मठ्ठा रेसिपी मराठी Mattha Recipe in Marathi

मठ्ठा रेसिपी मराठी Mattha Recipe in Marathi  मठ्ठा हे पेय सर्वांनाच आवडते, मग एखाद्या जेवणासोबत असो किंवा पिण्यासाठी असो.  मठ्ठा उन्हाळ्याच्या दिवसात खूपच आरोग्यदायी मानला जातो.  त्याचे फायदे आपल्या शरीराला होतात.   उन्हाळ्यात आपल्याला उन्हाचा जेवढा त्रास होतो, तेवढा ताप मठ्ठा पिल्याने थोडाफार कमी होतो.  मठ्याचा उपयोग आपण आहारातही करू शकतो.  मठ्ठा पिल्याने आरोग्याच्या तक्रारी होत नाहीत.  रोगप्रतिकारक शक्ती व अन्नपचन शक्ती वाढते.  तर आज आपण जाणून घेऊया मठ्ठा कसा तयार करतात.

Mattha Recipe

मठ्ठा रेसिपी मराठी Mattha Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

मठ्ठा ही रेसिपी महाराष्ट्रातील मुख्य रेसिपी आहे महाराष्ट्र मध्ये मठ्ठा बनवण्याच्या विविध पद्धती आपल्याला दिसतील त्यामध्ये टाकण्यात येणारे घटक देखील भिन्न असून त्याची चव देखील भिन्न आपल्याला जाणवते.  मठ्ठा ही रेसिपी ज्याप्रमाणे आपण शरबत, उसाचा रस किंवा फळांचा ज्यूस, ताक पितो त्याचप्रमाणे ही रेसिपी आहे.  ज्याप्रमाणे घरच्या जेवणात आपण फोडणीचे ताक करतो.  त्यामुळे पित्तशमन होते, व अपचनाच्या तक्रारी दूर होतात.  जर एवढा फायदा आपल्याला होत असेल तर आपण नक्कीच मठ्ठा प्यायला हवा.  तर चला मग जाणून घेऊया त्याविषयी लागणारी सामग्री.

ही रेसिपी किती जणांन करता बनणार आहे?

ही रेसिपी आपण 5 जणांकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

मठ्ठा रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ 5 मिनिटे एवढा लागतो.

मठ्ठा बनवण्याकरता लागणारा वेळ  :

मठ्ठा बनवण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

ऐकून वेळ   :

मठ्ठा बनविण्याकरता आपल्याला एकूण 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

ताक मठ्ठा रेसिपी पद्धत 1 :

मठ्ठा बनवण्यासाठी लागणारी सामग्री  :

1)  एक लिटर ताक

2)  1 वाटी साखर

3)  दोन हिरव्या मिरच्या

4) एक इंच आल्याचा तुकडा

5) लसणाच्या तीन ते चार पाकळ्या

6) काळ मीठ अर्धा चमचा

7) एक चमचा जिरे

8) अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

मठ्ठा बनवण्याची पाककृती  :

  • सर्वप्रथम आपल्याला मिरची, लसूण, आलं, जिरे यांची एकत्रित मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे.
  • एका मोठ्या भांड्यामध्ये ताक घेऊन त्यामध्ये ही पेस्ट घालावी लागणार आहे.
  • नंतर त्यामध्ये मीठ व साखर तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर हे मिश्रण घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  • नंतर मठ्ठा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता.
  • फ्रिज मधून काढून थंड झालेला मठ्ठा भर उन्हाळ्यात तुम्हाला प्यायला अतिशय आरामदायक वाटतो.
  • जर तुम्हाला मठ्ठ्यामध्ये आवडत असेल खारी बुंदी देखील घालू शकता.
  • अशाप्रकारे स्वादिष्ट व आरोग्यदायी थंड मठ्ठा तयार आहे.  आता तुम्ही हा मठ्ठा ग्लास मध्ये भरून सर्व्ह करू शकता.

दह्यापासून मठ्ठा रेसिपी पद्धत 2  :

सामग्री  :

1) दोन वाटी ताजे दही

2) अर्धा लिटर पाणी

3)  आल्याचा तुकडा

4) 1 हिरवी मिरची

5) एक चमचा साखर

6) हिरवा धनिया

7) पुदिन्याची पाने

8) भाजलेले जिरे

9) बर्फाचे तुकडे

पाककृती  :

  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दही टाकून ते रवीच्या सहाय्याने किंवा मिक्सरमध्ये घुसळून घ्या.
  • नंतर त्यामध्ये भाजलेले जिरे पूड, किसलेले आले, मिरची व मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
  • तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना कूच करून टाका.  म्हणजे ते मठ्ठा पिताना तोंडात येणार नाहीत.
  • सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे व नंतर सर्व्ह करावे.
  • पोषक घटक  :

ताकामध्ये विटामिन बी 12, कॅल्शियम, पोटॅशियम फॉस्फरस असतात.  तर दह्यापासून बनवलेले लस्सी मध्ये प्रथिने, कॅल्शियम, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके,  जीवनसत्वे, पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो.

फायदे  :

मठ्ठा पिल्याने आपल्याला अनेक फायदे होतात.

मठ्ठा पिल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  तसेच आले-लसूणचा त्यामध्ये उपयोग केलेला असतो.  ते हृदयासाठी चांगले आहे.  मठ्ठा पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

त्यामध्ये घातलेली कोथिंबीर, कॅल्शियम युक्त असल्याने आहारात कोथिंबीरचा उपयोग जास्तीत जास्त करणे केव्हाही चांगलाच असते.

ताक पिल्यापेक्षा मठ्ठा करून पिले तर चवीला चांगले लागते व आरोग्यासाठी ही खूप फायदेमंद असते.

ताकामध्ये पुदिनाचा समावेश केल्यामुळे पोटाचे त्रास किंवा अपचनेच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

तोटे  :

मठ्ठा पिणे तसे आरोग्यासाठी  आवश्यकच आहे.  परंतु सर्दी, ताप व खोकला असेल तर मठ्ठा पिऊ नये त्याने आणखीन वाढण्याची शक्यता असते.

तर मित्रांनो, तुम्हाला मठ्ठा ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment