मेथी भाजी मराठी Methi Bhaji Recipe in Marathi

मेथी भाजी मराठी Methi Bhaji Recipe in Marathi  मेथीची भाजी खाणे पौष्टिक आहे बऱ्याच लोकांना मेथीची भाजीचा कळवटपणा पाहून आवडत नाही, परंतु मेथीची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला बरेच फायदे मिळतात. हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खायला पाहिजे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात. तर आज आपण येथे मेथी आणि मूग डाळ यांची रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी तयार करण्यासाठी अत्यंत सोपी व चविष्ट लागते मेथीच्या भाजी शिजल्यानंतर त्यातील कडवटपणा दूर होतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

 Methi Bhaji

मेथी भाजी मराठी Methi Bhaji Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

मेथीची भाजी बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. आपण रस्सेदार मेथीची भाजी आणि कोरडी मेथीची भाजी तयार करून खाऊ शकतो. तसेच मेथीच्या भाजी पासून आपण विविध पदार्थ देखील तयार करू शकतो. येथे आपण मेथीची भाजी मूग डाळ अशी रेसिपी बघणार आहोत. मेथीच्या भाजीपासून मेथी पराठा, मेथी ठेपला, मेथी मटर, मेथी वडी अशा प्रकारचे विविध पदार्थ तयार करू शकतात. तर चला मग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती पाहूया.

मेथीची भाजी ही रेसिपी किती व्यक्ती करता तयार होणार आहे?
ही रेसिपी आपण चार व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

मेथीची भाजी रेसिपी च्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

मेथीची भाजी रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

मेथीची भाजी तयार करण्यासाठी लागणारी सामग्री :

1) एक जुडी मेथीची भाजी
2) चार चमचे मुगाची डाळ भिजलेली
3) एक चमचा तेल
4) एक चमचा जिरे
5) एक चमचा बारीक चिरलेला लसूण
6) दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
7) चवीनुसार मीठ
8) हळद

मेथीची भाजी तयार करण्याची पाककृती :

  • रबडी फालुदा रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम मेथीची पाणी उकळून घ्या आणि छान दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
  • नंतर मूग डाळ छान भिजलेली असेल त्यातील पाणी काढून घ्या.
  • एक कढई गॅसवर ठेवा त्यामध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी टाका.
  • तेल गरम झाले की, त्यामध्ये जिरे घाला तसेच जिरे छान तडतडू द्या. नंतर त्यामध्ये लसूण टाका लसुन छान सोनेरी रंग येईपर्यंत होऊ द्या.
  • नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून तळून घ्या.
  • नंतर त्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्या व छान परतून द्या. नंतर त्यामध्ये मुगाची डाळ टाका.
  • हळद व चवीनुसार मीठ टाकून पाच मिनिटे मंद आचेवर होऊ द्या.
  • आता गरमागरम मेथीची भाजी तयार आहे.
    ही भाजी खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक व चविष्ट लागते. तुम्ही पोळी किंवा भाकरी सोबत ही भाजी खाऊ शकता.

पोषक घटक :

आपण ही मेथीची भाजी मूग डाळीमध्ये केली, त्यामुळे मूग डाळीतील पोषक घटक व मेथीच्या भाजीतील पोषक घटक अत्यंत आवश्यक असतात. तयार झालेली रेसिपी पोषक आहार आहे. त्यामध्ये
लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मेथीची भाजीची पाने केवळ खाण्यासाठी चविष्ट लागत नाही तर अनेक रोगांपासून आपले संरक्षण देखील करते.

फायदे :

मेथीची भाजी खाणे आपल्यासाठी खूपच फायद्याचे असते. ही भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते व अनेक आजारां पासून आपले संरक्षण होते.

तोंड आले किंवा घसा बसला असेल तर मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या करून रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्ल्याने पोट साफ होते.

मेथीच्या भाजीमध्ये असणारा गॅलॉक्टोमेनिन हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारा घटक असतो. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मेथीची भाजी फायदेशीर ठरते.

मेथीच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळून येत असल्यामुळे आपले पोट नेहमीच साफ होण्यासाठी मेथीची भाजी पौष्टिक आहे. तसेच मेथीच्या भाजीला सेवनाने भूक व पचनक्रिया देखील सुधारते.

मेथीच्या पानांची पेस्ट करून त्वचेवर लावल्यास त्वचा सुंदर व मऊ दिसते. तसेच मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते.

मेथीची बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्यास काळे डाग देखील दूर होतात.

तोटे :

मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते, मात्र बऱ्याच जणांना मेथीची भाजी खाल्ल्यामुळे एलर्जीचा त्रास होऊ शकतो.

म्हणून ज्यांना मेथीच्या भाजीची ऍलर्जी आहे. अशा लोकांनी भाजीचे सेवन करू नये. तसेच मेथीच्या भाजीचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे अतिसार पोटात वेदना तयार होतात.

तर मित्रांनो, तुम्हाला मेथीची भाजी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment