माझे पहिले भाषण मराठी निबंध | Maze Pahile Bhashan Essay In Marathi

Maze Pahile Bhashan Essay In Marathi माझ्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते . यामध्ये आम्ही सर्व दरवेळी वक्तृत्व स्पर्धा मध्ये भाग घेत असतो. आम्ही मुले-मुली यामध्ये खूप सारे बक्षिसे मिळवत असतो. आमच्या शाळेतील बक्षीस समारंभ पाहिला की मलाही भाग घेवेसे वाटत असते. आणि स्पर्धेत बक्षीस मिळून आणावेसे वाटते. त्यामुळे मी ह्या वर्षी स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले आहे. असा मी चांगला निश्चय केलेला होता.

Maze Pahile Bhashan Essay In Marathi

माझे पहिले भाषण मराठी निबंध | Maze Pahile Bhashan Essay In Marath

भाषण स्पर्धेला आम्हाला आधीच विषय देण्यात आले होते आणि जाहीर करण्यात आले होते. मला काहीच भाषण करता येत नाही कि लिहिता येत नव्हते. मग मी माझ्या ताईची मदत घेतली. बहिणीने “माझा आवडता नेता” या विषयावर छान भाषण लिहून दिले होते.

मला भाषण कसे करायचे तिने सांगितले होते. मग मी ते भाषण पाठ केले ताई माझा दररोज सराव घेत असे. मी प्रत्येकवेळी घरामध्ये स्वतःला आरशासमोर उभा राहून सराव करत होतो.

भाषण स्पर्धा शाळेमध्ये जशी लवकर येत होती तसा माझा सराव वाढवलेला होता. भाषणाची जोरदार तयारी सुरू केली होती. भाषणामध्ये कुठे आणि कसा आवाज वाढवायचा तर कुठे कमी करायचा याचा अंदाज बहिणीने दिला होता. तर कधी कवितेमधील ओळी आणि महान व्यक्तीची वाक्ये कशी वापरायची ते मी शिकून घेतले होते.

अखेर भाषण स्पर्धेचा तो दिवस उजाडला. सकाळपासूनच माझ्या मनात धाकधूक सुरू होती. भाषणाचा एकदा ताईने सराव घेतला. शाळेमध्ये आम्ही गेल्यावर दुपारी भाषणाची स्पर्धा होणार होती.सर्व मुले एका बैठकी सभागृहात बसलेले होते. सुरूवातीला काही कमी पट्टीचे औपचारिक भाषनांनं तर स्पर्धेला सुरुवात झाली होती.

एकेका स्पर्धकाचे नाव घेतले जात होते. तो स्पर्धक येऊन भाषण करत होता. माझे नाव केव्हाही ध्वनिक्षेपकावरून पुकारले जाणार होते. मनामध्ये भीती वाटत होती. मध्येच अंगावर काटा उभा राहत होता. आता मी स्पर्धेत भाग घेतल्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देणे भाग होते. माझ्या मनात माझंही भाषण कसे होईल याचाच मी विचार करत बसलो होतो..

इतक्यात अचानक माझे नाव जाहीर झाली. शाळेतील वातावरण बघून मी आतून खूप उदास झालो होतो मला भाषण करावेसे वाटत नव्हते. माझी जोरदार घाबरगुंडी उडाली होती. आमच्या शाळेत दरवर्षी प्रमाणे अनेक विषयांवर भाषणे तयार केली आणि घेतली जात होती. माझ्या शाळेमध्ये मी खूपवेळा भाषणे नंतर घाबरून दिली आहेत. तरी पण मला माझंही पहिले भाषण आठवत राहील.

माझे भाषण हे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त चे भाषण ठेवले होते. त्यावेळी मी शाळेत पाचवीत शिकत होतो. आमच्या मुख्याध्यापक सरांनी आमच्या सर्व वर्गामध्ये जास्तीत जास्त 4 विद्यार्थ्यांना भाषण द्यायला सांगितले होते. दुपारी शाळा असल्याने आम्ही सर्वजण वर्गात बसलो होतो तेवढ्यात वर्गशिक्षक वर्गावर आले होते त्यांना आम्ही विद्याथानी नमस्कार केले त्या नंतर सरानी भाषणाची सूचना देऊ लागले आणि सांगितले की मी ज्या विद्यार्थ्यांची नावे घेईल त्यांनी भाषण करायचे आहे.

शाळेमध्ये आम्हाला सरांनि खूप सूचना ऐकुन आम्ही विद्यार्थी बुचकळ्यात पडलो होतो. आम्ही एकमेकांमागे आपले तोंड लपवत होतो आणि सरांनी आमची नावे घेण्यास सुरुवात केली होती. पाचवीच्या वर्गापासून ते दहावीच्या वर्गापर्यंत भाषण देणाऱ्या 4 विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. या नावांमध्ये मी आणि माझ्या शेजारील 3 मुले हि होती.

आम्ही सर्व जण एकाच बेंच वर बसून अभ्यास कमी करायचो आणि गप्पा गोष्टी जास्त करत होतो आम्हाला चारही मुलांना अद्दल घडावी म्हणून सरांनी ही डोकं लढविले होते. सरांनी वर्गातील भाषणासाठी अजून भाग घेणाऱ्या विद्यार्थाना हि भाग घेऊ दिला होता.

त्या दिवशी मी घरी आलो. माझ्या बहिणीला सांगितले कि माझंही नाव भाषण करण्यासाठी घेतले आहे, सरांनी मलाही जबरदस्ती भाग घ्यायला सांगितले आहे तर मी आता काय करू ?” माझी बहीण हसली आणि ती हि माझ्हाबरोबर १० वी ला शिकत होती पण ती अभ्यासात खूप हुशार होती.

तिने मला सांगितले की, “भाषण देणे काही सोपी गोष्ट नाही मी तुला भाषण लिहून देते तेवढे तू लक्षात ठेऊन म्हण आणि जर काही आठवण राहिले नाही तर ते तुला वाचता येते मी तुला मदत करेन तू भाषणतं भाग घेऊ शकतो.” तिच्या शब्दांनी मला बरे वाटले.
यानंतर सर्व शाळेचा अभ्यास सोडून मी फक्त भाषण पाठ करू लागलो होतो.

नंतर भाषणाचा दिवस उगवला. एक एक जण भाषण देऊ लागले. आणि माझा हि नंबर हळू हळू जवळ येऊ लागला होता. माझे नाव पुकारण्यात आले. मी भीतीने थर थर करायला लागलो. सर्वजण उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होते. माझे पाय नकळत व्यासपीठाकडे सरकू लागले. आणि माझ्या हि समोर माईक आल्यावर मी पण उभा राहिले आणि बाकीचे शांत बसून वाट बघत होते.

खाली असलेले विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे बघून गर्दी पाहून माझंही पायांचा थर थर काही केल्या थांबत नव्हती. पोपटासारखे पाठ केलेले भाषण आठवत नव्हते. कुठून सुरू करावे काहीच कळत नव्हते. माझ्या हातात माईक धरलेले असून तसेच उजव्या हाताला शिक्षक आणि समोर असलेले विद्यार्थी बघून मला तोंडातून काही शब्द फुटत नव्हते. चारही बाजूंला असलेली शांतता बघून मी घाबरलो होतो. माझी हृदयाची जोरजोरात धडधड मला ऐकू येत होती.

नंतर मी वर पाहायला लागलोमी डोळे मिटून एका दमात श्वास घेऊन ठरवले की मला कोणाकडेही पाहायचे नाही आणि जसे जसे आठवेल तसे मी भाषण बोलून टाकले. इतक्यात विद्यार्थ्यांमधून काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आला. मी डोळे बंद करून एका घटकेत श्वास घेऊन म्हणायला सुरुवात केली होती की मला कोणाकडे बघायचे नव्हते आणि जसे आठवेल तसे मी भाषण बोलू लागलो होतो.

मला शिक्षिका मास्तर रागावतील म्हणून मी न थांबता जसे येईल तसे भाषणाला सुरुवात केली होती. मला पहिल्यादा खूप घाबरलो होतो पण नंतर मी परंतु जसेही भाषण सुरू केले तसे माझी मला असलेली भीती कमी बाटु लागली होती. कापणारे माझे पाय हळू हळू स्थिर झाले. हृदयाची धडधड कमी होऊ लागली. आवाज आधी पेक्षा स्पष्ट निघू लागला. आणि अशा प्रकारे मी माझे भाषण लवकर संपविले होते.

भाषण संपताच सर्वांनी टाळ्या वाजवून मला प्रोत्साहित केले. मला खूप आनंद वाटत होता. भाषण संपल्यावर माझ्या जागेवर येऊन मी बसलो. माझ्या मनामध्ये विचार करून करून मी विनाकारण भीती निर्माण झाली होती. या भाषणाने मला अधिक धैर्यवान बनवले.

यानंतर मी भाषणामध्ये नेतृत्वाचे गुण जोपासण्यासाठीच खूप प्रयत्न केले होते शाळेत होणाऱ्या दरवर्षीच्या भाषणमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी बहिणीच्या मदतीने भाग घेऊ लागलो होतो . माझे आणि कुटुंबाचे स्वप्न आहे की मी माझ्या आयुष्य एक प्रभावी नेतृत्व करून भाषणामधून सगळ्यांना प्रेरणा देऊ शकतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment