एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती MBA Course Information In Marathi

MBA Course Information In Marathi दरवर्षी लाखो विद्यार्थी एमबीएला ऍडमिशन घेतात. तसेच ही पोस्ट डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध होते आणि अनेक कंपन्यांमध्ये चांगला रोजगार त्यांना मिळतो. बऱ्याच ठिकाणी एमबीए झालेला विद्यार्थी मार्केटिंग बिझनेस मॅनेजमेंट अशा विविध पदांवर काम करू शकतो. एमबीए हा एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे, जो बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये येतो. जर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवायचे असेल तर तुम्ही याविषयी संबंधित शिक्षण एमबीए या अभ्यासक्रमामध्ये घेऊ शकता. जगभरात अनेक टॉप बिझनेस कोर्स उपलब्ध आहेत.

MBA Course Information In Marathi

एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती MBA Course Information In Marathi

तुम्हाला सुद्धा भारतामध्ये चांगले करिअर करायचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला एमबीए हा कोर्स करणे सर्वात महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे व्यवस्थापनाचे कौशल्य असले पाहिजे किंवा तुम्हाला चांगले कम्युनिकेशन स्किल वक्तशीरपणा आणि टाइमिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणताही बिझनेस हाताळू शकता किंवा खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा चांगल्या पॅकेजमध्ये नोकरी मिळू शकतात.

एमबीए म्हणजे काय?

एमबीए हा एक व्यवसाय प्रशासनांमधील अभ्यासक्रम असून हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. दोन वर्षानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्राप्त होते. या अभ्यासक्रमामध्ये व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक विषयांची विशेष व सखोल अशी माहिती दिली जाते. हा कोर्स एक बिझनेस मॅनेजमेंट मार्केटिंग स्किल आहे.

तुम्हाला व्यवसायामध्ये करिअर करायचे असेल आणि तुमची गुणवत्ता सुधारायची असेल तर तुमच्यासाठी एमबीए हा अभ्यासक्रम परफेक्ट आहे. त्यामध्ये लेखा विपणन संशोधन मोहीम व्यवस्थापन यासारख्या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त होते. या अभ्यासक्रमाच्या परिणामी विद्यार्थ्यांमध्ये अनेक स्किल डेव्हलपमेंट होतात. एमबीए ही भारतातील सर्वातलोकप्रिय अशी पदवी आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.

एमबीए हा किती वर्षाचा कोर्स आहे?

एमबीए हा कोर्स दोन वर्षाचा असून त्यामध्ये व्यवस्थापन आणि विपणन संबंधित विषयांविषयी अभ्यासक्रम असतो. या अभ्यासक्रमाचे विभाजन दोन वर्षाचे असून प्रत्येकी सहा सहा महिन्याच्या चार सेमिस्टर मध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये तुम्ही व्यवसाय संबंधित अभ्यासक्रम घेऊ शकता.

एमबीएचे प्रकार :

तुम्हाला कोणत्या विषयांमध्ये एमबीए करायचे आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना वारंवार चिंता सदावत असते. परंतु ज्यामध्ये आपली भविष्य उज्वल आहे असा कोणता प्रकार आपल्यासाठी फायदेशीर आहे. त्याविषयी आपण माहिती घेतली पाहिजे आणि नंतरच एमबीएसाठी प्रवेश घेतला पाहिजे. एम बी ए चा अभ्यासक्रम 10 भागांमध्ये विभागलेला आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्याही विषयावर एमबीए करू शकता.

फायनान्स एमबीए :

फायनान्स एम बी ए मध्ये तुम्ही वित्त भांडवल, व्यवस्थापन कास्टिंग आणि बजेटिंग यासारख्या विषयावर सखोल ज्ञान प्राप्त करू शकता तसेच हा कोर्स सर्वांत लोकप्रिय आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणत्याही फॉर्म किंवा संस्थेच्या आर्थिक विभागात सहज काम करू शकता.

मानव संसाधन एमबीए :

संसाधन एमबीए यामध्ये व्यक्तीचे रहस्य जाणून घेणे महत्त्वाचे असते तसेच त्याचे संवाद कौशल्य याविषयी अभ्यासक्रम असतो. कंपनीचे उद्दिष्ट साध्य करता येईल यासाठी त्याच्या जबाबदाऱ्या कर्मचारी नियुक्त करणे कर्मचारी डाटाबेस तयार करणे त्यांची देखभाल करणे इत्यादी समाविष्ट असते.

विपणन पदवीधर पदवी :

यामध्ये गतिशील आणि स्पर्धात्मक असे क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामध्ये विपणन जाहिरात ग्राहक वर्तन ग्राहक खरेदी वर्तन मार्केट इतर गुंतागुंत आणि अभ्यासक्रमाचा समाविष्ट असतो तसेच यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास विपणन योजना संप्रेषण कौशल्य समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी महत्त्वाचे असते. याविषयी सखोल ज्ञान प्राप्त होते.

सप्लाय चेन मॅनेजमेंट एमबीए :

यामध्ये क्लाइंट किंवा कंपनीने माजलेल्या मालाची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वेअर हाऊसिंग आणि वाहतूक या विषयीची सर्व माहिती सप्लाय चेन मॅनेजमेंट कोर्समध्ये दिली जाते. आज काल या अभ्यासक्रमाला भरपूर महत्व दिले आहे. कार्पोरेट वाहतूक क्रियापला विस्तारत असल्याने या उद्योगात सुद्धा खूप संध्या उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवसाय एमबीए :

एमबीएच्या या कोर्समध्ये इंटरनॅशनल बिझनेस मधील आंतरराष्ट्रीय मार्केटिंग आणि फायनान्स वर सखोल लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे या अभ्यासक्रमामुळे बहुराष्ट्रीय सहकार्याकडे अधिक लक्ष दिले जाते.

ग्रामीण व्यवस्थापन एमबीए :

ग्रामीण भागातील वातावरण जाणून घेण्याची उत्तम अभ्यासक्रम यामध्ये दिलेला असतो. या क्षेत्रातील व्यवस्थापकांची वाढती गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे आणि आज काल ग्रामीण व्यवस्थापनात अनेक संध्या सुद्धा उपलब्ध आहेत.

माहिती तंत्रज्ञानात एमबीए :

हा अभ्यासक्रम माहिती तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आयटी नियोजन डिझाईन अंमलबजावणी निवड आणि व्यवस्थापन तसेच प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकते. हा कोर्स तुम्ही केला असल्यास ज्यांनी आयटीमध्ये बी टेक किंवा बीएससी संगणक विज्ञान अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन एमबीए :

हॉस्पिटल मॅनेजमेंट हे एक हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हणजेच आरोग्य सेवा व्यवसाय लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. या कोर्समध्ये रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय सराव व्यवस्थापन याविषयीचा सखोल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. सध्या रुग्णालयामध्ये प्रशासनाकडे मोठी मागणी होत आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थी या कोर्सकडे सुद्धा लक्ष केंद्रित करत आहेत.

मीडिया मॅनेजमेंट एमबीए :

हा कोर्स तुम्ही केला तर तुम्हाला तज्ञ कृषी उत्पादक ग्राहक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मिळू शकते तसेच त्याची तुम्हाला यामध्ये प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. कोणत्याही शाखेतील पदवीधर हा कोर्स करू शकतो.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन एमबीए :

या कोर्समध्ये कृषी विषयक जाहिरात कशी करायची आहे तसेच त्यामध्ये तुम्हाला कसे काम करायचे, हे प्रत्येक कंपनी किंवा संस्था आपले उत्पादन सेवा लोकांसमोर कशाप्रकारे जाहिरातीच्या माध्यमातून सादर करेल याविषयी सखोल ज्ञान दिले जाते.

एमबीए करण्यासाठी पात्रता काय आहेत?

तुम्हाला एमबीए कोर्स करायचे असेल तर त्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.बारावीमध्ये कोणत्याही विशिष्ट विषय असला पाहिजे असे बंधनकारक नाही परंतु वाणिज्य शाखेतून बारावीचा अभ्यासक्रम या अभ्यासक्रमासाठी फायदेशीर ठरतो. विद्यार्थ्यांचे वय किमान सतरा वर्ष असावे, इयत्ता बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

एमबीएसाठी प्रवेश कसा मिळेल?

तुम्हाला जर एमबीए साठी प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये CAT, MAT, GAMT, CET, SNAP. या परीक्षांमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवावे लागतील तेव्हाच तुम्हाला एमबीए करण्यासाठी प्रवेश मिळेल.

एमबीएची फीज किती आहे?

प्रत्येक महाविद्यालयांमध्ये एम बी ए चा कोर्स हा वेगळा असतो. त्यामुळे त्या कॉलेजनुसार किंवा महाविद्यालयानुसार एमबीएची फीज ठरू शकते. तसे पाहता मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कोर्सची फीस 1,50,000 ते 2,00,000 रुपये पर्यंत असू शकते. हे जर तुम्ही सरकारी महाविद्यालयांमध्ये एमबीए डिग्री पूर्ण करत असाल तर तेथे केवळ 40 ते 50 हजार रुपयांपेक्षाही कमी खर्च तुम्हाला लागतो.

एमबी नंतर तुम्ही कुठे नोकरी करू शकता?

एमबीए तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. ज्या क्षेत्रातून तुम्ही एमबीए केले आहे, त्या क्षेत्रात तुम्हाला रोजगार मिळण्याच्या अनेक संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतात.

एमबीए पूर्ण केल्यानंतर पगार किती मिळेल?

एमबीए हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रांमध्ये MBA केले आहे, त्या क्षेत्रानुसार तुम्हाला पगार मिळतो. तरीसुद्धा तुम्हाला अंदाजे दरमहा 25 ते 60 हजार दरम्यान पगार मिळतो.

FAQ

MBA च फुल फॉर्म काय आहे?

Master of Business Administration.

MBA मध्ये काय शिकवले जाते?

एमबीए ही एक पदवी असून त्यामध्ये व्यवसाय तत्वे नेतृत्व कौशल्य आणि व्यवहारिक प्रशिक्षण दिले जाते.

MBA हा अभ्यासक्रम किती वर्षात पूर्ण होतो?

MBA हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष लागतात.

MBA करण्यासाठी तुम्ही काय पूर्ण केले पाहिजे?

एमबीए पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी बारावी मध्ये 50% पेक्षा जास्त मार्क मिळायला पाहिजे.

एमबीए कोर्स करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

सतरा वर्ष.

Leave a Comment