅस वरती ठेवा. त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
  • तेल गरम झाले की, त्यामध्ये थोडे जिरे टाका, जिरे थोडे फुटले की, त्यामध्ये कढीपत्ता व बारीक मिरची घालून परतवत रहा.
  • कढीपत्ता आणि मिरची झाली की, यामध्ये लसण अद्रक पेस्ट घालून कच्च्या लसणाचा वास निघेपर्यत शिजवा.
  • पेस्ट थोडा लालसर होणार, नंतर यामध्ये बारीक कांदा आणि टोमॅटो टाका, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कांदा थोडा लालसर आणि टोमॅटो थोडे मऊ होये पर्यत ढवळत रहा. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून, 1 मिनिट झाकण ठेवा.
  • नंतर यामध्ये हळद, मिरची पावडर, धानिया पावडर आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर मटकी मसालाच्या बाजूने तेल सुटेल आणि मसाल्याचा सुगंध येणार, तेव्हा आपला मसाला झाला समजावे.
  • नंतर यामध्ये 2 ते 3 कप पाणी टाकून चांगले मिक्स करा, आणि 5 मिनिट शिजू द्या.
  • नंतर मसाल्याला उकळी आली की, यामध्ये अंकुर आलेली मटकी टाका, आणि मध्यम आसेवर 10 ते 15 मिनिट शिजवू द्या.
  • मटकी शिजली की नाही तपासून घ्या, नाहीतर आणखी थोडा वेळ गॅस वरती होऊ द्या.
  • नंतर यामध्ये बारीक कोथिंबीर, आणि लिंबाचा रस टाका, आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • आता आपली स्वादिष्ट आणि मसालेदार मटकी उसळ खाण्यासाठी तयार आहे. एका प्लेटमध्ये घेऊन मटकी उसळ खाण्याचा आपण आनंद घेऊ शकतो.

मटकी उसळमध्ये असणारे घटक :

मटकी उसळ ही मटकी पासून बनवली जाते. हा एक पौष्टिक आहार आहे, यामध्ये विविध घटक असतात. जसे कॅल्शियम, प्रथिने, कर्बोदके, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, प्रोटीन मॅग्निशियॅम, लोह, चरबी हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

मटकी उसळ हा पौष्टिक आहार आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, प्रोटीन यासारखे घटक आहेत, यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन आणि चरबी आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती व चरबी वाढवतात.

यातील सर्वच घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

मटकी उसळ आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत. हे घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून मटकी उसळ आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला मटकी उसळ रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment