मेथी मटर मलाई मराठी Methi Matar Malai Recipe In Marathi

मटर मलाई मराठी Methi Matar Malai Recipe In Marathi  मेथी मटर मलाई हा पदार्थ मेथी, मटर, आणि मलाई पासून बनवला जातो. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी मेथी मटर मलाई वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, महाराष्ट्रामध्ये हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ मानला जातो. मेथी मटर मलाईमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. आपण खूप कमी वेळात मेथी मटर मलाई रेसिपी घरीच बनवू शकतो.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट वरती पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार मेथी मटर मलाई रेसिपी खायाला मिळते. काही लोकांना मेथी मटर मलाई खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट आणि मसालेदार मेथी मटर मलाई मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट मेथी मटर मलाई कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण मेथी मटर मलाई रेसिपी पाहणार आहोत.

Methi Malai Mutter

मेथी मटर मलाई मराठी Methi Matar Malai Recipe In Marathi

मेथी मटर मलाईचे प्रकार :

मेथी मटर मलाई हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे, विविध ठिकाणी हा पदार्थ वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. यामध्ये मेथी मटर मलाई, मेथी मटर मलाई मसाला, मेथी मटर मलाई तडका, मेथी मटर मलाई करी हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मेथी मटर मलाई रेसिपी ही आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

मेथी मटर मलाईच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

मेथी मटर मलाई तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मेथी मटर मलाई कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

मेथी मटर मलाई बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावा लागतो, यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास वेळ लागतो.

मेथी मटर मलाईसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 जोड मेथी.
2) 1 वाटी मटर.
3) 4 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
4) अर्धी वाटी मलाई.
5) 1 चमच जिरे.
6) 2 कांदे.
7) 1 चमच गरम मसाला.
8) 2 ते 3 हिरवी मिरची.
9) 1 चमच लाल मिरची पावडर.
10) कोथिंबीर.
11) 3 चमचे तूप.
12) 2 ते 3 तमालपत्र.
11) 10 ते 12 काजू.
12) तेल, मीठ.

पाककृती :

 • सर्वात प्रथम मेथीच्या जोडिचे कोवळे पाने व्यवस्थित तोडून घ्या, नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
 • नंतर मटर, हिरवी मिरची, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
 • नंतर एका भांड्यात गॅसवरती थोडे गरम पाणी करा, त्यामधे मेथीची भाजी 5 मिनिट शिजू घ्या.
 • नंतर गॅस बंद करून, मेथी एका प्लेटमध्ये काढा, आणि मेथी थोडी थंड झाली की,
 • मेथीतील पूर्ण पाणी काढून बारीक कापून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
 • एका गॅसवरती खोल तळाचा पॅन ठेवा, त्यात आवश्यक तेवढे तूप टाकून, गरम करा.
 • त्यामध्ये पहिले जिरे टाकून, चांगले तळ-तळ भाजून घ्या, नंतर यामध्ये तमालपत्र टाका.
 • नंतर यामध्ये लसूण-अद्रक पेस्ट टाका, आणि कच्चा वास निघे पर्यत चांगला भाजून घ्या.
 • पेस्ट झाला की, यामध्ये बारीक कांदा टाका, आणि पारदर्शी आणि तपकिरी होईपर्यत भाजून घ्या.
 • नंतर यामध्ये थोडी बारीक हिरवी मिरची टाका, याचबरोबर गरम मसाला, लाल मिरची पावडर टाका.
 • मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्या, आणि परतवत रहा, मसाला चांगला झाला.
 • नंतर यामध्ये मटर, काजू तुकडे टाकून 5 मिनिट चांगले शिजवू द्या, मटर शिजले की, नंतर यामध्ये आपण बारीक केलेली मेथी टाका, नंतर मलाई टाकून चांगले मिक्स करा.
 • नंतर यामध्ये आवश्यक असल्यास थोडे पाणी, चवीनुसार थोडे मीठ आणि बारीक कोथिंबीर टाका, आणि चांगली उकडी आली की खाली काढून घ्या.
 • आता आपले स्वादिष्ट आणि मसालेदार मेथी मटर मलाई रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये कांदा, पोळी घेऊन मेथी मटर मलाई खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
 • मसाला दुध मराठी

मेथी मटर मलाईमध्ये असणारे घटक :

मेथी मटर मलाई हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, व्हिटॅमिन, प्रथिने, चरबी, फॅट, कॅलरी, फायबर, कर्बोदके, फॅट हे सर्व घटक आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

मेथी मटर मलाई सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने सारखे पौष्टिक घटक मिळतात.

यामुळे आपले हाड, शरीर, केस मजबूत राहतात, आणि यामुळे आपल्याला हृदय विकार होत नाही.

यामध्ये असणारे घटक फॅट, चरबी, कॅलरी, फायबर हे घटक आपल्या शरीराची आणि हाडाची वाढ करतात.

मेथी मटर मलाईमध्ये असणारे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

मेथी मटर मलाई आपण जास्त प्रमाणात सेवा केली तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून मेथी मटर मलाई आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला मेथी मटर मलाई रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment