मेहरानगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Meharangad Fort Information In Marathi

Meharangad Fort Information In Marathi महाराष्ट्र पाठोपाठ किल्ल्यांच्या बाबतीत राजस्थान राज्यांचा क्रमांक लागतो. राजस्थानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर किल्ले असून, राजस्थान मधील किल्ल्यांना रजपूत साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर वारसा लाभलेला आहे. राजस्थानमध्ये जवळपास ४१० फूट उंचीवर एक किल्ला बसलेला असून, राजपूत वास्तू कलेच्या भव्यतेचा आणि कलाकुसरीचा एक उत्तम नमुना तसेच राठोड घराण्याने दाखवलेल्या शौर्याचा प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मेहरानगड किल्ला आज देखील दिमाखात उभा आहे.

Meharangad Fort Information In Marathi

मेहरानगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Meharangad Fort Information In Marathi

सात दरवाजे असलेला हा किल्ला १४५९ यावर्षी बांधण्यात आला असावा, असे सांगण्यात येते. या किल्ल्याची निर्मला राव जोधा यांच्याद्वारे करण्यात आलेले असून, विजयाची आठवण म्हणून या किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये फार मोठे अंगण असून, फुल महाल, आणि मोती महाल यासारखे दोन राजवाडे देखील आहेत.

जे येथील रजपूत कलाकृतीचे दर्शन घडवत असतात. संस्कृतिक महत्त्व प्राप्त असलेला हा किल्ला राजस्थान मधील आकर्षक ठिकाणांमध्ये समाविष्ट आहे. ऐतिहासिक वारसा असण्याबरोबरच हा किल्ला एका पर्यटनाचे मुख्य ठिकाण म्हणून देखील ओळखला जातो.

राजस्थानच्या जोधपूर मध्ये वसलेला हा किल्ला जोधपुर शहरापासून काहीसा बाहेर आहे, आणि या किल्ल्यावर गेल्यानंतर संपूर्ण जोधपुर शहर अर्थात ब्ल्यू सिटी आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याच्या आत मध्ये अनेक राजवाडे असून, मंदिरे देखील बघायला मिळतात. सोबतच एक संग्रहालय असून, या किल्ल्याच्या संरक्षणाकरिता जवळपास सहा मीटर जाडीची उत्तम अशी भिंत बांधलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण या मेहरानगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाव मेहरानगड
प्रकारकिल्ला
ठिकाणजोधपुर
निर्मिती वर्षइसवीसन १४५९
निर्माताराव जोधा
प्रकारगिरीदुर्ग

इसवी सन १४५९ यावर्षी राजपुताना स्थापत्य शैलीचा वापर करून राव जोधा यांच्याद्वारे मेहरानगड हा किल्ला बांधला गेला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यावेळी या किल्ल्यावर सुमारे सात दरवाजांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आश्चर्याची गोष्ट सांगायची तर हे सात दरवाजे वेगवेगळ्या राजवटीच्या शासकाने बांधले होते.

ज्यांची निर्मिती पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत करण्यात आलेली आहे. अतिशय जाडजूड तटबंदीने संरक्षित असलेला हा किल्ला ११७ फूट लांबीला, आणि ७० फूट रुंदी ला आहे. सोबतच १२० फूट उंच असलेला हा किल्ला अतिशय प्रेक्षणीय असून, येथे अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत. ज्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणाला भेट देत असतात.

मेहरानगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती:

पंधराव्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलेला हा किल्ला अतिशय ऐतिहासिक घटनांचा साक्षी असून राव जोधा या मंडोरच्या शासकाने याची निर्मिती केली होती. या किल्ल्याच्या निर्माणाचा मुख्य उद्देश परकीय आक्रमणापासून राज्याला सुरक्षित ठेवणे हा होता.

या किल्ल्याच्या निर्मिती बद्दल काही आख्यायिका देखील सांगितल्या जातात. त्यातील एक अख्यायिका अशी की, ज्या टेकडीवर या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले तेथे चिरीया नाथाजी नावाच्या एका संन्याशी व्यक्तीचे वास्तव्य होते. तो व्यक्ती नेहमी या टेकडीवर राहत असे, मात्र किल्ला बांधकाम करण्यासाठी या व्यक्तीला तेथून स्थलांतरित करणे गरजेचे होते.

मात्र हा संन्यासी तेथून जागा सोडायला तयार नव्हता. मग मात्र या राजाने त्याला बळजबरी तेथून हलविले आणि त्या ठिकाणी किल्ला बांधकाम करण्यास घेतले. मात्र यामुळे हा संन्यासी खूपच संतापला, आणि त्यांनी या किल्ल्याला शाप दिला की या किल्ल्यावर कधीही पाणी अस्तित्वात असणार नाही. नेहमी या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवेल.

राजने त्यावेळी मात्र या संन्याशाच्या शापाकडे दुर्लक्ष केले, मात्र किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर येथे पाण्याची फार मोठी टंचाई जाणू लागली. मग मात्र राजाला आपली चूक कळाली, आणि त्याने या ठिकाणी संन्यासाच्या शांततेकरिता एका मंदिराची निर्मिती केली सोबतच संन्याशाचे घर देखील या किल्ल्यावरच बांधण्यात आले.

किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे:

पर्यटकांच्या दृष्टिकोनातून मेहरानगड हा किल्ला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, येथे विविध प्रकारच्या वस्तू बघायला मिळत असतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे सात दरवाजे असून, वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधण्यात आलेले हे दरवाजे बघण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत असतात.

त्याचबरोबर या किल्ल्यावर ऐतिहासिक वस्तू व चिन्हांचे संग्रहण करण्याकरिता एक मेहरानगड संग्रहालय देखील निर्माण करण्यात आलेले असून, या ठिकाणी झालेल्या विविध शासकांची आठवण या संग्रहालयामध्ये जपून ठेवलेली आहे. ज्यामध्ये पोशाख, चित्रे, वाद्य, शस्त्रे, पाळणे, इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

या किल्ल्यावर राजवाडे देखील बघण्यासारखे असून, वेगवेगळ्या स्वरूपाचे राजवाडे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण स्थान म्हणून ओळखले जातात. सोबतच दुर्गादेवी आणि चामुंडी देवी यांच्यासह नागणेचीयाजी इत्यादी मंदिरे देखील या किल्ल्यावर आढळून येत असतात.

मेहरानगड किल्ल्याविषयी तथ्य माहिती:

  • मेहरानगड किल्ल्यावर वेगवेगळे सात दरवाजे आढळून येत असले, तरी देखील या प्रत्येक दरवाजांच्या निर्मिती कालखंड वेगवेगळ्या आहे. व त्यांचे निर्माते देखील वेगवेगळे आहेत.
  • मेहरानगड हा किल्ला तब्बल पाच किलोमीटर क्षेत्राच्या परिक्षेत्रामध्ये वसलेला आहे.
  • हा किल्ला शापित किल्ला म्हणून देखील ओळखला जातो, कारण या निर्मितीच्या वेळी तेथे असणाऱ्या एका संन्याशाने या किल्ल्यावर नेहमी पाण्याच्या टंचाईचा शाप दिला होता.
  • इसवी सन १४५९ यावर्षी बांधण्यात आलेला हा किल्ला राजपुताना स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यात आलेला आहे.
  • स्थानिक लोकांच्या मते किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना राजा राम मेघवाल या एका व्यक्तीला जिवंत स्वरूपात या किल्ल्यामध्ये पुरलेले आहे.
  • तुम्हाला हा मेहरानगड किल्ला बघायला जायचा असेल तर तुम्ही अगदी मोफत कोणतेही शुल्क न देता या किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकता. मात्र याकरिता तुम्हाला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत प्रवेश करावा लागेल.

निष्कर्ष:

ज्याप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ल्यांचा समावेश होतो, त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्ये देखील कमी अधिक प्रमाणात किल्ले आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये किल्ले असण्याबरोबरच राजस्थान मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर किल्ले आढळून येतात. राजस्थान येथील बऱ्याचशा किल्ल्यांना रजपूत वास्तुकलेचा वारसा लाभलेला असून, या किल्ल्यांच्या बांधकामांमध्ये विशिष्ट प्रकारचा राजस्थानमध्ये आढळणारा दगड वापरण्यात आलेला असतो.

अतिशय उत्कृष्ट बांधकाम शैली असलेले हे किल्ले पर्यटन दृष्टीने फारच उपयुक्त ठरतात. आजच्या भागामध्ये आपण यातीलच एक मेहरानगड किल्ल्याबद्दल माहिती बघितलेली असून, या किल्ल्याची निर्मिती व त्याचा इतिहास बघण्याबरोबरच या किल्ल्याबाबत असणारी काही महत्त्वाची माहिती देखील जाणून घेतलेली आहे. सोबतच ऐतिहासिक महत्त्व असलेले या किल्ल्यावर कोणकोणती ठिकाणे बघण्यासारखी आहेत, याबद्दल माहिती घेतलेली आहे. सोबतच मनोरंजक तथ्य माहिती देखील बघितलेली आहे.

FAQ

मेहरानगड हा किल्ला कोठे वसलेला आहे?

मेहरानगड हा किल्ला राजस्थान राज्याच्या जोधपूर या शहराच्या बाहेर बसलेला आहे.

मेहरानगड या किल्ल्याची निर्मिती कोणत्या वर्षी व कोणा द्वारे करण्यात आली होती?

मेहरानगड या किल्ल्याची निर्मिती इसवी सन १४५९ यावर्षी जोधा राव यांच्या द्वारे करण्यात आली होती.

मेहरानगड या किल्ल्यावर कोणत्या स्वरूपाची स्थापत्यशैली आढळून येते?

मेहरानगड या किल्ल्यावर राजपुताना या बांधकाम शैलीचे किंवा स्थापत्यशैलीचे बांधकाम आढळून येते.

मेहरानगड या किल्ल्याच्या सुरक्षेबद्दल काय सांगता येईल?

मेहरानगड हा किल्ला तत्कालीन कालावधीमध्ये खूपच सुरक्षित किल्ला समजला जात असे. सुमारे १२५ मीटर उंच टेकडीवर बांधलेला हा किल्ला जाडजुड तटबंदीने संरक्षित केलेला आहे.

मेहरानगड किल्ल्यावर भेट दिल्यानंतर कोणत्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत?

मेहरानगड या किल्ल्यावर भेट दिल्यानंतर तुम्ही तेथील तख्त महाल, फुल महाल, मोती महाल, यांसारखे अनेक राजवडे बघू शकता. त्याचबरोबर येथे एक संग्रहालय असण्याबरोबरच चुनरी देवीचे मंदिर देखील आहे.

Leave a Comment