मेथी लाडू रेसिपी मराठी Methi Ladu recipe in Marathi

मेथी लाडू रेसिपी मराठी Methi Ladu recipe in Marathi  मेथीचे लाडू म्हटले की, बऱ्याच लोकांना कडवट चविचे अशी लाडू नकोच असतात.  परंतु मेथीचे लाडू आणि कडवट चव नसली तर खायला आवडतील आणि चविष्ट पण लागतील अशी रेसिपी आम्ही खास तुमच्याकरता घेऊन आलो आहोत.  हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची उष्णता टिकून ठेवण्यासाठी आपल्या आजी-आजोबांपासून अनेक घरांमध्ये मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, सुकामेव्याचे लाडू करून खाल्ले जातात.  परंतु आजकाल त्याच्या कडवट चवीमुळे लहान मुले काय मोठी माणसे देखील नाक मुरडतात; परंतु आज आपण येथे जरा गोड आणि परफेक्ट लाडू बनवता येतील असेच मेथी लाडू रेसिपी बघणार आहोत.  या लाडूची रेसिपी आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असून चवीला सुद्धा कमी कडवट लागतील व ते खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य देखील सुदृढ राहिल.

Methi Ladu

मेथी लाडू रेसिपी मराठी Methi Ladu recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

लाडू ही रेसिपी महाराष्ट्रातील पारंपारिक चालत आलेली रेसिपी आहे.  आपण रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, खोबऱ्याचे लाडू, मोतीचूरचे लाडू, मूग डाळीचे लाडू, उडीद डाळीचे लाडू, डिंकाचे लाडू अशा बऱ्याच प्रकारची रेसिपी पाहिली आहे परंतु जी खास हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असते ती रेसिपी म्हणजेच मेथीचे लाडू मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे आपले आरोग्य ठणठणीत राहते.  तर चला मग जाणून घेऊया मेथीचे लाडू रेसिपी कशी बनवायची व त्याकरता लागणारे साहित्य.

ही रेसिपी आपण किती जणांकरिता बनवणार आहोत ?

ही रेसिपी आपण 10 जणांकरता बनवणार आहोत.

रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ  :

मेथीचे लाडू करत असताना आपल्याला बऱ्याच साहित्यांची पूर्वतयारी करावी लागते.  त्याकरता किमान 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

लाडू ची रेसिपी करत असताना आपल्याला कुकिंग करण्याकरता  एक तास एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

मेथी लाडू रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला 1.30 तास एवढा वेळ लागतो.

मेथी लाडू रेसिपीसाठी लागणारे साहित्य  :

1)  दोन वाटी मेथीचे दाणे

2) एक किलो गव्हाचे पीठ

3) 500 ग्रॅम तूप

4) 500 ग्रॅम बारीक केलेला गूळ

5)  दोन वाटी किसलेले सुकं खोबरं

6) दोन कप बारीक केलेले बदामाचे तुकडे

7)  तीन कप बारीक केलेली खारीक

8) अर्धा चमचा वेलची पूड

9) दोन कप काजूचे तुकडे

10) दीड वाटी मनुके

11)  एक वाटी हालीम

12) चार चमचे रवा

13) चार चमचे खसखस

14) दोन वाटी डिंक

15) दोन ग्लास पाणी.

मेथी लाडू बनवण्याची पाककृती  :

  • पोहा रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा व त्यामध्ये मेथीचे दाणे, हालिम, सुके खोबरे, खसखस व रवा हलका भाजून घ्या.
  • नंतर कढाईमध्ये तीन ते चार चमचे तूप गरम करून डिंक भाजून घ्या.  हे सर्व मिश्रण भाजत असताना जळणार नाही याची दक्षता घ्या.  म्हणजेच आहे मंद आचेवर पदार्थ भाजून घ्यायचे आहेत.
  • आता कढाईमध्ये तूप घालून थोडे थोडे करून पीठ भाजून घ्यायचे आहे.  हे पीठ छान ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे.
  • नंतर मिक्सरमध्ये मेथीदाणे वेलची बारीक करून घ्यायची आहे.  तसेच भाजलेले गव्हाचे पीठ एका परातीत काढून घ्या.  त्यामध्ये बाकीचे सर्व भाजलेले साहित्य मिक्स करून घ्या.
  • आता यामध्ये मनुके, खारीक पावडर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स ऍड करून घ्या.
  • नंतर एका भांड्यात दोन ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये गूळ घाला आणि गुळाचा पाक तयार करून घ्या.  नंतर त्यामध्ये एक चमचा तूप घाला.  पाकामध्ये  तयार मिश्रण एकत्रित करून घाला.  पाकात जितके मावेल तितकीच मिश्रण घाला.  चमच्याच्या सहाय्याने सगळे मिश्रण पाकामध्ये एकजीव करून घ्या.
  • हे मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घ्या आणि हाताने हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या.  मिश्रण थोडे गरम असतानाच त्याचे छान असे हव्या त्या आकारात लाडू बांधून घ्या.

पोषक घटक :

मेथीचे लाडू आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे.  मेथीमध्ये पोषक घटक असतात.  त्यामध्ये लोह, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम,  मॅग्नेशियम जस्त, विटामिन सी, चरबीयुक्त आम्ल, दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आरोग्यवर्धक आहेत.

फायदे  :

मेथीच्या लाडूचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात ते खालील प्रमाणे  :

हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू जर आपण खात असाल तर आपल्या शरीराला उष्णता तर मिळतेच आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षण देखील होते.

भारतात बऱ्याच काळापासून स्त्रियांना बाळंतपणा नंतर मेथी खाण्याचा सल्ला देखील दिला जातो.

मेथीचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखीच्या समस्येवर आराम मिळतो, असे आयुर्वेदातही सांगितलेले आहे.

मेथीचे लाडू खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.  रोज सकाळी मेथीचा एक लाडू खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी देखील मेथीच्या लाडूचे सेवन केले तर त्यांना देखील फायदा होतो.  परंतु त्यांनी साखरेच्या शिवाय मेथीचे लाडू खावे.

मेथीचे लाडू खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.  तसेच रक्तदाबांच्या समस्येलाही खूप फायदा मिळतो.

मेथीचे लाडू पाठ दुखी, सांधेदुखी, वात याकरिता रामबाण उपाय आहे.

तोटे :

मेथीचे लाडू खाणे आरोग्यासाठी हिताचे आहे.  परंतु ते जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटदुखीचा त्रास आणि मळमळचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे रोज एकाच लाडूचे करायला पाहिजे.

तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment