माझी महत्त्वाकांक्षा मराठी निबंध Mazi Mahatwakansksha Essay In Marathi

Mazi Mahatwakansksha Essay In Marathi भविष्यात कोण होणार हे प्रत्येकानं लहान असतानाच ठरवणे गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल करणे महत्वाचे आहे. भविष्याबाबत आताच विचार केला नाही तर तुमचे भविष्य अधिक चांगले होऊ शकणार नाही. भविष्यात मोठेपणी मी कोण होणार याचा विचार मी आत्ताच करून ठेवला आहे. हो खरच, मी मोठेपणी कोणत्या क्षेत्रामध्ये माझे करिअर करणार अथवा काम करणार हे मी निश्चित केले आहे.

Mazi Mahatwakansksha Essay In Marathi

माझी महत्त्वाकांक्षा मराठी निबंध Mazi Mahatwakansksha Essay In Marathi

प्रत्येक व्यक्तीची काही तरी महत्त्वाकांक्षा असते. त्याशिवाय जीवन नीरस, निरर्थक होते. आकांक्षा व्यक्तीला एक ध्येय देते. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरवते.

मार्गात येणाऱ्या अडचणींचा सामना कोणत्या साधनाने कसा करावयाचा ती साधने प्राप्त कशी करावयाची ते ठरवते. उद्दिष्ट निश्चित झाल्यावर ते प्राप्त करणे त्यासाठी आवश्यक गोष्टी जमा करणे सोपे होते. उद्देश नसेल तर काहीच शक्य नाही. उद्दिष्टाशिवाय प्रवास कसा? म्हणून जीवनात महत्त्वाकांक्षा असणे अत्यंत आवश्यक आहे.

यशाची ही एक आवश्यक किल्ली आहे. सर्व थोर आणि यशस्वी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांच्या महत्त्वाकांक्षांनी त्यांना थोर करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. महत्त्वाकांक्षा ही यशाची आणि महानतेची पहिली पायरी आहे.

मनुष्य स्वभावत: महत्त्वाकांक्षी असतो. माणसाचा हाच गुण त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करून उच्च स्थानी नेतो. मनुष्य स्वप्ने पाहतो आणि ती जीवनात साकार करतो. आपली प्रगती, समृद्धी आणि सांस्कृतिक विकासाचा हाच मूलमंत्र आहे. महत्त्वाकांक्षा नसेल तर जीवन नीरस, भकास आणि उपेक्षणीय होईल.

आकांक्षा आणि अभिलाषाच जीवनात नवे रंग भरून त्याला प्रेरणादायक आणि महत्त्वपूर्ण बनविते, जीवनात ऊर्जा, स्फूर्ती, कल्पना, सार्थकता, सहकार्य, स्वावलंबन इत्यादी गुणांचा आधार हीच महत्त्वाकांक्षा आहे. निरनिराळ्या लोकांच्या निरनिराळ्या आवडी, इच्छा, आकांक्षा आणि ध्येये असतात.

कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, तर कुणाला संगणकतज्ज्ञ व्हावेसे वाटते. कुणाला सैन्यात नाव मिळवायचे असते. कुणाला लेखनात प्रसिद्ध व्हावयाचे असते. जीवन जितके विशाल, विविध आहे तितक्याच महत्त्वाकांक्षा विशाल, विविध आहेत. परंतु कोणतीही महत्त्वाकांक्षा व्यवहार्य असली पाहिजे. हवेत मनोरे बांधण्यात काही अर्थ नाही.

चंद्रावर घर बांधण्याची महत्त्वाकांक्षा व्यवहार्य असू शकत नाही. कारण ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही. जीवनात काहीही अशक्य नाही पण ध्येयसिद्धीस आवश्यक साधने मिळाली तरच. त्याअभावी निराशा आणि अपयश पदरी येते. कल्पना करीत राहणे आणि स्वप्ने पाहणे ठीक आहे.

पण त्याबरोबरच व्यावहारिक असणे जरुर आहे.  संतुलित जीवनाचा हा सुवर्ण सिद्धांत होय. माझी महत्त्वाकांक्षा माझा स्वभाव, माझ्याकडे उपलब्ध असणारी साधने आर्थिक स्थिती, योग्यता याला अनुरूपच आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असून मला माझ्या मर्यादांचे, शक्तीचे ज्ञान आहे. माझी महत्त्वाकांक्षा असाधारण नाही.

मला डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील बनायचे नाही. मी एक प्रामाणिक यशस्वी व योग्य शिक्षक बनू इच्छितो जो खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता असतो. अध्यापन माझ्या स्वभावातच नव्हे तर रक्तातही आहे. माझे स्वर्गवासी वडील एक खूप चांगली व्यक्ती आणि यशस्वी शिक्षक होते.

त्यांचे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रतिष्ठित आणि चांगल्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. ते सर्व जण मोठ्या श्रद्धेने व आदराने त्यांची आठवण काढतात. लेखन-वाचनाची मला खूप आवड आहे. वाचनाचा मला छंद आहे. पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त मला इतर विषयांचेही चांगले ज्ञान आहे.

माझे व्यक्तिगत छोटे ग्रंथ संग्रहालय आहे. त्यात थोर नेत्यांची चरित्रे, जीवन वृत्तांत, प्रवास वर्णने, आठवणी, सामान्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांवरील पुस्तके आहेत. मी माझ्या शाळेच्या मासिकाचाही बरीच वर्षे संपादक होतो. दरवर्षी माझा एखादा लेख एखादी कविता-कथा त्यात प्रकाशित होत असते.

मोठेपणी डॉक्टरकीचे शिक्षण प्राप्त करून एक कुशल डॉक्टर बनण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. डॉक्टर हा समाजाचा सर्वात मोठा सेवक असतो. एक डॉक्टर आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांना बरे करून एक नवीन जीवन देतो.

माझी पण माझी महत्त्वाकांक्षा आहे, की मी डॉक्टर बनून माझ्या समाजाची आणि देशाची सेवा करावी. म्हणून मी डॉक्टर होण्याची महत्वकांक्षा उराशी बाळगली आहे.

आज आपल्या देशामध्ये मलेरिया, पोलिओ यांसारख्या रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु दुसरे अनेक रोग उत्पन्न झाले आहेत. खोकला, ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या रोगांमुळे अनेक लोक अस्वस्थ आहेत. टायफॉईड, डायबेटीस आणि ब्लडप्रेशर यांसारख्या माणसाचे जीवन संपवून टाकणाऱ्या रोगांचा प्रसार वाढत चालला आहे.

माझी इच्छा आहे की या रोगांमध्ये सापडलेल्या रोग्यांचा योग्य तो इलाज करून त्यांना बरे करून त्यांना रोगमुक्त करावे. असे करून मी डॉक्टर बनून जनसेवा करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त करेन.

आज आमच्या गावामध्ये डॉक्टरांची खूप आवश्यकता आहे. आजचे नवीन डॉक्टर शक्यतो शहरामध्ये राहणे पसंत करतात, परंतु मला गावात राहून गरीब लोकांची सेवा करायची आहे. गावातला डॉक्टर बनण्यासाठी मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही.

मी माझ्या उपचारांनी गावातल्या लोकांचे दुखः दूर करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या हॉस्पिटल मध्ये रडत, विव्हळत येणारे लोक हॉस्पिटल मधून परत घरी जात असताना हसत,खिदळत जातील. त्यांच्या त्या आनंदातच मला माझा आनंद सापडेल. दुसऱ्यांच्या आनंदातच आपला आनंद दडलेला असतो.

आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर डॉक्टर चा व्यवसाय हा फार लाभदायक आहे. पण फक्त पैसे कमावणे हे माझे ध्येय नाही तर डॉक्टर होऊन या समाजाचा आणि देशाचे ऋण फेडणे हे ध्येय आहे.  गावातल्या गरीब लोकांना ज्यांची उपचार घेण्याची परिस्थिती नाही अशा लोकांचे उपचार काही संथांच्या माध्यमातून वा सरकारच्या मदतीने मोफत अथवा कमी खर्चामध्ये उपचार मिळवून देण्याचा मी एक प्रयत्न करेन.

मी हे कधीही नाही विसरणार की या डॉक्टर च्या व्यवसायामध्ये ज्यामध्ये धनलाभ तर होतोच पण त्याचबरोबर जनसेवा करण्याचा एक आनंद सुद्धा भेटतो. म्हणून मी एक आदर्श डॉक्टर बनून गावातल्या लोकांची सेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य समजेन.

खरंच, डॉक्टर बनणे ही माझ्यासाठी एक गौरवाची व आनंदाची गोष्ट असेल.आणि त्यासाठी मी आतापासूनच तयारी देखील सुरु केली आहे. माझे प्रयत्न मी प्रामाणिक पणाने करीत आहे. काय माहिती जनसेवेद्वारा प्रभूसेवा करण्याची माझी ही आकांक्षा पूर्ण होईल?

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment